मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १० (ऑर्किड)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 18:28

मायबोली आयडी - ऑर्किड
पाल्याचे नाव- जय
वय- ७ वर्षे

Bappala Patra - Jay Phadke.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. मस्त पत्र. जय ने स्वत: हुन्च लाडका असे लिहिले आहे.
आणि उंदीरमामाना पण बजावले आहे की सीट कव्हर्स फाडु नकोस.

कसलं गोड पत्रं आहे!
>>गाडीची सीटकव्हर्स फाडायची नाही. Lol

बाळ हार्डकोअर गाड्या फॅन दिस्तंय. सात वर्षांच्या वयात बुगाटी व्हेरॉन माहिती आहे!

हो नं मलाही ह्याचंच आश्चर्य वाटलं की सात वर्षाच्या मुलाला बुगाटी व्हेरॉन माहिती आहे. आणि उंदीरमामाला ताकीद की सीट कव्हर्स फाडायची नाहीत!.. Lol शिवाय तुझा लाडका... खूप आवडलं पत्र!....:स्मित:

सर्व ़काका, मावशांना जयनी थँक्स सांगितले आहे. त्याला सर्व प्रतिक्रीया वाचून खूप आनंद झाला. पुढच्या उपक्रमातही भाग घेइन असे अत्ता तरी म्हणतो आहे.
मृण्मयी, शांकली, योग, खरे आहे , जय सतत मर्सिडीज,शेव्हर्ली, बीएमड्ब्ल्यू, निस्सान वगैरेची मॉडेल्स बघत असतो. बुगाटी आणि पगॅनी huayra झोंडा खास आवडीच्या! रस्त्यावर जाणार्या गाड्यांचे हेडलाईट्स बघुन मॉडेल ओळखणे हा आवडीचा खेळ आहे. Happy
बाकी ते सीट कव्हर्स लिहायचं कारण आहे, सुमारे ८-१० महिन्यांपूर्वी कारच्या बॉनेट मधे उंदीर मरून पड्ला . मग ते स्वच्छ करण्याचा सोहोळा याने मन लावून बघितला. तेव्हापासून दर महिन्याला गाडीत डांबराच्या गोळ्या टाका अशी आठवण करतो. एकूण उंदीर प्रकाराचा धसका घेतलाय.

आत्तापासून बुगाटी ? मग लायसन्स मिळाल्यावर काय मागणार ? बाप्पा वचकून असणार बहुतेक Happy
अक्षर छान आहे

Lol मस्त पत्र!
बाप्पाला सॉलिड ताकिदांवर ताकिदा दिल्यात - मला बुगाटी व्हेरॉन दे, गाडी तू चालव, उंदराला सीट कव्हर फाडू नकोस म्हणून सांग, पुढच्या वर्षी लवकर ये Lol भारी!!