मायबोली टीशर्टस्- २००९

Submitted by टीशर्ट_समिती on 11 June, 2009 - 05:06

आले! आले!! आले!!!

'मायबोली' टीशर्ट आले! सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

यावर्षी एक अभिनव प्रयोग म्हणून आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत. त्यांचं सुलेखन केलं आहे 'श्री. कल्पेश गोसावी' या प्रख्यात सुलेखनकाराने.

टीशर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत- पांढरा आणि मरून. यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
T-Shirt__white.jpgmaroon_tsh.jpg

टीशर्टाची किंमत आहे २००/- रूपये मात्र.
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.) टीशर्टांचे पैसे 'वर्षाविहारा'च्या पैशांबरोबर द्यायचे आहेत. त्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण २३ जून, २००९ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

ऑर्डर कशी नोंदवाल?-
tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.

ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टीशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टीशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकामार्फत
८. किती टीशर्ट?
९. रंग कोणता?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
XS - 34
S - 36
M - 38
L - 40
XL - 42
XXL -44

महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. टीशर्ट देशाबाहेर (गेल्या वर्षीसारखे) पाठवले जाणार नाहीत यावर्षी. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुण्या-मुंबईतल्या मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? Happy तर, झटपट ऑर्डर नोंदवा.

    दि.२६-६-०९ विशेष सूचना:-

    टी शर्टची ऑर्डर घेणे आता बंद झाले आहे तेव्हा कोणीही आता टी शर्टची ऑर्डर पाठवू नये...

    टी शर्टसचे पैसे प्रत्यक्ष भरण्याचे आणि टी शर्टस मिळण्याचे ठिकाण व वेळः-

    पुणेकर मायबोलीकरांसाठी:

    तारीख: ११जुलै (शनिवार) आणि १२ जुलै,२००९ (रविवार)

    स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा

    वेळ: सं. ५.३० ते ८.००

    मुंबईकर मायबोलीकरांसाठी:

    तारीख: १२ जुलै,२००९ (रविवार)

    स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात

    वेळ: सं. ५.३० ते ८.००

    पैसे टी शर्ट समिती सदस्यांकडे भरून टी शर्टस घेऊन जावेत... ज्यांनी ऑनलाईन पैसे भरले आहेत त्यांनीही आपले टी शर्ट याचवेळी घेऊन जावेत.

      धन्यवाद,
      टी-शर्ट समिती

      विषय: 

      नमस्कार
      मी माझी ऑर्डर नोंदवली आहे, पण मला अजून काहीच उत्तर मिळालेल नाही.
      कृपया याची नोंद घ्यावी.
      ----------------------------------
      मी आता ठरवलय.....
      एकच मारायचा पण जोरात आणि कडक....

      गेल्या सालच्या टीशर्ट पेक्षा फारच छान दिसतोय...

      मरून तर जरा काकणभर सरस वाटतोय (पेज च्या पांढर्‍या बॅकग्राऊंड शी जास्त चांगल्या असलेल्या काँट्रास्ट मुळे, पांढर्‍या टी-शर्टची बॅकग्राऊंड रंगीत असती तर तो ही उठून दिसला असता... पण फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन... त्यामुळे माझी ऑर्डर मरून ची...)

      आता सुलेखनाच्या बाबतीत...
      कल्पना मस्त आहे... पण थोडा लोच्या वाटतोय...
      आधी कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे अक्षर आणि काने यांच्यातलं स्पेसिंग बाकी आर्टवर्क च्या तुलनेत कमी आहे आणि त्यामुळे विचेत्र वाटतंय... {मयबेली}
      तसंच उभ्या रेषा फारच बारीक असल्यानी अक्षरं वेटेज च्या दृष्टीनी अन्स्टेबल वाटतायत आणि थोडी कमी अपील होतायत...
      अक्षरावरच्या रेघा ही कन्फ्यूजन वाढवतायत... बो, ली या दोन अक्षरावरच्या रेषा योग्य आहेत आणि त्या त्या अक्षराला आयडेंटिटी देणार्‍या आहेत. परंतु मा आणि य च्या बाबतीत मात्रं असं दिसंत नाही. बो आणि ली चं लॉजिक वापरलं तर म हे वेगळं अक्षर आणि काना अधिक य हे वेगळं दिसतंय... जर रेषेमधला खंड हा म आणि कान्याच्या मधे घेण्याऐवजी मा च्या कान्या नंतर आणि य च्या आधी असता तर त्या ही दोन्ही अक्षरांना आयडेंटिटी मिळून सुलेखन अधिक चांगलं दिसलं असतं...

