जुना डेक काय करावे?

Submitted by प्रितीभुषण on 3 October, 2013 - 08:34

माझ्या कडे एक जुना डेक आहे साधारण २००४ सा ली चालत होता तसा ....
आता मोबाईल चा जमाना असल्याने माळ्यावर आहे काय करु ?
चांअगल्या कंडीशन मधे आहे..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

vruddhashram/anathashram ashya thikani daan kara. cassettes astilach na...tyahi deun taka. ithe baryach janankade cassettes ahet n vaparalelya..

btw...amchi 1986 salacha aaiwa chi stereo system turn tabale sakat ajunahi uttam chalate. amhi ajunahi cassettes aikato...

थोडे दिवस ठेवा अजुन माळ्यावर. काही वर्षांनंतर अँटिक पीस म्हणून विकता येईल. ते जुने ग्रामोफोन कसे आता विकतात, तसेच!! Happy

प्रीभु माझ्याकडे सुद्धा उत्तम चालणारी १२ वर्षापुर्वीची फिलिप्सची म्युझिक सिस्टिम होती.. मी माझ्या बाईला देऊन टाकली.

थोडी खटपट केली तर जुन्या बाजारातून अँप्लिफायर आणून ती टीव्हीच्या सिस्टीमला बसवून होम थिएटर मध्ये बदलू शकता....
मी आणि माझ्या भावाने मध्यंतरी हा प्रयोग केला होता...पण स्पीकरच्या लोंबणार्या वायरी आणि दणदणाटाला कंटाळून घरच्यांनी ते काढायला लावले...

अनेक वर्षांत डेक म्हणजे म्युझिक सिस्टिम ह्या अर्थाने ऐकला नाहीये. आता डेक म्हणजे घराच्या बाहेरचा चौथरा, किंवा घराला लागून छोटी जेट्टी. दोन क्षण लागले कळायला Happy
सुमेधाव्ही शी सहमत. देऊन टाका चालू असेल तर त्याच्या कॅसेट्स सकट... वापरात नसेल अन वापरण्याचा उत्साह नसेल तर नक्कीच चालू असेस्तोवर देऊन टाका.

कोणीतरी मागे इथेच जुन्या कॅसेट्स चे काय करावे असा धागा काढला होता. तो शोधून त्यांना हा डेक देउन टाका. हाकानाका Happy

संध्याकाळीच नवऱ्याने माळ्यावरून जुना डेक काढला, फिलिप्सचा पॉवरहाउस डेक आहे, नवऱ्याला अतिशय प्रिय, आशुचाम्प यांनी केले तसेच काहीसं डोक्यात आणि माझा विरोध, मी देऊन टाकूया म्हणते पण नाही म्हणतो, कसा चांगला आहे, असे करता येईल आणि तसे करता येईल, छान आवाज येतो असे त्याचे म्हणणे, माझ्या डोक्यावरून जाते, मला काही कळत नाही, मला तो काढून टाकावासा वाटतो पण काय करणार? असो.

नीट सर्विसिंग करुन घेऊन देऊन टाका योग्य ठिकाणी. माझी फिलिप्सची ४ वर्षं जुनी सिंगल सिडीवाली म्युझिक सिस्टिम अशीच नव्यासारखी करुन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील एका ३ खणांच्या शाळेत अजूनही (८ वर्षं झाली) उत्तमरित्या शैक्षणिक सीडीज वाजवतेय. एक्स्चेंज ऑफरमध्ये १००० रुपये आले असते फक्त. त्या ऐवजी १००० रुपये सर्विसींग साठी घातले.

मुंबईमधे दारूखान्याजवळ शिप रेकिंग यार्ड आहे, तिथे डेक घेऊन जा. ते व्यवस्थित मोडतोड करून भंगारामधे घेतील. डेक नुसताच घेऊन जाऊ नका, अख्खे जहाज घेऊन जा. जास्त पैसे मिळतील. Light 1

जोक्स अपार्ट, आमच्याकडे एकेकाळचा थ्री-इन्-वन नावाने आलेला फिलिप्सचा डेक आहे. त्यावर अजून रेडिओ आणि ऑडिओ सीडी उत्तम चालतात. आमचा हा थ्री-इन वन जवळच्याच एका शाळेला देऊन टाकला. मुलं त्यावर रोज रेडिओवरील कार्यक्रम ऐकतात.