कुंडली एका नरेंद्राची

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 October, 2013 - 03:36

ज्योतिष

From फलज्योतिष चिकित्सा मंडळ

फेब्रुवारी २०१२ मधे मला डॉ दाभोलकरांचा फोन आला. "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या सर्व कुंडल्या मी तयार केल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की तुमची कुंडली एकदा ज्योतिषांना अभ्यासाला दिली पाहिजे.सध्या ज्योतिषांच्या कुंडलीत दाभोलकर नावाचा ग्रह वक्री दिसतोय.ते नेहमी प्रमाणे निरागस हसले.
नोव्हेंबर १९९५ साली सातारा येथे आखिल भारतीय ज्योतिषांचे संमेलन झाले होते.त्यावेळी ज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका अंनिस ने घेतली होती. कृष्णराव वाईकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांना हाताशी धरुन हा धर्मावर घाला आहे अशी भूमिका घेतली होती.ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. ज्योतिषाला आव्हान म्हणजे धर्माला आव्हान अशी मांडणी करुन अंनिसला दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.अंनिस च्या कार्यकर्त्यांनी आपल्या बायकोचे कूंकु पुसुन यावे अशा आशयाची भाषा वापरली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ने त्याची दखल घेउन कुंकवाची उठाठेव असा अग्रलेख लिहिला होता.अंनिसने या धमक्यांना भीक न घालता त्याही वेळी कुंडल्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. अशा कार्यक्रमात ओम,गणपतीची प्रतिमा अशा हिंदुत्वाच्या प्रतिकांचे दहन होणार नाही याची काळजी घेतली.कारण उगीचच भावना दुखावल्याचे भांडवल व्हायला नको.कुंडली हा आराखडा आहे. तो जाळून काय होणार आहे? लोकांच्या ज्योतिषावरील विश्वासाला त्यामुळे थोडाच तडा जाणार आहे? अशा आमच्यासारख्या काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत अहो हे शेवटी प्रतिकात्मक असत.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत.दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांचा २० ऒगस्ट २०१३ रोजी सकाळी सात सव्वासात च्या दरम्यान क्रूरपणे खून केला.भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय? दाभोलकरांवर प्रेम करणारे अनेक ज्योतिष भाविक देखील आहेत.अनेक ज्योतिषी त्यांच्या कुंडलीवरुन आता ग्रहयोग खून दर्शवत होते असे सांगत फिरतील. कुंडलीतील शनि मंगळ युती कशी घातक ठरली हे सांगतील.जन्मवेळ व मृत्युची वेळ ही जवळपास एकच कशी होती हे सांगतील.त्यावेळी मंगळ कर्केत प्रवेश करीत होता हे सांगतील.पण त्यांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरुन सांगाव हे त्यांना अगोदर सांगता आल असत काय?
(पुर्वप्रकाशित ब्लॉग ऐसी अक्षरे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती | 4 October, 2013 - 03:35
तूर्रमखान,
वर मोकिमी नी इतकं ढळढळीत स्वतःचं आणि मैत्रीणीचं उदाहरण दिलं असता तुम्ही सांगोवांगीचा अनुभव असे का म्हणताय?
>>
प्रश्ण कशा प्रकारे विचारला ह्यावरुन देखिल उत्तर बरोबर येण्यची शक्यता वाढते.

मी मोकिमीची घटना वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करते.

मोकिमीच्या मैत्रिणीला तिने बॉसचा अपमान केल्यावर बॉसने तु आता एक महिन्यात रिझाइन कर असे सुचविले असु शकते जे तिने कोणालाच सांगितले नसेल. तिने ज्योतिष्याला विचारतानाच हा प्रश्ण
"मी इथे ७ ऑगस्ट नंतर असेन का?" असा विचारला असेल.
असे जर झाले असेल तर ज्योतिष बरोबर येण्याची शक्यता ५०% पेक्षा जास्त आहे कारण तिच्या बोलण्यावरुन काहितरी बिनसले असल्याचे ज्योतिषी नक्कीच ओळखणार.

मोकिमीच्या ऑफिसमध्ये जर हा ज्योतिषी येतजात असेल तर मोकिमीसारख्या उच्चपदस्थ व्यक्तिबद्दल त्याला खुप माहिती नक्कीच असणार. मला इथेच मायबोलीवर बसल्या बसल्या मोकिमीच्या नवर्याबद्दल खुप महिती आहे. Happy
दिवे घ्या.

