इंद्रवज्र - चौथ्यांदा दिसलेले

Submitted by UlhasBhide on 3 November, 2013 - 13:20

इंद्रवज्र - चौथ्यांदा दिसलेले

आज अचानक ’इंद्रवज्र’ हा धागा नजरेस पडला आणि मला दिसलेल्या इंद्रवज्राच्या आठवणी परत एकदा शेअर करायची इच्छा झाली. (चंद्राभोवती पडणार्‍या खळ्याप्रमाणे) सूर्याभोवती दिसणारे सप्तरंगी वर्तुळ म्हणजेच इंद्रवज्र मला आजवर ४ वेळा जमिनीवरून दिसले आहे. त्यातील दोन वेळा तर चक्क मुंबईतून.

यापैकी ३ वेळच्या आठवणी मी या http://www.maayboli.com/node/18940 धाग्यात (धाग्यावरील टायपोसाठी क्षमस्व.) ३ वर्षांपूर्वीच शेअर केल्या आहेत. याला इंद्रवज्र म्हणतात हे मला पूर्वी माहित नव्हते म्हणून मी ‘इंद्रवलय’ असे नाव दिले होते.

चौथ्या वेळी हे इंद्रवज्र (२८-९-२०११) रोजी सकाळी ११-१५/११-३० च्या सुमारास मला दिसले होते.
मी माझ्या घराजवळील बोरिवली-दत्तपाडा या विभागात वाण्याच्या दुकानात काही जिन्नस आणायला गेलो असता, सहज आकाशाकडे नजर गेली आणि विलोभनीय अशा इंद्रवज्राचं दर्शन घडलं. इंद्रवज्र म्हणजे सूर्याभोवती पूर्णवर्तुळाकार सप्तरंगी रिंगण, जे सूर्य डोक्यावर असताना, जमिनीवरून क्वचितच दिसू शकते. त्या इंद्रवज्राच्या वर्तुळाचा जेमतेम १५% भाग वगळता बाकी भागात हे सप्तरंगी वलय सुमारे १५/२० मिनिटांपर्यंत सहज दृश्यमान होत होते. नंतर हळू हळू ते विरळ होत गेले.

इंद्रवज्र दिसताक्षणीच मी मोबाईल वरून त्याचे २ फोटो काढले. अर्थात् इतक्या मामूली कॅमेर्‍याच्या सहाय्याने फारसे चांगले फोटो येणं शक्य नव्हतं. त्याचप्रमाणे माणसांची वर्दळ, ट्रॅफिक आणि रस्त्यावरची उंच झाडे हे अडथळे टाळून पूर्ण वर्तुळाचा फोटो घेता येणे कठीणच होते.

रस्त्यातील अनेकांना ते अपूर्व दृश्य मी दाखवलं. काही लोकांनी फोटो काढले, तसेच १-२ अपरिचित माणसांनी माझ्या मोबाईल वरील फोटो Blue-tooth च्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलवर transfer करून घेतले.

मी काढलेले फोटो :
(पूर्ण वर्तुळाचा फोटो काढणे जमले नाही)

Indrawalay2.jpgIndrawalay3.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकाका,
मुंबईत राहून पार वर आकाशात दिसणारे असे दुर्मिळ दृष्य पहाणारे तुम्हीही अगदी दुर्मिळच की ....

मस्त फोटो .....

सूर्याभोवती दिसणारे सप्तरंगी वर्तुळ म्हणजेच इंद्रवज्र
>> ही माहिती नवीन आहे. ३६० डिग्री इंद्रधनुष्यालाही इंद्रवजच म्हणतात.