कमवा आणि शिका

Submitted by चंपक on 5 December, 2013 - 04:14

नमस्कार, आज मी आपल्याशी ग्रामीण भागातील एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणुन संवाद साधत आहे. आमचे महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगांव या तालुक्याच्या ठिकाणी आहे. आमच्या महाविद्यालयात आम्ही पुणे विद्यापीठा द्वारे चालवली जाणारी "कर्मवीर भाऊराव पाटील- कमवा आणि शिका" योजना सुरु केलेली आहे. २०-२५ विद्यार्थी विद्यार्थीनी त्यात सहभागी होउन आपल्या शिक्षणाचा खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करित आहेत. ग्रामीण आणी दुष्काळग्रस्त भाग असल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. आमचे महाविद्यालय त्यांना पाठबळ देत आहेच.

परंतु, अशा परिस्थीतीतील विद्यार्थ्यांमधुन जर नवीन उद्योजक घडवता आले तर? असा विचार मनात ठेवुन मी आपणा सर्वांना विनंती करतो कि, आपण या विद्यार्थ्यांना वैयक्तीक वा सांघिक पातळीवर कमी भांडवलाचे उद्योग सुचवावेत. तसेच, आपल्यातील काही उद्योजकांना जर लेखनकाम, टायपिंग, संगणक जॉब वर्क करणारे (शेवगांव मध्ये बसुन ही कामे केली जाऊ शकत असतील तर) मुले-मुली हवे असतील तर आम्हाला संपर्क करा. २० ते २५ विद्यार्थी ज्यांना संगणकाचे अन टायपिंग चे जुजबी ज्ञान आहे, त्यांना थोडेसे ट्रेनिंग देउन हे काम करवुन घेतले जाउ शकेल.

धन्यवाद!

प्राचार्य
Email: pmt(dot)acsc(at)gmail(dot)com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्तुत्य उपक्रम.
पण काही प्रश्न आहेत.
१) संगणकविषयकच उद्योग हवेत की विपणन करू शकतील असे उद्योगही चालतील. (जसे शेवगाव ते आहेमाद्नगर आणि आसपासच्या दुकानदारांना काही वस्तू इथून मुंबईतून मिळवून देणे आणि बर्यापैकी उत्पन्न कमावणे)
२) फ्रांचायजी घेणे (वाचनालयाची फ्रांचायजी मी देऊ शकतो.मेम्बेर्स वाढवणे हे त्यांनी करावे. ते हि संपूर्ण जिल्ह्य करिता. )

जर उद्योजक घडवायचे असतील तर टायपिन्ग,जोब वोर्क पुरते मर्यादित ना ठेवता त्यांच्यात उद्योजकता रुजवायला हवी. मग येणारा पैसा कुठे कसा गुंतवावा हे मार्गदर्शन हवे तसेच जनसंपर्क कसा वाढवावा हे कळायला हवे.....अर्थात उद्योजकतेचे बाळ कडू आतापासून द्यायला हवे.

माझे वरील लिखाण आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिती ह्यात विसंगती असेल कदाचित पण जर तुम्ही मला संपर्क साधलात तर तुमच्याशी बोलून नक्कीच काहीतरी मार्गदर्शन मी करू शकेन.

संपर्का करिता ९९३०९०१९८८

चंपक, उत्तम योजना.

ही मुले भाषांतराचे. टायपिंगचे, डीटीपीचे इत्यादि काम करू शकतात का? तसे असेल तर मी थोडीफार माहिती देऊ शकेन.

त्याव्यतीरीक्त या मुलांपैकी कुणी आर्ट्स क्राफ्ट्स चित्रकला मधे कौशल्य असतील तर त्या वस्तू बनवून घेऊन ऑनलाईन विक्री करता येऊ शकते. तसेच, शिक्षणामधे शिकवलेले टेक्निकल स्किल्स वापरून इलेक्ट्रीशीयन, प्लंबिंगसारक्खी कामे करणे. एखाद्या वस्तूंची एजन्सी घेणे (परंतु यामधे त्या मुलांना फार फिरावे लागेल. शिक्षण सांभाळून करता येणे कठिण आहे).

सांघिक पातळीवर तर ही मुले भरपूर काम करू शकतील. मसाले, पापड सारखे गृहोपयोगी वस्तू अथवा अहार्डवेअर, संगणकाचे वगरिएगैरे वस्तू मुंबईतून आणून नगरमधे विकणे. घरोघरी पुस्तके नेऊन देणारे वाचनालय चालवणे.

उत्तम उपक्रम!! हार्दिक शुभेच्छा!

ह्या काही गोष्टी मुलांना महाविद्यालयाच्या आवारात करता येऊ शकतील

१. कंपोस्ट प्रकल्प : महाविद्यालयातील, आवारातील ओला कचरा जमा करून त्याद्वारे कंपोस्ट बनविणे. ह्या कंपोस्टची विक्रीही केली जाऊ शकते.
२. गांडूळ खत प्रकल्प - गांडूळ खताची विक्री.
३. रोपवाटिका - नर्सरी : छोटी छोटी रोपटी तयार करून त्यांची विक्री, बियाणाची विक्री.

या सर्व उद्योगांसाठी महाविद्यालयातील जागा व स्रोत वापरता येतील.

याशिवाय कर्व्यांच्या ए आर टी आय संस्थेशी किंवा तत्सम काम करणार्‍या संस्थांशी टाय-अप करूनही काही करता येऊ शकेल.

आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

आज्ञा: वाचनालयाबद्दल अधिक माहितीसाठी फोन करतो.

नंदिनी: भाषांतर आणि टायपिंग ची कामे करु शकती. सविस्तर मेल पाठवल्यास पुढील कार्यवाही करता येईल.

अरुंधती: रोपवाटीकेचे नियोजन सुरु आहे. २० गुंठे पॉलीहाऊस मंजुर करुन घेतो आहोत. ५ एकर जागा उपलब्ध केली आहे.