झुलतो आहे बहर सख्या

Submitted by भाग्यश्री ७ on 28 September, 2013 - 10:01

प्रेमाने मन तुडूंब भरले सरोवरी त्या विहर सख्या
गूज मनीचे सांगुन कानी उठव तयावर लहर सख्या

तुला पाहता ओळख पटली लगेच साताजन्माची
असे वाटते याच क्षणी की गोठुन जावा प्रहर सख्या

पेलवेल ना धनू शिवाचे ? तनू तुझी सुकुमार असे......
या शंकेने मनामध्ये बघ, केला आहे कहर सख्या

तुझे दुःख दे, तुझी वेदना, तुझी यातना मलाच दे..
काहीही दे, नकोस देऊ पण विरहाचे जहर सख्या

वसंत होउन भेटलास तू या धरतीच्या कन्येला
फांदीफांदीवरी मनाच्या झुलतो आहे बहर सख्या

भाग्यश्री कुलकर्णी

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान..

फसव्या वाटा, हसरी वळणे, भासे सारे अनोळखी
शोधुन पहाते पुन्हा एकदा तुझ्यासवे हे शहर सख्या

- रमा..

रमा, पुलस्ती, सुशांत, अंजली, अरविंद......मनापासुन धन्यवाद!!! Happy Happy

रमाजी, खुप मस्त आहे तुमचा शेर!!! आवडला. Happy

या शंकेने मनामध्ये बघ, केला आहे कहर सख्या<<सर्वाधिक आवडली ही ओळ

गझलेची जमीन छान आहे आवडली
शेरही छानच पण मला जरा जास्तच गोड वाटले असो वैयक्तिक मत आहे हे माझे . आपण वाईट वाटून घेवू नयेत प्लीज Happy