Submitted by मयुरेश साने on 17 October, 2013 - 11:42
आठवण यावी तुझी प्राजक्त व्हावी
अंगणी माझ्या मनाच्या घमघमावी
वास्तवाला ती जरी मंजूर नाही
बंद केल्या पापण्यांना ती दिसावी
स्वागताची तोरणे दारी सुखाच्या
मात्र कुलपाची कधी बनली न चावी
आसवांचा भार झाल्या हुंदक्यांनी
पापण्यांची रोज दारे ठोठवावी
स्वस्त झाल्या वेदनांना हे कळू दे
आसवे नाहीत माझी मानभावी
हरवले आहे जिथे काळीज माझे
त्या तिथे सारी व्यथा हरवून जावी
केवढी गर्दी तुझ्या या आठवांची
नेमका एकांत पाहुन घुटमळावी
काळजाचे व्हायचे ते होत आहे
काळजी आता तुला माझी नसावी
.....मयुरेश साने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच साने गुरुजी
मस्तच साने गुरुजी
छान आहे आवडली
छान आहे
आवडली
वाह रे पठ्ठ्या...!
वाह रे पठ्ठ्या...!
हरवले आहे जिथे काळीज
हरवले आहे जिथे काळीज माझे
त्या तिथे सारी व्यथा हरवून जावी........वा !
क्लास !
क्लास !
झक्कास!
झक्कास!
सुरेख, सुरेख, सुरेखच ...
सुरेख, सुरेख, सुरेखच ...
वाह रे मस्तच ओघवतेपणा खूपच
वाह रे मस्तच
ओघवतेपणा खूपच आवडला
छान
छान
छान आहे आवडली
छान आहे
आवडली
"आसवांची ..." शेर आवडला.
"आसवांची ..." शेर आवडला. एकुणच छान. मस्त.
मस्त मस्त मस्त!
मस्त मस्त मस्त!
केवढी गर्दी तुझ्या या
केवढी गर्दी तुझ्या या आठवांची
नेमका एकांत पाहुन घुटमळावी.. वा वा!
बढिया, मयुरेश !!
बढिया, मयुरेश !!
सहीच..
सहीच..
सुन्दर !
सुन्दर !
खूप छान !
खूप छान !
प्राजक्ताचा वास कधी घमघमत
प्राजक्ताचा वास कधी घमघमत नाही साहेब! जरा वास्तवात या.
हरवले आहे जिथे काळीज
हरवले आहे जिथे काळीज माझे
त्या तिथे सारी व्यथा हरवून जावी>>> । फारच छान