नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<खरंच.. मी पण सुरुवातीलाच जाह्नवी आणि श्री चं केललं भरभरुन कौतुक सगळं वाहून गेलं.. तेंव्हा हा धागा वाहता होता ना>

लक्षात आहे माझ्या Wink

कित्येक दिवसांनी/वर्षांनी छान(च) मालिका बघायला मिळतेय.
>>>
इतक्यात असं म्हणू नकोस ग डोळा मारा
आठवा - एलदुगो >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>+११११११११११११११११११११११११११११११११

एलदुगो ह्याच्यापेक्शा बरीच चान होती, शेवच्ल स्त्रेच वगळता.>>>>>>>>+१११

नाहीतर आमचा घनामाऊली सॉफ्टवेअर इंजिनअर का तत्सम काहीतरी असून लॅपटॉप उघडणे आणि तावातावाने बंद करणे यापलिकडे बात नाही. आणि याबाब्याला अमेरिकेला जायचे होते त्या क्वालिफिकेशनवर...>> आशुचॅम्प + १

मयेकर!!! डोळा मारु नका!! Proud

आजच्या [सोमवार] भागात काही धक्कादायक असे काही प्रकरण दिग्दर्शकाने दाखविले नाही. बघणार्‍यांवरही रविवारच्या एक तासाचा 'इफेक्ट' अजूनी कार्य करीत असल्याने सारे त्याचे नशेत गुंगून गेले होते. आज जान्हवी सायंकाळी घरी चालत जात असताना चाळीतील तिचा मित्र मनिष तिला भेटतो. त्याला आनंदाने श्री समवेत झालेला सारा किस्सा हसतमुखाने सांगते. तोही खूष होऊन जातो. घरी वडिलांना ती सोन्याच्या बांगड्या दाखवित असतानाच आई येते आणि त्या बांगड्या तिच्याकडून 'चोरीला जातील' अशी भीती घालून स्वत:च्या हातात घालते. त्या कृतीला नवरा व मुलगा विरोध करतात. पण जान्हवी समजून घेऊन चूप बसते...[आता पुढे या बांगड्यावरून काहीतरी आगळे प्रकरण रंगणारच]

इकडे श्री च्या घरी सहाही स्त्रिया 'सूने' ची बातमी ऐकायला उत्सुक असतात आणि त्यानी प्रत्येकी एक याप्रमाणे तिच्यासाठी साड्या आणलेल्या असतात ज्या त्या श्री कडे तिला देण्याकरीता देतात. इथे मात्र आता "तिला घरी कधी आणणार ?" हा अपेक्षित प्रश्न श्री ला विचारला गेला आणि श्री सांगतो 'तुम्ही म्हणाल तर उद्याच दाखवायला आणतो..." यावर एक आई भोळसटपणे म्हणते, 'तिला कशाला दाखवायला आणायचे. तिला तर आम्ही पाहिले आहेच ना..." इथे श्री थबकल्याचे दाखविले आहे. तो या उदगाराबद्दल कोड्यात पडला आहे. त्याचा खुलासा उद्या होईल.

रिया मला एलदुगोपेक्षाही जास्त आवडू लागलीय. Proud पुढे त्यांचं लग्न वगैरे झाल्यावर काय होईल माहित नाही पण आत्ता तरी आवडतेय Happy

रविवारच्या भागात 'रडू नकोस ना' असं श्री चं सांगणं खूपच क्यूट.
श्री जान्हवीला मिठीत घ्यायला जातो त्यावेळी मी रडत नाहीये म्हणते तो सीन तर लाजवाब झाला आहे.>> +१

श्रीच्या आजीने सुनेसाठी दिलेल्या बांगड्या स्वतःला घेणं हा जान्हवीच्या आईचा आगाऊपणा म्हणजे हाईटच झाली त्या बयेची, जान्हवीपण काय सासरच्या बांगड्या तिला देऊन टाकल्या, हि प्रतारणा आहेना श्रीची. जान्हवीचा इतका साधेपणा बरा नाही.

एक तासाचा एपिसोड शक्यतो दुसऱ्या दिवशी रिपीट नाही करत, सोमवारी शनिवारचाच दाखवतात.

अन्जू........ जाह्नवीची आई जरा जास्तच दाखवली आहे......केवढा तो हावरटपणा......जाह्नवीच्या वडिलांनी सांगायला हवं होतं तिला....या बांगड्या जिच्या हातात असतील ती त्या गोखल्यांची सून.....तू करणारेस का श्रीरंग गोखलेशी लग्न? आणि करशीलही कदाचित, पण सहा सासवांच्या तालावर नाचता येईल का बये तुला?

अन्जू....

सहस्त्रबुद्धे यांच्या घरात जान्हवीची आई अगदी डॉमिनेटेड पर्सन आहे असेच रंगविले आहे. सोने कधीही पाहायला न मिळाल्याने तिला त्या बांगड्यांचा मोह होतो व जान्हवीकडून त्या काढून घेते. कारण सांगते चाळीतील बायकांना दाखवायच्या आहेत. त्यावर वडील आणि मुलगा तिच्यावर चिडलेले दाखविले आहेच, तथापि जान्हवी मुळातच शांत व समजूतदार मुलगी दाखविल्याने "असू देत तिच्याकडे तोपर्यंत. मला ज्यावेळी हव्या असतील त्यावेळी देईल ती...' असे म्हणून विषय संपविते. त्यावर तिचा भाऊ हताशपणे तिच्यापुढे हात जोडतो.

