सभ्यतेने

Submitted by devendra gadekar on 23 October, 2013 - 04:45

माझ्या मनातले तुज कळलेच पाहिजे ..
काहीतरी असे मज सुचलेच पाहिजे .

या मैफलीस सगळ्या लावेल वेड जे
ते काळजास गाणे सुचलेच पाहिजे .

इतक्या सुखात ठेवा दररोज आसवे,
उपकार वेदनांचे फिटलेच पाहिजे .

तू एकटाच दिसतो त्या मंदिरामधे ,
तुज मायबाप देवा ,नसलेच पाहिजे .

साधी हसायची ही ना सूट घेतली
पण आयकर व्यथांचे भरलेच पाहिजे .

माझ्या कलेवराचा हेका नसेल की
जळलेच पाहिजे वा पुरलेच पाहिजे

भलत्याच सभ्यतेने दररोज वागते
जखमेस ही घराणे असलेच पाहिजे .

असशील देव तू पण ध्यानात ठेव हे
आईसमोर माझ्या झुकलेच पाहिजे.

नि:शब्द(देव)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कलेवराचा हेका नसेल की
जळलेच पाहिजे वा पुरलेच पाहिजे

भलत्याच सभ्यतेने दररोज वागते
जखमेस ही घराणे असलेच पाहिजे .

विचार चांगले आहेत, गझलेचे शेर म्हणून कसे मांडायचे ह्यावर विचार व्हावा ही अपेक्षा!