देवपूजेत देवाला पंचामृताने स्नान का घालतात?

Submitted by राहुल१२३ on 13 November, 2013 - 03:23

देवपूजा करताना देवाला(त्याच्या मुर्तीला) १६ प्रकारचे उपचार अर्पण करतात. हे उपचार आपण एखाद्या व्यक्तीला जसे घरी बोलावतो (आवाहन), बसायला आसन देतो (आसन), हातपाय धुवायला पाणी देतो (अर्ध्य्-पाद्य) इत्यादी असतात.

यातले बहुतेक उपचार आपल्याला स्वतःला जे जे आवडत असते, ते असतात. जसे आपण जेवतो, म्हणून देवाला देखील नैवेद्य दाखवतो. आपण जेवणानंतर विडा खातो, म्हणून देवालाही विडा देतो. आपल्याला कोणी पैसे दिले तर आवडते, खुष होतो, म्हणून आपणही देवाला दक्षिणा म्हणून पैसे देऊन खुष करायचा प्रयत्न करतो.

आपण आंघोळ करतो म्हणून देवालाही आंघोळ घालतो. थंड पाण्याने, गरम पाण्याने, सुगंधी जलाने आंघोळ घालणे ठीक आहे, पण देवाला दुध, दही, मध, तूप, साखर अश्या पंचामृताने का आंघोळ घालतात?
कोण्या व्यक्तीला कधी मधाने, तुपाने, साखरेने आंघोळ घातलेली बघितली/ऐकली आहे का? मग देवाला अशी आंघोळ का घालतात?

काही ठिकाणी तर आंब्याच्या रसाने, उसाच्या रसाने पण अभिषेक केला जातो. याला काही अर्थ आहे का? उद्या तुम्हाला कोणी आंघोळीला बादलीभर आमरस दिला तर तुम्हाला चालेल का? Happy

शंकराच्या देवळात तर अनेकदा पिंडीला दहिभात लिंपून ठेवतात. कधी तुम्हाला दहिभात खायला द्यायच्या ऐवजी तुमच्या तोंडाला फासला तर?

साऊथमध्ये तर अनेक देवींच्या तोंडाला सदा न कदा हळदीचा लेप लावलेला असतो. गोरे होण्यासाठी स्त्रिया हळदीचा लेप, फेसपॅक वगैरे लावतात ते ठीक आहे. पण मुर्त्यांना २४ तास हळद लावून देवी(?) गोरी व्हायच्या ऐवजी पिवळी नाही का होणार? Happy

अश्या विचित्र पुजेच्या प्रकारांनी देवांच्या मुर्त्या झिजू लागल्यात. ओंकारेश्वराला तर दुधाच्या सततच्या अभिषेकाने पिंडीचा आकारच बदललाय. मध्ये पंढरपूरात पण विठ्ठलमुर्तीला अभिषेकापासुन होणार्‍या झिजेपासुन रक्षण म्हणून कसला तरी वज्रलेप दिला होता.

हे असे दुध, दही, मध यांनी रोज रोज अभिषेक करुन मुर्त्या झिजून गेल्या तर? पुढच्या पिढ्यांना बघायला तरी मुर्तीचा अंश उरेल का?

पंचामृताने आंघोळ, आमरसाने आंघोळ असे प्रकार कोणी सुरु केले असावेत? का? की पुर्वी खरच लोक मध, तुप, साखर अश्या चिकट पदार्थांनी स्नान करायचे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंचामृत फेशियल मध्यंतरी फर फेमस होते. सौंदर्यवर्धनासाठी चेहर्‍याला मध, तूप, दही इत्यादिचा फेसपॅक सर्रास लावला जातो.

साऊथमधे देवीच्या मूर्तीलाच नव्हे तर बायकादेखील अंगभर तेल-हळद फासतात. मंगळवारी आनि शुक्रवारी आमच्या गावात येऊन बघा. सगळ्या बायका यलो यलो दिसत असतात.

फेशियल म्हणून थोडे तुप तोंडाला लावले तर ठीक आहे? पण इथे तर थेट आंघोळ?

