नल माखल्या साफ करुन त्या गोल कापा. ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.
ह्या रिंग्ज स्वच्छ धुवून त्याला हिरवी पेस्ट लावा, मिठ लावा.
ह्या रिग्ज आता कुकरमध्ये १५ मिनीटे शिजवून घ्या.
आता हळद, मसाला, लिंबूरस चोळूण घ्या.
एका भांड्यात बेसनचे पिठ किंवा कॉर्नफ्लॉवर भजीप्रमाणे भिजवून घ्या. ह्यात दुसरे काही टाकण्याची आवश्यकता नसते. वाटल्यास चिमुटभर मिठ आणि मसाला टाका. (मी बेसन घेतले आहे.)
आता रिंग्ज ह्या मिश्रणात डुबवून तापलेल्या तेलात डिप फ्राय करुन घ्या.
झाल्या तय्यार माखली च्या रिंग्ज.
नाव इंग्लिश मराठी मिच केल आहे. बर वाटत वाचायला. स्क्विड्स रिंग्ज वाचल की बाहेरच्या देशातली डिश वाटते.
मोठ्या माखलीच्या पण अशा रिंग्ज होऊ शकतात. पण कुकर मध्ये आधी चांगल्या शिजवून घ्यायच्या.
ह्या रिंग्ज अगदी चिकन क्रिस्पीच्या तुकड्यांसारख्या लागतात. मला शंका आहे की हॉटेलमध्ये चिकन ऐवजी माखलीच वापरत असतील.
साईड डिश म्हणूनही जेवणात खपून जाते.
वा वा मस्त प्रकार वाटतोय.
वा वा मस्त प्रकार वाटतोय.
कलमारी. आहाहा, लेकीचा आणि
कलमारी. आहाहा, लेकीचा आणि माझा आवडता पदार्थ... आम्ही हाटीलातच खाल्लाय हा प्रकार. इटालियन स्पाईसेस घातलेला.
भारतीय मसाले पण मस्तच लागतील.
तरी काल मला वाटलं होतं बरं
तरी काल मला वाटलं होतं बरं का, फोटो पाहून, की हे स्क्विडसच असणार.
याची देशी नावं टाकलीत, ते बरं केलंत, मंडळी... पुन्हा कधी कुठल्या मेनूकार्डवर दिसलं तर दुर्लक्ष केलं जाणार नाही
लले.. (पुढच काहीच न सुचलेला
लले.. (पुढच काहीच न सुचलेला बाहुला)
वांद्र्याला माखली मिळतात.
वांद्र्याला माखली मिळतात. आणून एकदां प्रयत्न केला पण पदार्थ साफ फसला होता; आतां पुन्हा करायला प्रेरणा मिळाली. जागूजी, नेहमीप्रमाणे सलाम.
जागू ताई १५ मिनीटे आणि तेही
जागू ताई १५ मिनीटे आणि तेही कुकर मध्ये जास्त होणार नाहीत ना?
बाकी मस्त रेसिपी....
नक्की करून बघणार....
याची देशी नावं टाकलीत, ते बरं
याची देशी नावं टाकलीत, ते बरं केलंत, मंडळी... पुन्हा कधी कुठल्या मेनूकार्डवर दिसलं तर दुर्लक्ष केलं जाणार नाही >>>>>>> +१
छान आहे रेसिपी
छान आहे रेसिपी
चुकांची दुरुस्ती केली
चुकांची दुरुस्ती केली आहे.
देवू माखली जास्त शिजवली तरी नरम किंवा कुस्करत नाही. कडकच राहते.
मस्तच!!!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!!!
मस्त!
मस्त!
Pages