      (कान्यांमधलं अंतर वाढवले असता, आणि अक्षरावरील रेषांमधला खंड हलवला असता टी-शर्ट्स असे दिसतील)-

      mabo1.jpgmabo2.jpg

      अर्थात ही माझी वैयक्तिक मतं आणि कल्पना आहेत...
      टी-शर्ट तर मी ऑर्डर करतोच आहे... पण पुढल्या वर्षी टी-शर्ट समिती या मुद्द्यांचा विचार करून अधिक चांगला टी-शर्ट सादर करेल अशी आशा करतो...
      _______
      चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

      मरून टि शर्ट मस्त दिसतोय..
      पण अक्षर आणि काने ह्यातली जागा थोडी वाढवायला हवी.. कदाचित लिंबू म्हणतो तसं टि शर्ट वर ते नीट दिसेल ह्या फोटो पेक्षा

      अ‍ॅन्क्या मस्तच एडिशन केलं आहेस.
      अ‍ॅडमिन - थोडं हे लक्षात घेता येईल का पाहता का?

      मी एक यूज़र आयडी वापरून अनेकवेला बुकिंग करू शकतो का?

      ओके.. अमेरिकेत येणार नसेल, तर मला पुण्या-मुंबईतूनच घ्यावा लागेल टीशर्ट! Sad कोणी आहे का, पुण्यातले जो माझ्यासाठी टीशर्ट घेऊन ठेवेल? आणि अजुन एक प्रश्न.. माझ्या नवर्‍यालाही हवाय, तो माझ्या आयडीवर घेऊ शकेल ना? आय मिन, मी २ टीशर्ट्सची ऑर्डर करू शकेन ना?..
      पेमेंट ऑनलाईन करता येईल, म्हणजे तो एक प्रश्न सुटला..
      पण बाकीचे काय!

      www.bhagyashree.co.cc

      बीएसके,तुम्ही दोन टी शर्टची ऑर्डर करू शकता...
      तुमचे कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी कोणालाही तुम्ही तुमचे टी -शर्ट घेऊन ठेवायला सांगु शकता.. फक्त ऑर्डर करताना तुम्ही तसं मेलमध्ये लिहा.. किंवा पाहिजे तर तुमचे टी शर्ट पुण्यातल्या संयोजकांकडेच रहातील सध्या.. तुम्ही पुण्यात आलात की ते आमच्याकडुन घेऊन जा..तुम्ही पुण्यात कधी येणार आहात?

      माझी ट्रीप नाही फिक्स अजुन. पण टीशर्ट्स पुण्यातल्या संयोजकांकडे राहूदेत, मी कोणालातरी सांगेन उचलायला.. म्हणजे आई बाबा, किंवा भाऊ - मैत्रिण! Happy
      ठीके, मग आता ऑर्डर करते.. Happy

      www.bhagyashree.co.cc

      दक्षीणा,
      >>अ‍ॅडमिन - थोडं हे लक्षात घेता येईल का पाहता का?

      टिशर्ट समिती हे काम पहात आहे आणि वर जो बदल सुचवला आहे तो करणं शक्य आहे का हे तपासून इथे कळवतील.

      चित्रामधे जरा मयबेली वाटतय. सुलेखन?????

