हिंजवडीजवळ (मारुंजे, मान, रिहे) जमिनीत गुंतवणुक - काय वाटते?

Submitted by mansmi18 on 12 December, 2013 - 02:48

नमस्कार,

सध्या हिंजवडीजवळ जमिनीत गुंतवणुक हे एक "नो ब्रेनर" समजले जातेय. हिंजवडीजवळ मान, मारुंजे गावाजवळ शेत जमिनी ९ ते १० लाख प्रति गुंठ्याने विकल्या जात आहेत. (एक दोन वर्षात हिंजवडीसह जवळपासची १०-१५ गावे पीसीएम्सी मधे येउन या जमिनी आपोआप एन ए होतील आणि किंमत दुप्पट होइल हे कारण सांगत आहेत.)
हिंजवडी फेज ३ जवळ रिहे (घोटावडे फाटा) हे जरा लांब आहे पण तिथेही जमिनीचा भाव ४-५ लाख प्रतिगुंठा सांगत आहेत. ५-६ वर्षापुर्वी याच जमिनींचा भाव १ ते १.५ लाख प्रतिगुंठा होता.

ही गुंतवणुक कितपत चांगली आहे? कृपया आपले मत्/अनुभव शेअर कराल का?

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमिनीतली गुंतवणूक केव्हाही चांगली पण इथे थोडा उशीर झाला आहे.
परतावा फार चांगला मिळण्यासाठी थांबावे लागेल असे वाटते.

त्या मारुंजी जवळ एक १३ आरचा डेव्हलप्ड प्लॉट माझ्या बायकोकडे विकायला आहे. तुम्ही म्हणता तसेच रेट तिथे आहेत. गुंतवणूक कितपत चांगली हा प्रश्न सापेक्श आहे. पण एवढी मोठी गुंतवणूक करणार्‍याला निर्णय घेणे कठीण जाते. पण जमिनीच्या बाबत घेणार्‍याला आपल्याला महाग लागला व देणार्‍याला आपण स्वस्त विकला असे वाटत राहते. अजुन थोडे थांबलो असतो तर जास्त भाव मिळाला असता असे त्याला वाटते. तर उगीचच सोडला असे घेणार्‍या व्यक्तिला संधी हुकल्यावर वाटते. पण मानवी स्वभाव आहे तो. रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करताना थोडासा महाग लागला तरी चालेल पण कागदपत्राबाबत सतर्क राहणे योग्य.

मनस्मी,

हिंजवडी / मान / जवळचा पट्टा ते पिरंगूट (मागिल रस्त्याने) हे सर्व ऑलमोस्ट विकले गेले आहे. मी ह्या भागात खूप भटकलो आहे जमीनी करता.

मला कळालेले काही पॉब्लेम्स.

१. तुम्ही तर मोठ्या प्रकल्पात ( जिथे २०० ते ४००) एकर जमीन विकायला आहे. घेतला तर तो NA होईपर्यंत विकला जात नाही, डेड इन्वेस्टमेंट. ते म्हणतात की आम्ही परत विकत घेऊ, पण परत तेच विकत घेताना किंमत फार कमी मिळते.
२. NA हे R होईल असे काही नाही. NA IT झाले की मग तिथे जमीन असूनही केवळ उद्योग काढता येईल.
३. जमीनी दोनदा विकल्या गेल्याच्या केसेस नवीन नाहीत.

मान मध्ये मी त्या नवीन होणार्‍या ब्रिज (अजून झाला नाही, प्लान मध्येच आहे फक्त) जवळ जमीन बघितली, तिथेही तेंव्हा २००० भाव होता व जावे मात्र मान गावातून लागत होते. तिथे २००० भाव देण्यापेक्षा मी बाणेर मध्ये ३५- ४००० च्या आसपास जमीन बघत होतो. मग ते ड्रॉपच केले.

ऑफकोर्स हिंजवडी मध्ये रेसिडेंशिल फ्लॅट अजूनही वाकडच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत. म्हणून मग फ्लॅट घेतला. पुढील ५ वर्षात हिंजवडी हा रेसिडेंशिल हब होणार. अनेक नवीन रस्ते ( ८० ते १०० फुट) तिथे येत आहेत, त्यामुळे हिंजवडी कधीही वाढतच जाणार.

प्रतिसादाबद्दल सर्वाना आभार.

केदार,
गेल्या आठवड्यात आम्ही पण गेलो होतो तिथे काहीच शिल्लक नाही. हे दोनदा वगैरे विकले जाण्याच्या भानगडीत पडणे डोकेदुखीच म्हणायची. आणि ते एन ए होणे इ. बद्दल फार काही माहिती नाही त्यामुळे नको ती भानगड असे वाटते.

पुढील ५-१० वर्षात तु म्हणतोस तसे तो भाग चांगला विकसित झालेले चित्र दिसत आहे त्यामुळे रिस्क टु रीवॉर्ड चांगला असेल असे वाटते. पण ३ गुंठे प्लॉट साठी ३-५ लाखाऐवजी २५-३० लाख खुपच जास्त आहेत. (कदाचित १० वर्षाने मी परत पोस्ट करेन की १० वर्षापुर्वी २५ लाखाला प्लॉट मिळत होता Happy )

कदाचित १० वर्षाने मी परत पोस्ट करेन की १० वर्षापुर्वी २५ लाखाला प्लॉट मिळत होता >>> लोल. मी आज दोनच वर्षाने स्वस्त होता असे लिहितोय. जर २० एक लाख विसरायची ताकद असेल तर मात्र खरच ती गुंतवणूक योग्य ठरेल. कारण तेच रिस्क रिवॉर्ड रेशो.