अजून एक विश लिस्ट

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्‍याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही. तरी सुद्धा एक डोळा रस्त्यावर अन एक लोकांच्या अंगणातल्याअ झाडा पानावर ठेवून ड्राइव्ह करणं तितकसं कठीण नाही - थोडं खरंखुरं मल्टी टास्किन्ग अन थोडं विंडोज सारखं टाईम स्लाईसिंग केलं की झालं!

यंदाची या सीझनची विश लिस्ट अशी
विस्टेरिया - कसले नाजूक फुलांचे घोस लगडलेले असतात. पांढरे, गुलाबी अन फिकट जांभळे घोस वार्‍याने डुलताना पाहिलं की गाडी तिथेच कडेला घेऊन थोडावेळ फुलांकडे बघत बसावंसं वाटतं.
लायलॅक - जुन्या घरात ६-७ फुटांची मोठी झाडं होती. एखादाच गुच्छ जरी घरात आणला तरी सगळं घर दरवळून जात असे.
जांभळे बिअर्डेड आयरिस - ते ज्यांनी पाहिलेत त्यांना कळेल मला का हवेत ते.
पॉपी - होम डेपो च्या बोडक्यावर मी किती पैसे ओतलेत ह्याच्या बियांकरता अन झाडांकरता. पण आमच्या नशिबी' अंगणात पॉपी फुलणे' योग नसावा बहुधा!
हिरवा अन लाल जपानी मेपल - लॉटरीच लागायला हवी ही झाडं घ्यायची म्हणजे. यंदा छोटी रोपटी मिळाली तर ती तरी लावीन म्हणते.
हरणं न खारी यांच्या पासून बचाव होतील असे ट्युलिप अन डॅफोडिल. महागडे कंद मागवायचे. कंबरडं मोडेस्तोवर ते एक एक करून जमिनीत पुरायचे . शेवटी कंद खारी खातात अन कोवळी पानं आली की हरणं फस्त करतात Sad
सध्या येवढंच पुरे - पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी!

विषय: 
प्रकार: 

शोनू<<हिरवा अन लाल जपानी मेपल >> घ्यायचा म्हणते आहेस तसाच dogwood (शक्यतो पांढरा) आणि cherry (शक्यतो गुलाबी) हा पण मस्त पर्याय आहे. मला ही दोन्ही झाडं जाम आवडतात. त्यातलही एकच निवडावं लागलं तर dogwood. जेव्हा झाडं मोठ्ठी होउन फुलतिल तेव्हा केवढा आनंद देतील.
प्राजक्ता

शोनु, तुझी विश लिस्ट पुर्ण होवो हि सदिच्छा. बाकि नविन माहिति दिल्याबददल धन्यवाद Happy

ही असली झाडं कंच्या देशात उगीवत्यात? आमास्नी फकस्त झेन्डू , गुलाब, चाफा, तगर, जाइ जुइ, रातराणी, मोगरा आन पारिजात ठावं हाय... जरा चित्रं टाकली असतीत तर बरं झालं असतं की! (काय लेख वाचतोय का बॉटनीचा सिलॅबस अस उगाचच वाटतय बघा न्हायतर!)

मला पण नावं वाचून कळेना.. मग गुगल केलं.. अप्रतीम आहेत हो सगळी झाडं! जांभळा रंग खूप आवडतो का? Happy

पांढरं डॉगवूड आहे अन एक फिकट गुलाबी फुलं असलेलं क्रॅब ऍपल पण आहे अगोदरच. गुलाबी डॉगवूडचं रोप द्यायचं कबूल केलयं एका मैत्रिणीने.

चित्रांची लिंक टाकते शोधुन . Gardenweb.com या साइटवर पण चिकार माहिती सापडेल. मायबोली खालोखाल त्या साइटची चटक आहे मला Happy

.......... आणि अन्गणात हरणं येत्यात म्हणं .. आमच्या अन्गणात चिमन्या, कावळं खारी कुत्री आणि मान्जरंच येत्यात.....

बरं येऊ देत अन्गणात हरणं ( पण सोन्याचं हारीण आलं तर नवर्याकडे हट्ट करू नगा म्हणजे झालं )

शोनू, मॅग्नोलिया विसरलीस? Happy

आहे, आहे तो पण आहे. अगदी छोटसं झाड आहे सध्या - जेमतेम चार फूट असेल. पण ५०-६० फुलं लागली होती या वर्षी. होईल हळू हळू मोठं.
फोरसिथिया, ब्लीडिंग हार्ट ( Dicentra ), मार्चच्या मध्यावर फुलणारे अन वसंताची चाहूल दाखवणारे क्रोकस हे ही हवेच आहेत. शिवाय जुलै-ऑगस्टमधे फुलणारे clematis !

परवा एक हर्ब सोसायटीचा हर्ब सेल आहे चेस्टर स्प्रिन्ग्स मधे. मी जाणार आहे. मागच्या वर्षी वेड्यासारखी लंच टाइम मधे गेले होते ( इस्त्रीचे कपडे, उंच टाचांचे बूट इत्यादी) शिवाय दहाला सुरु होणार्‍या सेल ला साडेबारा गेल्यावर उरलं सुरलं काही तरी आणलं शेवटी. ( मरवा, गवती चहा, थाय बेसिल मिळाले. पार्स्ले संपा. )

यंदा सकाळी अर्धा दिवस दांडी मारून जाणार आहे. बागकामाची जींस, मळका स्वेट्शर्ट, अन झाडं घालून गाडी पर्यत आणायला little red wagaon पण घेऊन जाणार आहे.
कोणी येता का?

Herb Society of America, Philadelphia Unit
69th Annual Herb Sale at Historic Yellow Springs
May 8, 10 am - 1:30 pm
Art School Road in Historic Yellow Springs
Chester Springs, PA 19425
Contact: Evie Baird, 610-469-0655, ccrunch@earthlink.net

आज एक वेलचीचं रोप मिळालंय. माझ्या आजोळी बर्‍याच जणांची वेलची ची शेती आहे. लहान पणी पाहिली होती झाडं . इथे कधी त्याच्या लागवडी बद्दल पाहिलं ऐकलं नव्हतं. आता मी पण वेलची बागायतदार होईन म्हणते.

जांभळे बिअर्डेड आयरिस - ते ज्यांनी पाहिलेत त्यांना कळेल मला का हवेत ते. >> Happy १२ लावलेले, त्यातले ससे नि खारीने बरेचसे फस्त केले. त्यातऊन उरलेल्या दोघांना फुले आली आहेत. अप्रतिम !!!!

पण आमच्या नशिबी' अंगणात पॉपी फुलणे' योग नसावा बहुधा!>> सेम पिंच Sad

hyacinth लावत नाहिस का ? deer नि rabbit proof असतात.

मला मैत्रिणीने बर्‍याच बिया दिल्या होत्या पॉपीच्या, पण यावर्षी लावायलाच विसरले.

मागच्या वर्षी क्रीपिंग फ्लॉक्स, कोरिऑप्सिस अन अ‍ॅस्टिल्बी लावले होते. ते अगदी मस्त पैकी आलेत यावेळी.
सासरहून गुलबाक्षीच्या बिया आणल्या होत्या त्या रुजल्या आहेत . हरणांची नजर नाही गेली म्हणजे मिळवली.

दोन वर्षापूर्वी डझनभर जांभळे अन ८-१० मिस्टरी आयरीस लावले होते. त्यातले बरेचसे यावर्षी फुललेत - मिस्टरी वाले पिवळे / ब्राउन निघाले.