"दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣

Submitted by जिप्सी on 2 October, 2013 - 12:56

"आज शाहे जहाँगीर दमे नजायूं जुस्तबंद
बा ख्वाहिशे दिल गुप्त कि कश्मीर दिगर है च "

याचा अर्थ मृत्युनंतर स्वर्ग कोणी पाहिलाय, पण जीवनात ज्याने काश्मिरची भूमी पाहिली त्याला पुनः पुन्हा येथे यावसं का नाही वाटणार! खरंतर स्वर्ग उपभोगण्यासाठी मृत्यु आवश्यक आहे का? का मृत्युपूर्वी स्वर्ग अनुभवताच येणार नाही? याच उत्तर एक आणि एकच "काश्मिर". काश्मिरच्या एका बाजुला नाजुक सौंदर्याने नटलेले कश्मिर खोरे, बर्फाने झाकलेली शिखरं, घनदाट जंगल, देवदारचे सुंदर वृक्ष, दल सरोवर, अक्रोड, सफरचंदांनी लगडलेली झाडे, केशरची निळी फुले आणि त्यातुन डोकावणारे केशर, मुघल बागा तर दुसरीकडे रौद्र सौंदर्याने नटलेला लडाख परीसर, काळजाचा ठोका चुकवणारे "पास", मॅग्नेटिक हिल्स, निळाशार पँगाँग सरोवर, जगातील सर्वात उंचीवरचे मोटरेबल रोड, शांत, सुंदर आणि बौध्द धर्माच्या खुणा बाळगणारे बौध्द गोंफा (मॉनेस्ट्रीस), निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेले शीत वाळवंट म्हणजेच नुब्रा व्हॅली.

खरंतर लेह लडाखच्या सौंदर्याने आधीच (हो अगदी ३ इडियटच्याही आधी :-)) मनावर गारूड केले होते पण जाण्याचा योग काहि जुळुन येत नव्हता. गेल्या वर्षी श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्गला भेट देऊन झाली त्यामुळे या वर्षी लडाखवारीचा बेत नक्कीच करायचा ठरला. "एक तरी वारी अनुभवावी" या उक्तीप्रमाणेच "एकदा तरी लेहवारी घडावी" अशी जबरदस्त इच्छा होती. योग जुळुन आला आणि या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला श्रीनगर-कारगिल-लेह-सार्चु-मनाली-चंदिगड असा लेहचे दोन्ही प्रवेशद्वार पाहिले.

काश्मिर खोर्‍यातुन लडाखला निघाल्यावर सोनमर्गच्या पुढे निसर्ग कूस बदलतो. झोझीला पासच्या अलिकडचा निसर्ग हा नाजुक तर पलिकडचा रौद्र. पण दोघांचीही बात काही औरच. एकदा का तुमचे पाऊल लडाखमध्ये पडले तर सारा निसर्गच तुम्हाला म्हणतो, "वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बांहे जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे..."

चला तर या स्वप्ननगरीची सैर करूया, कारण फारसी मुग़ल बादशाह जहाँगीरने म्हटलेच आहे.
गर फ़िर्दौस बर रुए ज़मीन अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त।
(अगर इस धरती पर कहीं स्वर्ग है, तो वो यहीं है... यहीं है)

दल लेक (श्रीनगर)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
सोनमर्ग
प्रचि ०५
लेहच्या वाटेवर
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
हेमीस मॉनेस्ट्री
प्रचि ०९
नुब्रा व्हॅली (हुंडर)
प्रचि १०
डिस्किट मॉनेस्ट्री
प्रचि ११

प्रचि १२
पॅंगाँग सरोवर
प्रचि १३

प्रचि १४
लेह-मनाली रोड
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
तटि: माझ्या इतर मालिकेप्रमाणेच लेह-लडाख मालिका सादर करत आहे. ज्यात श्रीनगर ते लेह लडाख आणि लेह ते मनाली असा प्रवास चित्ररूपात मांडण्याचा मानस आहे. मायबोलीकर मार्को पोलो, सेनापती, केदार, इंद्रधनुष्य, साधना, जिवेश यांनी लडाखबद्दल भरभरून लिहिले असल्याने मी फक्त प्रचिच प्रदर्शित करत आहे. Happy इतर मालिकेप्रमाणे हि मालिकाही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. Happy

(क्रमशः)
(पुढिल भाग - दल लेक, सोनमर्ग, झोझीला, द्रास, कारगिल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages