जखमेला कुठुन सुवास...

Submitted by मयुरेश साने on 30 November, 2013 - 00:28

येतो अन् जातो श्वास
जगणे हा फक्त आभास

नशिबाची भूक अघोरी
घेते स्वप्नांचा घास

घमघमते तिने दिली तर
(जखमेला कुठुन सुवास)

सारीच न वाहुन जाती
दुख्खे ही असती खास

ती कसली प्रयोग शाळा
नाविन्य जिथे नापास

काहीच नकोसे वाटे
उज्वल आणी भकास

नेहमीचा रस्ता आला
कसलाच न आता त्रास

जगण्याचे कारण बनला
हा झपाटलेला श्वास

भले भले ही रडले
तू खुळ्या प्रमाणे हास

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users