ज्योतिषाचे धागे आले की त्यांचे शाब्दिक रणांगण होताना नेहमी दिसते. स्थूलमानाने दोन गट पडतात. एका गटाने दुसर्‍या गटाला हिणवण्याचे प्रकार हिरिरीने चालतात. बुप्रावाले , तथाकथीत भंपक विज्ञानवादी, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले वगैरे वगैरे एका गटाला संबोधले जाते तर दुसर्‍या गटाला. बुरसटलेले, सनातनी, अंधश्रद्ध, हे लोक ना देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहेत, असल्या लोकांमुळे देश कधी सुधरायचा नाही... वगैरे वगैरे.
लोकांना द्वैतात विभागणी करायला नेहमी सोपे जाते. काळे- पांढरे. राम- रावण, चांगला- वाईट. श्रद्धा अंधश्रद्धा तर एव्हरग्रीन विषय आहे चघळायला.श्रद्धा अंधश्रद्धेमधला करडा एरिया खुप मोठा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण 'अ‍ॅकॅडमिस्ट' स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
ज्योतिषाचा आधार घेणारा माणुस हा अंधश्रद्ध म्हणुन झोडपला जातो.मग तोही प्रत्युत्तरादाखल आपल्या श्रद्धा अंधश्रद्धांचे समर्थन आक्रमकतेने करतो.मेंदुच्या मनात या पुस्तकात सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा. असो या लढाईला अंत नाही

साती, मी वेळोवेळी याबाबत लिहित असतो. आपल्याला या विषयवरील माझे मत गांभीर्याने जाणुन घ्यायचे असेल तर आपण कृपया माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद हे पुस्तक वाचाण्याचे कष्ट घ्यावे लागतील खालील लिंकवरुन डाउनलोड करुन घ्या.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/jyotishakade%20janypurvee.pdf

प्रकाश, हे पुस्तक पूर्वीच वाचून झाले आहे.
त्यातून ज्योतिषासंबंधी विविध फॅक्टस कळल्या.
पण तुमचे वैतक्तिक मत कळले नाही.
कादाचित तो माझ्या आकलनशक्तीचा दोष असावा.

तुमच्या एकंदर विवेचनावरून तुम्हाला दोन्ही बाजूंच्या काही गोष्टीना बरोबर म्हणायचे आहे असे वा टते.

थोडक्यात सांगायचे झाले तर फलज्योतिष हे आजच्या ज्ञात विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही. सबब ते विज्ञान नाही. परंतु जनसामान्यांना त्याचा आधार वाटतो. फलज्योतिष हा बहुसंख्यांसाठी एक प्रकारचा मानसोपचार आहे. भारतीय फलज्योतिषात भाकित हा भाग असतो तर पाश्चात्य फलज्योतिष हे व्यक्तिमत्वाचा कल या दृष्टीने विचार करते. त्यात भविष्यातील घटना सांगण्याचा भाग नसतो. फलज्योतिषाला पर्याय म्हणुन समुपदेशक मानसोपचार तज्ञ यांची मदत घेतली पाहिजे. परंतु त्यांची संख्या कमी आहे तसेच त्यांच्या फीया जनसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे देखील ते बाबा वुवा ज्योतिषी यांच्या कडे जातात.अन्य कारणे देखील आहेत. ज्योतिषाकडे जाणार्‍यांना अंधश्रद्ध म्हणुन झोडपु नये. त्यांना समजावुन घेतले पाहिजे. त्यांना उपलब्ध सक्षम पर्यांयांकडे वळवले पाहिजे.

अधिक माहिती या ज्योतिषाच काय करायच? http://www.maayboli.com/node/41758

प्रकाश घाटपांडे, आपल्या वरच्या "फलज्योतिष हे आजच्या ज्ञात विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही" आणि "ज्योतिषाकडे जाणार्‍यांना अंधश्रद्ध म्हणुन झोडपु नये" या दोन वाक्यांचा परस्पर संबंध कसा लावायचा? कृपया अधिक स्पष्टीकरण द्याल तर बरे...

