सावळा गोंधळ

Submitted by योग on 1 October, 2013 - 09:21

सावळा गोंधळः

'जाने भी दो यारो' या गाजलेल्या चित्रपटातील पडद्यावरील द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन प्रासंगिक गोंधळामूळे अतीशय गाजला. त्यातले ते धृतराष्ट्राचे "ये क्या हो रहा है..?" असे हतबल होऊन विचारणे अक्षरशः करमणूकीचा हाय पॉईंट होते. अलिकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मात्र, "ये क्या हो रहा है...?" यातल्या विनोदाची जागा अचाट आणि अतर्क्य आणि ओकांबिक (हा नविन शब्द सुचलाय, लेखनिक स्वातंत्र्य!) अशा भावनेने घेतली आहे. कालिदास महाशयांच्याही कल्पनाशक्तीस व लेखणीस आव्हानात्मक ठरेल असे महाभारत सध्या आपल्या देशात घडत आहे. फक्त या महाभारताचा वेग व गुंता ईतका प्रचंड आहे की केवळ वातानुकूलित स्टूडीयो मधले सूत्रधारच याच्या आगा पिछा व डोके अन पाय याबद्दल नेमके सांगू शकतात. बाकी ईतरांना हे सर्व बघूनच घाम फुटत आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमूळे हा देश नक्की चालवते कोण, आणि मुळात हा देश चालतो कसा, असे नको ते प्रश्ण डोक्यात थैमान घालत आहेत. या खालील काही घटना:

१. संसदेनेच मंजूर केलेला (?) व खुद्द पंतप्रधनांच्या स्वाक्षरीचा वटहुकूम का अधिसूचना जे काय आहे, तो कागद अक्षरशः भेळेचा कागद असल्यागत "तो फाडून फेकून द्या.." असे थेट सर्वांसमक्ष म्हणण्यापर्यंत पोरा टोरांची मजाल गेली आहे. म्हणजे पडद्यामागे म्हणत असतीलही पण आता थेट 'लाईव्ह' म्हणताहेत. या कारट्यांच्या मागे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारी स्वामिनी असल्याने ईथे खुद्द मा. पंतप्रधानांच्या पाठीचाही लोचा झालेला आहे. आता ऊतार वयात 'वळ नको पेक्षा वाकलेले बरे' असे ती देखिल म्हणत असावी. सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पाठीची ही अवस्था तर सर्वसामान्यांच्या पाठी बद्दल विचारही न केलेलाच बरा...! 'पैसे पेड पर नही ऊगते..' हे अमृत अजूनही सामान्यांच्या घशातून देखिल खाली ऊतरलेले नाही तिथे पाठीचा नंबर फारच दूरचा आहे.

२. ठराविक धर्मांच्याच लोकांना नाहक तुरूंगात कोंडू नये अशी लेखी तंबी खुद्द गृहमंत्र्यांनी सर्व राज्य मुख्य मंत्र्यांना दिली आहे. एरवी धर्मनिरपेक्षतेचे भोंगे वाजवणार्‍या व निव्वळ आम्ही मात्र धर्मनिरपेक्षतेचे रक्षक बाकी सर्व भक्षक असा आव आणणार्‍या पक्षाच्या या गृहमंत्र्याने मुळात धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचे, भारतीय घटनेचे अक्षरशः तीन तेरा वाजवलेले आहेत. आणि यामूळे पक्षाची अवस्था म्हणजे- "परदा जो ऊठ गया तो भेद खुल जायेगा.... " अशी झालेली आहे. 'बुरखा टराटरा फाडणे' अशा अर्थी एक म्हण होती पूर्वी. त्याचा अर्थ स्पष्ट करणारे ईतके ऊचित व चपखल ऊदाहरण व्याकरणाच्या कोशात दुसरे नसेल.

३. १७ वर्षापूर्वीच्या चार्‍याचा रवंथ अचानक न पचल्याने आता ऊलटून पडला आहे. सत्तेच्या समीकरणात आता त्या रवंथाचा अगदी चिपाड एव्हडाही वापर शिल्लक नसल्याने जगातील पहिल्या वहिल्या अशा 'चारा' घोटाळा करणार्‍यांना आता अटक, जेल, व शिक्षा देण्याचे करून नक्की कुणाला धूळ चारली जात आहे हे कळायला मार्ग नाही. न्याय झाला (?) हे चांगलेच आहे पण मग तो असा अचानक ईतक्या ऊशीराने, झोपेतून जाग आल्यागत? हा गुरांचा शाप म्हणायचा की कसे?

