Submitted by जयदीप. on 19 October, 2013 - 15:06
ना खंत कालचीही, ना काळजी उद्याची
व्याख्या नवी लिहूया , माझ्या तुझ्या जगाची
ती मूक हाक माझी, तू ऐकली जराशी
सुखवून आज गेली मज 'ओ' तुझ्या मनाची
दु:स्वप्न शेवटाचे पाहू नकोस आता
कर एकदा उजळणी तू गोड आठवाची
घडते बरेच काही, सलते बरेच काही
जवळी रहा अशी तू, पर्वा कुणा जनाची !
पुरते तुझी मलाही, माझी तशी तुलाही
ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची !
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती सावलीच अपुली, चिंता कुणा
ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची? किती गोड
धन्यवाद रमाजी
धन्यवाद रमाजी
दुसर्या शेरातील खयाल आणि "ती
दुसर्या शेरातील खयाल आणि
"ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची?" हा मिसरा
सर्वात विशेष वाटले.
---------------------------------------------------------------------------------------------
शेवटच्या दोन्ही शेरात प्रश्नचिन्हाऐवजी उद्गारचिन्ह संयुक्तिक वाटलं असतं
किंवा कोणतही चिन्ह नसतं तरी चाललं असतं..... वैम.
धन्यवाद सर...
धन्यवाद सर...
खुप गोड!!
खुप गोड!!
धन्यवाद माउ
धन्यवाद माउ
ती सावलीच अपुली, चिंता कुणा
ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची !>>छान मिसरा
दु:स्वप्न शेवटाचे पाहू नकोस आता
कर एकदा उजळणी तू गोड आठवाची ...छान
धन्यवाद सुशांत...
धन्यवाद सुशांत...:-)
पहिला आणि शेवटचा शेर आवडला!
पहिला आणि शेवटचा शेर आवडला! शुभेच्छा.
धन्यवाद ....
धन्यवाद ....