हात सोडावा उन्हाचा सावलीने ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 September, 2013 - 15:17

बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने

बोल वा बोलू नको, चालेल दोन्ही
मामला सुटणार नाही ताकदीने

टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?

निर्णयावरती कशी रे ठाम राहू ?
चित्त डळमळतेच ना घडल्या कृतीने !

कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने

एकदा उमलायचे होते तिलाही
उमलण्याआधी मिटावे पाकळीने ?

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने

आवडला गं! Happy

टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?...दोन्ही मिसरे उत्तम, पण सुटॅ

कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने<<< व्वा

गझलही आवडलीच

बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने

कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने

हे दोन शेर आवडले. इतर शेरांत सुधारणांना वाव दिसला.

गज्गझल आवडलीच..पण त्यातही
<<कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
>>
अगदी आरपार आहे.. बहोत खूब

chhan

>>
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
<<
क्या बात! Happy

कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने>> सुरेख !

टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?>>व्वा!
उत्तम गझल.