सोडियम च्या गोळ्या

Submitted by यक्ष on 8 October, 2013 - 01:52

माझ्या वडिलांन्ना सुमारे ६ महिन्यापुर्वी सोडियम पातळी कमी होण्याचा त्रास झाला होता.

उपचारानंतर डॉक्टरांन्नी सोडियम च्या गोळ्या घेण्यास सांगितले होते व काही कालावधी नंतर पुन्हा सोडियम पातळी तपासून दाखविण्यास सांगितले होते. ते करु शकलो नाही.

सध्या ते रोज २ गोळ्या घेतात. हे नेहेमिसाठी घेणे योग्य आहे कां?

वडिलांन्ना पुन्हा रक्त तपासणे वगैरे ह्याला नको म्हणतात.

तसे 'बी प्रोटीन' रोज घेणे सुरु आहे. वयोमानानुसार त्यांनी आहार कमी केला आहे. (स्वतःहून)

क्रुपया सल्ला हवाय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेगुलर चेकिंग गरजेचे आहे. सोडीयम कमी/जास्त झाल्याने बरेच क्रिटिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
संदर्भ :- ओळखीची केस. मी डॉक्टर नाही, हे लक्षात घ्यावे.

सोडियमच्या गोळ्या म्हणजे नेमकं काय घेतायत?
सोडिअयम, पोटॅशियम इ. मंडळी खूप लबाड असतात.
कमी झाली तरी खूप त्रास होतो, जास्तं झाली तरी खूप त्रास होतो.
तेव्हा वडिलांचं न ऐकता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ते औषधोपचार आणि नियमित तपासण्या करा.

धन्यवाद!
ह्या 'सोडामिंट' नावाच्या गोळ्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गुलाबी रंगाच्या व स्वस्त असणार्या पण फक्त प्रिस्क्रिप्शन वर मिळण्यार्या गोळ्या आहेत.

बाकी सर्व पातळ्या प्रमाणात आहेत.

तसे तपासून घेणार आहेत फक्त ते दिवाळीनंतर करता येइल असे वाटते. (नंतर तरी हो म्हणतील..)