वरील दोन्ही विधाने ही माझी मते आहेत. मधे तरीही हे उभयान्व्यी अव्यय लावावे. हा त्या दोन वाक्यामधला संबंध.

समन्वयकाची भुमिका ही कुंपणावर असते तरच त्याला दोन्ही बाजूला संवाद साधता येतो. आपण ज्याला कुंपणावर म्हणता अथवा विचारता त्याला जयंत नारळीकरांनी वेगळा कोन दिला आहे. इथे वाचा ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी,,, प्रश्नोत्तरातुन सुसंवाद चे जयंत नारळीकरांनी लिहिलेले परिक्षण
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2006/09/blog-post_115858511190534...

काही लोकांना कुंपणावर म्हणजे गोंधळलेला, ना धड इकडचा ना धड तिकडचा. तळ्यात मळ्यात, त्रिशंकु वगैरे अशा शब्दांनी संभावना करण्याची ( खर तर अशा शब्दांनी अवहेलना वा उपहास ) सवय असते, मी त्यांचे समाधान करु शकत नाही. प्रत्येकाचे काही काही पुर्वग्रह असतात. आयुष्याच्या पुर्वार्धात गॉड इज ट्रूथ म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणत. असो...

अजूनही मला कळले नाही.
तुमचे व्यक्तिगत मत काय हे जाणून घेण्यात मला खरेच रस आहे.
कारण ते दोन्ही बाजू समजून उमजून तयार झालेले मत असेल.
म्हणजे असं का की
१.तुमचा व्यक्तिशः ज्योतिषावर विश्वास नाही पण सामान्यजनांनी मनःशांतीसाठी बिश्वास ठेवला तर ठेऊ द्यावा
२.तुमचा विश्वास आहे पण आहारी जाऊ नये.
३. कुणीच विश्वास ठेऊ नये.

यावरून आमच्या एका मित्रांची आठवण झाली जे त्यांच्यासमोर कुणाला साप चावल्यास डॉक्टरकडे घेऊन जातात पण ज्यांना डॉक्टरकडे घेऊन जायची सोय नाही त्यांच्यासाठी मंत्रतंत्राची सोय उपलब्ध रहावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करतात.

बाकी माझे वैयक्तिक मत विचाराल तर अजून ज्योतिषशास्त्र खरे की खोटे याबद्दल माझे मत मी बनवलेले नाही.
आत्तापर्यंत ज्या दोन भविष्यवाल्यांनी माझं भविष्य फेस रीडिंग्करून सांगितलंय ते तंतोतंत खोटं ठरलंय.
पत्रिका काही मी बनवली नाही.
Wink

साती
माझ्या लिखाणावरुन तुम्हाला काय वाटते माझे व्यक्तिगत मत कुठल्या मताच्या जवळपास असेल? १,२ कि ३
माझ्या मते तुम्ही अंदाज बांधला आहे तो क्रमांक १ चा व तो बरोबर आहे. आतापर्यंत माझे मत ते होत. आज ही ते आहे. उद्याच माहित नाही. समजा काही कारणाने माझ्या मेंदुत अनपेक्षित रासायनिक बदल झाले तर माझे मत बदलू शकते.तसही विज्ञानात अंतिम/ त्रिकालाबाधित सत्य अशा नावाची भानगड नसतेच.
मला लोक एक अवघड प्रश्न विचारतात काय हो ती कुंडली भानगड खर्री असत का हो? मी म्हणतो," हो खरी असते कुंडली. तो शेवटी एक नकाशा आहे. त्यावरुन केलेले भाकित खरेच असेल याची खात्री मात्र नाही."

फारच धर्मसंकटात टाकता ब्वॉ तुम्ही लोक! Happy Happy

< पण ज्यांना डॉक्टरकडे घेऊन जायची सोय नाही त्यांच्यासाठी मंत्रतंत्राची सोय उपलब्ध रहावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करतात.>

विषयाशी संबंध नाही, पण लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून.
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक येओ अथवा न येओ, मंत्रतंत्र करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली नाही. वैद्यकीय उपचारांना विरोध करून मंत्रतंत्र करायला लावणे, यावर निर्बंध आहेत. त्यामुळे या डॉक्टरांनी कुंपणावर राहायची गरज नाही. Happy

अगदीच सूर्य नाही तर अंधारातील दिवा म्हणून ज्योतिष व तत्सम संबंधित 'विद्या' याकडे बघता येऊ शकेल का? जे स्वयंप्रकाशी आहेत त्यांना अर्थातच कुठल्याच दिव्याची गरज नाही हे आलेच.