      मी कल्पेश च्या कॅलीज ची फॅन आहे, पण इथे थोडा लोचा वाटतोय. Sad
      मी आयत्या वेळी घेऊ शकते का पुण्यात?

      पल्ली,आपण जितक्या ऑर्डर्स आहेत तितकेच टी शर्ट्स काढतो.. तेव्हा आयत्या वेळी टी शर्ट्स देणे शक्य होणार नाही.. क्षमस्व...
      तुम्हाला २३ तारखेपर्यंत तुमची ऑर्डर ई-पत्राद्वारे वर दिलेल्या ई-पत्त्यावर करावी लागेल..

      वर्षा विहार.?? कुठे?? केव्हा??
      वर्षा विहार हा काय प्रकार आहे, जरा सविस्तर सांगाल तर बरे होईल (मि नविन असल्यामुळे माहित नाही)

      वर अँकीने काहीतर सांगितलंय त्याकडे टीशर्ट समितीने लक्ष दिले नाही वाटते Sad
      मला तर अँकीने केलेला बदल आवडला... Happy

      असो, मला ५ टी शर्ट हवेत... मिळतील का?
      उत्तर जेव्हढ्या लवकर मिळेल तेव्हढ्या लवकर मेल करेन Happy
      ************
      To get something you never had, you have to do something you never did.

      मला २ टी शर्ट हवे आहेत. पण मी पडलो अमेरिकेत. भारतात आई बाबादेखील नाहीत त्यामुळे काय करावे
      असा विचार सुरू आहे.

      ~~
      स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
      हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

      राज्या,तुम्हाला पाचच काय एक डझन टी-शर्ट्सही मिळु शकतील. वर दिलय त्याप्रमाणे योग्य पध्दतीने ऑर्डर करा म्हणजे झाले. Happy

      नकुल्,पुणे किंवा मुंबई येथे कोणी नातेवाईक किंवा मित्र असतील तर त्यांना सांगा घेऊन ठेवायला किंवा इथल्या मायबोलीकरांपैकी कोणी संपर्कात असेल तर त्यांना सांगा.

      अँकीने वर दिलेल्या इमेजमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत थोडे. त्याचा बदल सुटसुटीत असला, तरी टीशर्टच्या प्रत्यक्ष प्रिन्टींगच्या वेळेस ती अक्षरं पसरट होऊन, संपूर्ण सुलेखनाचा तोल (बॅलन्स) आणि सौंदर्य बिघडेल. (अँकी, हे व्यक्तिशः आपल्याला उद्देशून नसून, केवळ डीझाईनमधल्या बदलासाठी आहे, कृपया गैरसमज नकोत) सुलेखन ही एक कला आहे, आणि प्रत्येक कलाकाराची कलाकारी वेगळी, अनुभूती वेगळी. एरवीही आपण वेगवेगळ्या लोकांचे सुलेखन पाहिले असेल, पण आपल्याला मायबोलीसाठी सुलेखन करून घेण्यामध्ये अनेक parameters होते आणि कल्पेशने त्या सर्व अटींमध्ये बसणारे सुलेखन अथक प्रयत्नांनी करून दिले आहे. इतक्या वर्षात सुलेखनाचा प्रयोग आपण टीशर्टसाठी प्रथमच करत आहोत. त्याकडे सगळ्यांनीच थोडे सकारात्मकतेने पहावे असे आम्हाला वाटते.

      आम्हाला खात्री आहे की टीशर्ट समितीने वर दिलेले डीझाईन प्रत्यक्षात तितकेच आकर्षक दिसेल, आणि सगळ्यांना आवडेल. सबब, वर दिलेल्या डीझाईननुसारच टीशर्ट केले जातील.

