मौन

Submitted by कविन on 18 June, 2009 - 23:33

निशब्द सांजशा वेळी
तनू छेडीता धून,
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौन

अस्पर्श मनीचा डोह
उठता झंकारुन,
तरंगातुनी त्याच्या
ही तान घेतसे मौन

सुरावटींचा साज
लेवुन गातसे मौन,
निश्वासाचे अर्थ बघ
कसे सांगते मौन

अक्षय गाणे अपुले
ही अद्वैताची खुण,
बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋण

गुलमोहर: 

मस्त ,
अक्षय गाणे अपुले
ही अद्वैताची खुणं,
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौनं
कवी सह्हीच एकदम Happy

छान वाटतय कवी आता मस्त !

निशब्द सांजशा वेळी
तनू छेडीता धून,
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौन

छान आहे ! Happy
**********
मी एक Parasite !

सुरेख ! बदलांचं मनावर घेतल्याबद्दल धन्स !!

***********************************

नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !

कविता, सहजता भावली

सस्नेह
देवनिनाद

व्वा Happy

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

बोलके मौन...... ह्म्म मस्त !! Happy

छानच.

सुरेख ! कविता, आज अगदी नाव सार्थ करायचेच ठरवलेय वाटतं Happy

अक्षय गाणे अपुले
ही अद्वैताची खुण,
बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋण

खुप सुंदर..

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋण
सुंदर.............

फारच छान,
विक्रांत