४. जगातील सर्वात धनाढ्य क्रिकेट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने जवळ जवळ बेदखल केले, ज्या मंडळाला व त्यातील पदाधिकार्‍यांना खडसावले, त्यां महाशयांना पुन्हा मंडळातील त्याच सदस्यांनी निवडणूकीत बिनविरोध निवडून दिले? ऑ!.

५. शालेय वा ईतर स्पर्धा परिक्षेतून पूर्वी डोकावणारा "वरीलपैकी काहीही नाही.." हा एरवी 'खोडसाळ' वाटणारा पर्याय आता चक्क मतदानासाठी लागू करायची वेळ आली आहे. आणि पूर्वी हा पर्याय जितका गोंधळात टाकणारा वाटायचा तितकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक गोंधळ या पर्यायाने निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब आनंदाची आहे का शरमेची यातला गोंधळ कायम आहे.

६. सर्वांचा लाडका मुन्नाभाई म्हणे जेल मधून दहा दिवसाच्या 'कॅजुअल' लिव्ह (नैमित्तीक रजा?) वर घरी आला आहे. 'सिक लीव्ह" घेऊन जेल मधेच जायचे टाळणारे अनेक महाभाग व अनेक ऊदाहरणे नविन नाहीत. पण जेल मधून अशी सुट्टी घेऊन घरी येणारे पहिलेच ऊदाहरण पाहिले. त्याला 'परोल' वगैरे कायदेशीर नाव दिलं तरी ती मुळात कॅजुअल लिव्ह च आहे. च्यामारी, आपल्याला कामातून एक दिवस कॅजुअल लिव्ह घ्यायची तर किती कारणे शोधावी लागतात व मनधरण्या कराव्या लागतात. भविष्यात जेल ला 'दांडी' मारायचा पर्याय ऊपलब्ध होईल की काय? या बाबतीत मायबोलीकर मामींची ती फेसबुक फेमस नोकराणी व मुन्नाभाई जास्त सुखी वर्गात मोडतात असे ऊगाच वाटून गेले.

७. जीवनावश्यक सोयी, सुविधा, व सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नाही असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिला. मुळात रेशन कार्ड, मग पासपोर्ट, मग पॅन कार्ड, वोटर कारड, सिनीयर सिटीझन कार्ड, अशा वेग वेगळ्या कार्डांचा 'जीवनावश्यक' गोष्टींशी थेट संबंध कधीच नव्हता. रेशन कार्डाला पूर्वी थोडी तरी किंमत होती. मतपेटीच्या राजकारणास्तव रेशन कार्ड काळ्या बाजारात विकले जाऊ लागले (म्हणजे त्यावर मिळणारे रेशन हे भलतीकडेच जाऊ लागले!) आणि मग ईतर अधिकृत कार्डे बाजारात आणावी लागली. पण आधार कार्ड नक्की कशासाठी होते हेच कळेनासे झाले. आधार चे सर्वेसर्वा आता निवडणूकीच्या रींगणात ऊतरणार अशी ताजी बातमी आहे. चांगलेच आहे. शेवटी आम आदमी पार्टी असो वा आधार असो, सर्वच स्त्रोत सत्तेच्या सागरात सामिल व्हायला ऊत्सुक असतात हेच खरे.

आणि या सर्वात भर म्हणून गोंधळात भर टाकणार्‍या ईतर काही घटना:

८. २०० कसोटी खेळायची वेळ आली तरी साहेब म्हणतात "ईथे निवृत्तीची घाई कुणाला आहे?". हनुमंताच्या गदेनंतर बहुदा त्याची बॅटच फक्त अजरामर आहे असे त्यांना सुचवायचे असेल.

९. कुठलेसे बिल पास नाही केले म्हणून म्हणे खुद्द अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या मासिक पगारावर गदा येण्याची शक्यता आहे...! ईतरांच्या आलीच आहे.. पाकीस्तान हा जगातील सर्वात मोठा कर्जबाजारी देश आहे असे ऐकून होतो, पण हे काहितरी भलतेच निघाले.

१०. निर्भया नंतरही दिवसा ढवळ्या चाललेले बलात्कार, मग त्यावरील वक्तव्ये, सत्तेतील लोकांची दडपशाही, माजोरीपणा, ई. सर्व काही थांबलेले नाही. प्रत्त्येक बलात्काराला न्याय हवा म्हणून मेणबत्त्या पेटवायच्या तर आपल्या देशात लोकांना दुसरे काहीही करायला वेळही मिळणार नाही. पाश्चात्य वा ईतर 'सुधारीत' देशातील बलात्काराची आकडेवारी देऊन देखिल आपल्या मेणबत्त्या विझणार नाहीत हेच खरे.