      त्याचबरोबर, हेही सांगायला आनंद होत आहे, की आत्तापर्यंत या टीशर्टांना भरघोस प्रतिसाद लाभला आहे. सर्वांना धन्यवाद. Happy

      ज्यांनी अजून ऑर्डरी दिलेल्या नाहीत, त्यांनी २३ जूनपर्यंत आपल्या ऑर्डर्स द्या मंडळी.. नाहीतर, नंतर संधी गमावली, म्हणून हळहळाल! Happy

      स्नेहांकित,
      टीशर्ट समिती.

      नो प्रॉब्लेम...

      मी सुचवलेला पर्याय हा नुसता बदल दाखवण्यासाठी होता...
      त्यात डीटेलिंग केलेलं नव्हतं...

      असो...
      समिती का निर्णय सर आँखोंपर....
      _______
      चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

      दरवर्षीच, बिनकॉलरचाच बिनाखिशाचाच टीशर्ट का निवडता? Happy
      (खर तर मी विचारू इच्छित होतो की "कोण" निवडत??? "हे सम्मेलन कोणी ठरवलय त्याला शोधतोय" या स्टाईलने... Proud )

      राज्या,तुम्हाला पाचच काय एक डझन टी-शर्ट्सही मिळु शकतील.>>>>>

      बाकीचे ७ टी शर्ट्स फुकट देणार असाल तर मी नाही म्हणणार नाही Happy

      आज उद्या मेल टाकतोय Happy

      धन्यवाद Happy
      ************
      To get something you never had, you have to do something you never did.

      विकास.

      अरे हे काय,
      ज्यान पाहिजे त्यानी घ्या, पण ज्याना नको त्यानी कारने तरी देउ नका.

      टी शर्ट समिती....
      मी माझी टी शर्ट ची ऑर्डर बदलली आहे.
      कृपया नोंद घ्यावी आणि पोचपावती द्यावी.
      धन्यवाद
      ----------------------------------
      तेज तम अंस पर
      कन्ह जिमि कंस पर ।
      त्यों म्लेंछ बंस पर
      सेर सिवराज है ॥
      ॥ जय भवानी, जय भवानी ॥
      ॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

      टी शर्ट समिती
      मी दिलेल्या ऑर्डरमध्ये थोडा बदल केला आहे, तशी मेल तुम्हाला २२ तारखेला पाठवली आहे, त्याची पोच देणार का?

      >>इतक्या वर्षात सुलेखनाचा प्रयोग आपण टीशर्टसाठी प्रथमच करत आहोत. त्याकडे सगळ्यांनीच थोडे सकारात्मकतेने पहावे असे आम्हाला वाटते. >> मी सहमत, शेवटी कपडाच तो, इतकी काय चिकित्सा करायची आहे त्यात?

      मायबोलीकरांच्या भरघोस प्रतिसादामुळे टीशर्ट ऑर्डर करण्याची मुदत २५ जून, २००९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अजूनही कोणाचे टीशर्ट ऑर्डर करायचे राहून गेले असल्यास, त्वरित आपली ऑर्डर नोंदवावी. २५ जूननंतर मात्र ऑर्डर नोंदवून घेणे शक्य होणार नाही.

      टीशर्ट कधी आणि कुठे मिळतील, याचा तपशील लवकरच जाहीर करू.

      धन्यवाद,
      टी-शर्ट समिती

      नमस्कार संयोजक,

      मी टी-शर्ट साठी आधीच नोंदणी केलेली आहे..
      आज परत फेरनोंदणी चे ई-पत्र आपल्याला पाठवले आहे..त्यात सगळा तपशील आहेच.
      कृपया नोंद पोहोचल्याची खात्रीने कळवावे ही विनंती.

      धन्यवाद.

      मलाही सुलेखन फारसे आवडले नाही. पण केवळ मायबोलीचा टि-शर्ट म्हणुन घेणार.
      ऑर्डर केली आहे... पोचपावती द्यावी.

      --
      I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault... Proud

      मी पण ऑर्डर केली आहे. पोचपावती द्यावी..

      - अनिलभाई
      It's always fun when you connect.

      मी पण ऑर्डर केली आहे. पोचपावती द्यावी..

      Pages