खरे तर कुंडली एका 'नरेंद्राची' हे वाचून हे स्वामी विवेकानंदांवर काही असावे या आशेने बाफ ऊघडला. old habbits die hard... पण.. एकंदरीत निष्कर्ष असा निघतोयः घाटपांडे (बाफ कर्ता) स्वतः कुंपणावर, मोकीमी सारखे काही हे अनुभवांती 'पटलेले' ठाम एका बाजूने, ईतर काही आयडी अनुभवांती 'न पटलेले' पूर्ण विरुध्द बाजूने, आणि उर्वरीतांसाठी 'वरीलपैकी काहीही नाही' हा पर्याय! प्रशासकांचे बरे आहे त्यांना दोन कायमस्वरूपी ठळक पर्याय ऊपलब्ध असतातः बाफ चालू ठेवणे किंवा बंद करणे.

रच्याकने: कुंडली डॉ. नरेंद्र दाभोळकरांची असे शीर्षक दिले असते तर कुंडली व पुढील सर्व पोस्ट्स बदलल्या असत्या का?
बहुतेक नाही... Happy

मोकिमीच्या मैत्रिणीला तिने बॉसचा अपमान केल्यावर बॉसने तु आता एक महिन्यात रिझाइन कर असे सुचविले असु शकते जे तिने कोणालाच सांगितले नसेल. तिने ज्योतिष्याला विचारतानाच हा प्रश्ण
"मी इथे ७ ऑगस्ट नंतर असेन का?" असा विचारला असेल.
असे जर झाले असेल तर ज्योतिष बरोबर येण्याची शक्यता ५०% पेक्षा जास्त आहे कारण तिच्या बोलण्यावरुन काहितरी बिनसले असल्याचे ज्योतिषी नक्कीच ओळखणार.>>>>>

येवढं नाही हो झालय...... एकतर ते क्लायेंट ( ज्योतिषी) अमदाबाद ला रहातात. आमच्या ऑफिस मधे ते फक्त अ‍ॅग्रीमेंट वर सह्या करायला आले होते. गेल्या १० वर्षात त्यांना पहिल्यांदा मी ऑफिस मधे पाहिलं.....दूसरं म्हणजे माझ्या मैत्रिणीने त्यांना फक्त हात दाखवला. भोवती नीदान १५ ते २० लोक होते. त्यांच्या समोरच त्यांनी तिला हे सांगितले. ती मैत्रिण ज्या पोझीशन ला होती, त्या पोझीशन वर एका दिवसात काढण्या सारखं प्रोफाइलच नव्हतं.... ते वेगळच राजकारण शिजत होतं.... आमचा बॉस अशी राजकारणं खेळण्यात वाकब्गार आहे. तो ताकास तूर लागु देत नाही. मुळात येवढं प्रत्येका बद्दल डिटेल माहित असण्या सारखं वातावरण ऑफिस मधे नव्हतच......

मोकिमीच्या ऑफिसमध्ये जर हा ज्योतिषी येतजात असेल तर मोकिमीसारख्या उच्चपदस्थ व्यक्तिबद्दल त्याला खुप माहिती नक्कीच असणार. मला इथेच मायबोलीवर बसल्या बसल्या मोकिमीच्या नवर्याबद्दल खुप महिती आहे. स्मित
दिवे घ्या.
>>>>>

आहो ते फार वर वरच आहे. साधारण आपण घरच्यां बद्दल जे बोलतो तेच मी कधी तरी माबो वर शेअर केलं असेल..... पण त्या ज्योतिषांनी जे काही पुर्व आयुष्या बद्दल सांगितलं त्यातल्या काही गोष्टी मला ही नव्या होत्या..... खुप बरकाइने सांगितलं...

घाटपांडें म्हणाले तसं त्यांना काही अंतर्स्फुर्ती असण्याची शक्यता आहे. पण म्हणजेच काहीतरी आहे हे नक्की.

दूसरी गोष्ट मी ही घटना अशा साठी सांगितली की माझा जो ह्या विषयाचा शोध आहे तो ह्या घटने पासुन सुरु झाला.

Pages