साऊथमधे देवीच्या मूर्तीलाच नव्हे तर बायकादेखील अंगभर तेल-हळद फासतात. >>
अरे बापरे! यांचे कपडे पिवळे नाही का होत? हळदीचे डाग मग कसे काढत असतील?

पंचामृताच्या अंघोळीच माहित नाही परंतु कांती सतेज आणि तुकतुकीत ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात दूध घातलतात अस वाचल होत, खर खोट माहित नाही
देवपुजेत पंचामृत स्नानानंतर उन पाण्याने सुद्धा अंघोळ घालतात ते या पदार्थांचा चिकटपणा जावा म्हणुनच असेल. त्यामुळे माणसही अश्या अंघोळी करत असतील अस समजायला काही हरकत नाही... अस आपल माझ मत....

दूधाने आंघोळ केले की खूप मस्त वाटते.
मी अनेकदा केली आहे. त्याच पाण्यात थोडा मधही घातला तर अजून मस्त.
तुपाने मात्र आंघोळ नाही केली. तुपाने अंग मर्दन केले आहे त्यानंतर दूधाने आंघोळ. मस्त वाटते.

आम्हाला पायजेल म्हणून आमी घालतो. तुमी नका "घालू" >>>> अहो गप्पिष्ठ त्यांना पण घालायची असेल पण दुध, दही, तुप मधासारखे महागडे पदार्थ तीर्थ म्हणुन झाडांना घालण्याआधी त्यांना त्याच कारण विचारावस वाटल असेल.... हो की नाही हो राहुल??

हो मला त्यामागचे कारणच विचारायचे आहे. पंचामृत झाडांना घालण्यापेक्षा तीर्थ म्हणून प्यायला छान लागते.

पंचामृत झाडांना घालण्यापेक्षा तीर्थ म्हणून प्यायला छान लागते.

मग प्या की! घरादारातले असेल नसेल तेव्हढे सगळे पंचामृत देवावर नि नंतर झाडांना घालावे असे नसते काही!!

मुळात माणसाने देव केला नि तो माणसासारखाच आहे, नि त्यालाहि माणसा सारखेच सगळे सोपस्कार लागतात ही कल्पना केली की मग पुढे काय, वाट्टेल ती धमाल! सजूक तुपाचा शिरा काय नि काय काय, देवाला कणभर नि स्वतःला मणभर!!

भारत नि भारतीय म्हणजे फक्त लै धम्माल! अगदी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या!

" मुर्त्यांना" - मूर्ती ह्या शब्दाचं अनेकवचन मूर्ती असंच आहे, मूर्त्या नाही. लेखात अनेक ठिकाणी 'मुर्त्या' असा उल्लेख झाला असल्यामुळे ही प्रतिक्रिया दिली.

पंचामृत स्कीन साठी चांगलं असतं म्हणे. म्हणजे अंगाला लावून कांती सतेज होते. पोटातही घेतलेलं चांगलं.
देवांनाही तेज यावं म्हणून वापरत असावेत असा अंदाज.

देवाला कणभर नि स्वतःला मणभर!!
भारत नि भारतीय म्हणजे फक्त लै धम्माल! >>>> Proud

अवांतर: आमच्याकडे (वैष्णव) पंचामृताचे /तिर्थाचे लैच वेड आहे.

पंचामृताने आंघोळ, आमरसाने आंघोळ असे प्रकार कोणी सुरु केले असावेत? का? की पुर्वी खरच लोक मध, तुप, साखर अश्या चिकट पदार्थांनी स्नान करायचे?>>>> अहो हे सर्व करणारे लोक एवढा विचार करत असते तर काय हवं होतं !! Happy वाटीभर आमरसाच्या नैवेद्य काय कुणीही दाखवील, पण मी इतरांपेक्षा जास्त ग्रेट कसा/कशी , माझीच भक्ती इतरांपेक्षा जास्त हे कसं दाखवायचं? तू वाटीभर तर मी तांब्याभर, तू तांब्याभर तर मी बदलीभर, चला आमरसाने आंघोळच घालू देवाला ...असं सुरु झालं असावं ते. Happy अन मग सायंटिफिक बुवाबाजी करणार्‍यांनी त्याला आपसूक काहीतरी जड कारण दिलं असेल... मग काय, झालं पडली रीत !