११. तशी जुनीच आहे हि बातमी पण अचंबीत करणारी होती. जवळ जवळ एक वर्षे एकही विमान न ऊडालेल्या म किंगफिशर कंपनीच्या कर्मचार्‍यांनी संप केला होता. आता विमानच ऊडत नाही, तर कामच नाही, कामच नाही तर संप कसला? पगार नाही मिळत म्हणून ऊपोषणाला वगैरेही बसले होते म्हणे. पण आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार..? म्हणजे जिथे मुळात ऊत्पन्न निर्मान करणारी विमानसेवाच बंद आहे तिथे ऊपोषणाला बसा वा संप करा काय फरक पडणारे..? एव्हडे होऊनही मल्ल्यांच्या कॅलेंडर सुंदर्‍या, बाळ मल्ल्याच्या लंडनमधील बारलीला, त्यांचे खाजगी चंगळजेट मधून भ्रमण, फॉर्म्युला वन ची धूळ ऊडणे काही संपत नाही. आणि दर काही दिवसांनी "आता मला नविन भांडवलदार वा गुंतवणूकदार मिळाले आहेत.." असे पिल्लू सोडून मल्ल्या बाजाराला व या लोकांना काही काळ झुलवत ठेवतात. किंगफीशर चा ceo नक्की काय काम करत असावा बरे..?

१२. श्रावणात असेही कांदा कोण खातो? मग भाव हजाराच्या घरात गेला तरी काय फरक पडणारे? असे म्हणणारे कृषीमंत्री स्वतः मात्र क्रिकेट च्या सत्ताकारणाचे कांदे सोलत आहेत हे पाहून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही. त्यांच्याच पुस्तकातून धडा घेऊन आता ईतर मंत्री देखिल क्रिकेट मंडळाच्या मैदानात 'ऊभे' आहेत. पैकी एका स्वर्गवासीय नेत्याने क्रिकेट मधिल कर्नल साहेबांची देखील निवडणूकीत दांडी गुल केली होती. हे म्हणजे कतरीना बाईंनी होममिनीस्टर च्या कार्यक्रमात नौवारी नेसून दाखवण्याचे प्रात्यक्षिक देण्यासारखे आहे.

१३. आणि सर्वात शेवटचे पण सर्वात महत्वाचे: भगवान बुध्द एकही गझल न लिहीता मायबोलीवर फेमस झाले आहेत. Happy

तुम्ही अनुभवलेले 'ईतर' गोंधळ अवश्य लिहावेत.

ता.क.: घटनांच्या तपशीलात 'तांत्रिक' चूका असू शकतील. तरिही कृपया मुद्दा समजून घ्यावा. ऊगीच सोयीस्कर अर्थ लावून गोंधळात भर घालू नये अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

oops....! admin he lalit madhye halavaal kaa...?

(kaahitari ghoL aahe... chaalu ghaDAmoDI madhye fakta devanaagari type hotay baaki kuthech naahi... tyaamuLe tithech type kela paN copy paste karun lalit madhye halavaayacha visaralo..!) he IE10 muLe hotay kaa..? adhi hot navhata... Sad

लिहीण्याची शैली मस्त आहे.
'देहाती औरत' चा १ वेगळाच गोंधळ मध्ये झाला.
चा-याचे पैसे घरात सापडलेच नाहीत म्हणे.कुठे आहेत पैसे दाखवा.मुख्यमंत्री काय ट्रेजरीत जाऊन पैसे घेऊन आले काय? असंही सौ.लालू म्हणाल्या.
मंगळावर जाण्यासाठी( वन वे तिकीट ) लोकांच्यात चढाओढ चालू आहे.
झालंच तर देशसेवेसाठी अविवाहित राहणे / आपल्या स्वप्नांचा चुराडा करणे हे एक नवीन फॅड युवक(?) नेत्यांच्यात चालू झाले आहे.

भारत हा एक प्रचंड गोंधळाचा (की गोंधळींचा) देश आहे, हे (बहुदा) मार्क ट्वेनचं वाक्य आठवलं. २०१४ ला मिळणार्‍या गॅसचे दर आताच वाढवुन देण्याचे ठरले आहे. तेही ४ पट ? नकाराचे बटन आले, पण त्याचे नेमके काय करायचे, ते अजुन निवडणुक आयोगाने/ संसदेने ठरवलेच नाही :(. म्हणजे उगाच frustration काढण्यासाठी वापरायचे की काय?

आहे खरा सावळा गोंधळ - आणि प्रत्येक वेळी 'कालचा बरा होता' असं म्हणायची वेळ येतेय दुर्दैवाने Sad