शस्त्रसंधी जर हवी तर युध्द व्हावे लागते
"शांतता पाळा" असे का ओरडावे लागते?
दानपेटीतून ईश्वर राव लोका पावतो
आम जनतेलाच खडतर तप करावे लागते
सूर दोघांचा न जमता नांदले एकत्र का?
संस्कृती आहे अशी की गुदमरावे लागते
संपला वनवास जेंव्हा, राम करतो राज्य अन्
जानकीला अग्निदिव्यातून जावे लागते
हे धनाढ्यांनो ! सुखाची जाणण्या किंमत खरी
वेदना अन् आसवांना अनुभवावे लागते
कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता उंची जरा
टेकडीला त्या हिमालय नाव द्यावे लागते
भंग करण्या तप ऋषीचे मेनकेला धाडले
आज विश्वामित्र कसले ! स्त्रीस भ्यावे लागते
का टिका प्रस्थापितांनो बोचरी करता अशी?
शायराला नवशिक्या समजून घ्यावे लागते
का अशा "निशिकांत" ताना आर्त शेवटच्या क्षणी?
देव पावो वा न पावो आळवावे लागते
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides144@yahoo.com
सूर दोघांचा न जमता नांदले
सूर दोघांचा न जमता नांदले एकत्र का?
संस्कृती आहे अशी की गुदमरावे लागते
संपला वनवास जेंव्हा, राम करतो राज्य अन्
जानकीला अग्निदिव्यातून जावे लागते
वा वा वा !
मस्तच निशिकांत.... खूप छान
मस्तच निशिकांत.... खूप छान लिहिता तुम्ही
अप्रतिम
अप्रतिम
कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता
कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता उंची जरा
टेकडीला त्या हिमालय नाव द्यावे लागते
हा शेर ठीक.
काका... एकदम मस्त...
काका... एकदम मस्त...
कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता
कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता उंची जरा
टेकडीला त्या हिमालय नाव द्यावे लागते
भंग करण्या तप ऋषीचे मेनकेला धाडले
आज विश्वामित्र कसले ! स्त्रीस भ्यावे लागते
का टिका प्रस्थापितांनो बोचरी करता अशी?
शायराला नवशिक्या समजून घ्यावे लागते
का अशा "निशिकांत" ताना आर्त शेवटच्या क्षणी?
देव पावो वा न पावो आळवावे लागते<<<
व्वा व्वा! मझा आया!
व्वा ! सुंदर
व्वा !
सुंदर
खूप छान
खूप छान
'तप करावे' आणि 'गुदमरावे' हे
'तप करावे' आणि 'गुदमरावे' हे शेर सर्वात विशेष वाटले.