मांसाहारी स्टार्टर्स १) माखली च्या रिंग्ज.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 December, 2013 - 02:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोट्या नल माखुल
आल,लसुण्,मिरची,कोथिंबीर पेस्ट
हळद अर्धा चमचा
मसाला १ चमचा
अर्धा चमचा लिंबाचा रस
मिठ गरजेनुसार
बेसन किंवा कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर

क्रमवार पाककृती: 

नल माखल्या साफ करुन त्या गोल कापा. ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.

ह्या रिंग्ज स्वच्छ धुवून त्याला हिरवी पेस्ट लावा, मिठ लावा.

ह्या रिग्ज आता कुकरमध्ये १५ मिनीटे शिजवून घ्या.

शिजवलेल्या रिंग्ज.

आता हळद, मसाला, लिंबूरस चोळूण घ्या.

एका भांड्यात बेसनचे पिठ किंवा कॉर्नफ्लॉवर भजीप्रमाणे भिजवून घ्या. ह्यात दुसरे काही टाकण्याची आवश्यकता नसते. वाटल्यास चिमुटभर मिठ आणि मसाला टाका. (मी बेसन घेतले आहे.)

आता रिंग्ज ह्या मिश्रणात डुबवून तापलेल्या तेलात डिप फ्राय करुन घ्या.

झाल्या तय्यार माखली च्या रिंग्ज.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ डिश तर हविच.
अधिक टिपा: 

नाव इंग्लिश मराठी मिच केल आहे. बर वाटत वाचायला. Lol स्क्विड्स रिंग्ज वाचल की बाहेरच्या देशातली डिश वाटते.

मोठ्या माखलीच्या पण अशा रिंग्ज होऊ शकतात. पण कुकर मध्ये आधी चांगल्या शिजवून घ्यायच्या.

ह्या रिंग्ज अगदी चिकन क्रिस्पीच्या तुकड्यांसारख्या लागतात. मला शंका आहे की हॉटेलमध्ये चिकन ऐवजी माखलीच वापरत असतील.

साईड डिश म्हणूनही जेवणात खपून जाते.

माहितीचा स्रोत: 
कधीतरी ऐकीवात आलेले.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय.. मी हा मासा कित्येकदा पाहिलाय पण घ्याय्चे धाडस कधी केले नाही.... आता रिंग्स क्रुन पाहिन एक्दा.

आधी शिजवुन घेणे जरुरीचे आहे का गं? तळताना पण शिजवणे होणारच आहे म्हणुन विचारते.

साधना माकुळला मटणाइतकाच वेळ शिजायला लागतो. डियरेक्ट शिजवताना मग जे कोटींग आहे ते करपेल आणि वेळही खुप लागेल.

इन्ना Happy

मस्त. हा अशक्य भारी प्रकार गोव्यात कलमारी म्हणून मिळतो. ब्राझिलमधे लूला. पुण्यात पण मिळतो, नाव वेगळच आहे.
आधी उकडून करतात माहिती नव्हते. त्यामुळे चिवट व्हायचे.

माझ्या साबा लसुन ठेचुन, लिंबु व लाल तिखट लावुन ठेवतात थोडा वेळ. मग तेल न टाकता माखलि frying pan मधे टाकुन थोडे पाणि टाकुन झाकण ठेवुन मंद गॅस वर ठेवतात. त्यामुळे आधि शिजवुन नाहि घेत. चिवट पण नाहि होत.

हा प्रकार विरार जवळ बोळिन्ज येथिल एम एम होटेल मधे कादेलि चिल्लि ह्या नावने प्रसिध्ध आहे.

आणि खूप टेस्टि असतो फक्त बेसन ऐवजि कोर्न्फ्लोवर वापरत असावेत तेथे.

जागु रेसिपि छान आहे.

अन्जली असे नुसते कालवण किंवा सुके शिजवताना नो प्रॉब्लेम पण आपण केलेले बेसनचे किंवा कॉर्नफ्लॉवरचे कव्हर जास्त शिजवल्याने जळू नये म्हणून आधी शिजवून घेतले.

निलुदा बाहेर कॉर्नफ्लॉवरच वापरतात.

हे असं अजुन किती छळायचं ठरवलयसं तु जागु???????????????ते म्हणतात नं की "सहन होत नाही आणि सांगनाही येत नाही" एक्झॅक्ट्ली तशी परीस्थीती करुन ठेवतेस तु. ईकडे माकलं मिळत नाहीत आणि त्यातुन तुझे असे कातिल फोटो . तुझा त्रिवार नाही अनेक वार निषेध!!

जागु मि कालच मनात आठवण काढ़लि.;)... खुप दिवस रेसिपि नाहि आलि... पन हे मासे आमच्या कडे नाहि आणत.

वॉव! महामस्त दिसताहेत.

पण हे ऑक्टोपस नाहीत. हे स्क्वीड. माहिमच्या फ्रेश कॅचमध्ये खाल्लेय याची प्रिपरेशन.

ho me khalay he ...कलमारी...crispy khup chan lagatat.....

दक्षु दी...अग हे बाकी कशाही पेक्षा अप्रतीम लागतं.......बघुन नाही खाउन सांग....जागु दी कडे नाहीतर माझ्याकडे ये....मी तुझ्या न कळत तुला खाउ घालेन....आवडेल तुला....:)

जागु दी नेहेमीप्रमाणेच चुम्मेश्वरी रेसिपी आहे ही......मम्मी बनवते ना हे तेव्हा मी पुरवुन पुरवुन खाते....
माकुल असं काय तसं काय कसही छानच लागते...
जागु दी....सुकलेल्या माकलीच्या आंबट तिखट कालवणाची रेसिपी टाक ना.....आणि प्लीज त्यात खोबरं नको...चिंचेच्या कोळाचं कालवण.....यम्मी....

तोंपासु ! . इथे कलामारी रिंग्ज, किंवा कलामारी फ्रिटी या नावाने बर्‍याच रेस्टॉमधे मिळतात. चिल्लर पार्टीची आवडती डिश आहे पण घरी कधी केली नाही.
कुकरमधून आधी शिजवून घ्यायची आयडीया भारी आहे. पुढच्या वेळेस एशियन मार्केटला गेले की नक्की आणेन स्क्विड्स.

अंधेरी इस्टला महाराजा नावाचे रेस्टॉ आहे. त्यांच्याकडे चिली वंडा म्हणून स्टर फ्राय स्क्विड्स मिळतात. तो प्रकारसुद्धा भारी लागतो.

मेधा आणतेस? आण बापडी साफ करायला खूप वेळ लागतो (साफ करणार्^याचं मत)

मागे एकदाच आणले आता नवरा मुकाट्याने कलामारी रिंग्जच मागवतो..

जागू, तू गुणाची बाय आहेस झालं...मस्त साग्रसंगीत टाकलीस रेसिपी....अन्नदाता सुखी भव... Happy

आमच्या इथल्या दुकानात साफ करून रिंगा करुन मिळतात. कधी कधी तयार पॅक्स पण असतात - पण मी शक्यतो असे पॅकबंद सीफूड घेत नाही.

जागुले ...अगं काय काय करतेस?
नल दमयंती माहिती होती गं! मज अदन्यानी पामरास वाट्लं ़ बहुतेक टायपो असावा.......:फिदी:). खरंच गं????
नल माखला काय झेपलं नाय.......असो...... पदार्थ चांगलाच. असावा.

Pages