मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १६ (हर्पेन)

Submitted by संयोजक on 17 September, 2013 - 17:47

बाप्पाला पत्र
मायबोली आयडी - हर्पेन
पाल्याचे नाव - अद्वैत
वय - आठ

Bappala Patra Adwait(1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाठीमागे लागून लिहायला लावले म्हणून शेवटी काल रात्री 'हे' दिले मला...
'काय त्रास आहे बाबांचा. घ्या एकदाची, लिहीलं.. असं म्हणून दिलं का तुमच्याकडे? Lol

माझे आयुष्य खुप मोठे होऊ दे. Happy युनिक मागणी आहे. छान पत्र..
पण बाबाने इकडे एक्सप्लेन केल्यामुळे पत्र लिहितांना आलेला वैताग जाणवतोय.. म्हणून तर बाप्पाच्या त्रासाची जाणीव झाली नसेल ना? Lol

चैत्राली - ऑलमोस्ट तसेच :), त्याने अद्वैतने जे पत्र लिहायचे ठरवले होते, त्यामधे धाकट्याला सातवीत घालशील तर मलाही दहावीत घाल असे सगळे लिहायचे होते, पण घाईत लिहिल्याने राहून गेले असावे.

सानी - पण बाबाने इकडे एक्सप्लेन केल्यामुळे पत्र लिहितांना आलेला वैताग जाणवतोय.. अगदी एकदम, त्याला आज सुट्टी असल्याकारणाने रात्री उशीरा जागत बसला होता, मग काय त्याच्याच भाषेत आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून सांगितले पण गुणी आहे अद्वैत, वैतागला पण लिहिले. Happy

चैत्राली, मला वाटते, इमारतीतले सर्व सवंगडी ह्या दोघांपेक्षा मोठे आहेत, त्यांच्याकडे असणार्‍या नवनवीन गोष्टी तितके त्यांच्याइतके मोठे झाल्यावर मिळतील असे सांगितले जाते त्यामुळे लवकर मोठे होण्याची घाई असावी Happy

ओह, हर्पेन, मला वाटलं ही दादाला competition आहे.

ते इमारतीतले सवंगडी' मी इमारतीतले गवंडी वाचलं आधी. गवंड्यांच्या मुलांकडे ह्यांच्या मुलांपेक्षा चांगल्या वस्तू..:अओ: Proud

चैत्राली - अरे देवा! कठीण आहे!
कालच मी कुठेतरी वाचले की "I can take responsibility of what I write, but not what you understand and interprete" त्याची आठवण झाली.

अरे वा अद्वैत ने पण मस्त पत्र लिहिले... मग एवढा भाव का खात होता तो.. मला तर आठवीत असताना अद्वैत हे एवढे कठीण नाव पण लिहायला जमले नसते.. Wink

माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे .... हा खूप फिलॉसॉफिकल डायलॉग आहे... जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये.. असे काहीसे बोलायचे असेल त्याला.. Happy

धन्यवाद प्राजक्ता,
अभिषेक - अरे आठवीत नाही आठ वर्षांचा आहे तो. आणि भाव खायचे म्हणशील तर त्यापेक्षा आळशी म्ह्णता येईल त्याला, मग चैतन्यचे कौतुक वाचून दाखवले आणि तुझा प्रतिसाद मग कुठे तयार झाला, तर तुला खास धन्यवाद Happy

अरे हो खरेच आठवीत नाही आठ वर्षाचा... टायपो झाला ते..
तिसरीत वा चौथीत असेल.. पण चौथीला स्कॉलरशिप मिळवण्याचे फुल्ल चान्सेस आहेत.. कारण या वयात शिष्यवृत्ती हा पण एक कठीण शब्द त्याला माहीत आहे.. तसेच तो आळशी आहे.. अन आळशी मुले सॉलिड हुशार असतात Happy

अद्वैत - मस्त पत्र लिहिलेस रे.... बाप्पाला त्रास झाला का विचारणारा तूच रे एकटा ...

माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे .... हा खूप फिलॉसॉफिकल डायलॉग आहे... जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये.. असे काहीसे बोलायचे असेल त्याला. >>>> अगदी अगदी ...

ते इमारतीतले सवंगडी' मी इमारतीतले गवंडी वाचलं आधी. गवंड्यांच्या मुलांकडे ह्यांच्या मुलांपेक्षा चांगल्या वस्तू. >>>>>> हा हा हा हा