कथानकाला इथे काहीसे वेगळे वळणही लेखिका लावण्याची शक्यता आहे. म्हणजे माझा अंदाज असा की अनिल आपटे ७० हजार रुपये परत घेण्यासाठी जर शशीकलाबाईकडे आलाच तर हिच्याकडे एक फुटकी कवडीही नसल्याने ती आयत्यावेळी हातातील बांगड्या त्याला देवू करेल....अन् तसे झाले तर मग जान्हवीच्या संसाराला आणखीन् एक भरजरी वेदना जोडली जाईल.

पाहू या..... मधुगंधा काय ठरवितात ते.

पण ज्या पद्धतीने जान्हवी बोलत होती तेंव्हा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी स्वतःची उजळणी नक्कीच झाली असेल>>>>>>>>>> शुके काय बोललीस Happy माझ्या तर बर्‍याचदा उजळण्या होतात Happy

अनिल आपटे ७० हजार रुपये परत घेण्यासाठी जर शशीकलाबाईकडे आलाच तर हिच्याकडे एक फुटकी कवडीही नसल्याने ती आयत्यावेळी हातातील बांगड्या त्याला देवू करेल.... >>>काल "आईच्या बांगड्या" पाहुन हेच वाटले.

महाएपिसोडमधे सगळे गोड संवाद चालू असताना आमचं अर्धांग मात्र मिस्किल हसत, " थांब जरा... लग्नाला काही वर्षं उलटूदेत... मग हेच संवाद कसे बदलतात ते बघू" वगैरे फुटाणे फोडत बसलं होतं. Proud
कारण कधीकाळी या फेजमधून गेल्याचा आणि आता तो "कधीचा काळ!" झालाय या जाणिवेचा तो साक्षात्कार होता Wink

बाकी मला सिरिअल जाम आवडतेय! Happy

इथे कुणाला जान्हवीचे हसणे ओव्हर नाही का वाटत? किमान निम्म्या तरी वेळेस अत्यंत खोटे हसते ती.

@सुमेधाव्ही .
+११

तिला सांगितला आहे , हसताना छान दिसतेस ..म्हणून मग सारखच हसते ..

सुमेधा....

जान्हवी....हसू दे बिचारी, जितके हसते तितकी. नाहीतरी एकदा का त्या सहा सासवांच्या कांडपात ती गेली की सारे हसू ती विसरणारच आहे.

अन् एक दर्शक या नात्याने मी नक्की म्हणू शकतो की तिचे हसणे खोटे वाटत नाही. तसेच तिचे रडणेही नैसर्गिक वाटते.

हो मलाही तिचे नेहमीचे हसू नॉर्मल वाटते. पण खळखळून हसते तेव्हा ते फारच ओढून ताणून आणलेले व खोटे वाटते.

श्री, मुलीत मुल्गा लांबोडा झालाय अगदी. नशीब प्यून व क्लायंट तरी पुरुष आहेत नाहीतर तोही अय्या इश्श करायला लागला असता एव्हाना Happy

प्लीज कोणीही रागावु नका आणि अशोकमामा तुम्ही पण पर्सनली घेऊ नका पण तुम्ही अगदी लहान मुलाच्या निरागसतेने ही मालिका बघता आणि सारखं कौतुक करता आणि जान्हवीची बाजु घेता हे खुप गमतीदार वाटते.. Happy

तिचे नेहमीचे हसू नॉर्मल वाटते. पण खळखळून हसते तेव्हा ते फारच ओढून ताणून आणलेले व खोटे वाटते. +१

ओहो...पियूपरी.... मी कबूल करतो की अगदी निरागसतेने ही मालिका पाहतो..... त्याला एक कारण म्हणजे ही जान्हवी मला माझ्या एका भाचीसमान वाटते, त्यामुळेही तिची बाजू मी नेहमी घेत असतो....शिवाय ही पहिलीच मराठी मालिका आहे, जी मी आवर्जून पाहात आहे.

अन्जु. Lol

जान्हवी एरवी खरंच काम चांगले करते. फक्त ते अति-हसणे व डोळे पांढरे करणे जरा सांभाळायला हवे Happy
ह्या बिचार्‍या मराठी सिरीअल्सना बजेटचा मोठा प्रश्न दिसतो. त्यांची श्रिमंतांची घरे हल्लीच्या श्रिमंतांची नाही वाटत. हो.सू.मी. या.घ पेक्षा तुझेनीमाझेजमेना मधल्या गरीबांची घरी जास्त श्रिमंत वाटतात.

ही पहिलीच मराठी मालिका आहे, जी मी आवर्जून पाहात आहे.>>>>>माझ्यासाठी अशी मराठी मालिका 'ए.ल.दु.गो.' होती.

अंजू...... Proud

अशोक मामा, पहा हो तुम्ही मालिका.....ते म्हणतात न, "ऐकावे जनाचे, आणि करावे____" तसच!

Pages