असले कसले जेवण केले

Submitted by पाषाणभेद on 22 September, 2013 - 11:33

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिर्घोत्तरीप्रश्नांची थोडक्यात उत्तरे :

१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
<<<कुठेच जाणवत नाही !!!! पुराणकाळापासून बायका ह्या अश्ष्याच असतात त्यांचे विचारही अश्शेच असतात नवर्‍याबद्दल Sad

२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)

<<<< खरेतर हा प्रश्न एका वाक्यासाथी हवा होता !!!! पण असो .....
नायिकेचा नवरा केवळ आणि केवळ बिच्चारा वाटतो !!! आणि बिचार्‍या माणसाची बिच्च्रारा असणे इतकीच स्वभाव-गुणवैशिष्ठ्ये असतात !!! Lol

३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
<<<मुलींसाठी आहे होय हा प्रश्न मग राहूदेत !! Uhoh

४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत?
<<< एकच सूचना मला लग्नाची मागणी घालू नये मला बिच्च्रारा व्ह्यायला जमणार नाही !!!!!! Rofl

एका वाक्यातली उत्तरे :

१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?<<<< ज्याना स्वयपाक जमत नाही ते !!! Lol

२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)<<< करायचीच कशाला ???? :रागः

३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?<<< मला नुकतीच लागली त्यावरूनतरी असाव्यात Wink

मास्तर सढळ हातानी मार्क द्या !!! ......पहिल्यांदाच पेपर सोडवतोय ह्या विषयाचा Happy

आयटीतली नोकरी नव्हे. त्याला 'ऐटीतली नोकरी' असे म्हणत असत.
आजकाळ नव्या ऐटदारांची वेठबिगारी पाहून कीव येते.
असो.
--------------------
स्वाक्षरी:
खोडी माझी काढाल तर अश्शी मारीन फाईट
घटकेमधे विरून जाईल सारी तुम्ची ऐट (हो सारी तुम्ची ऐट) ॥धृ॥