नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकजी कालच्या अख्ख्या भागात जान्हवी श्रीला त्याच तिच्या आयुष्यातील महत्त्व सांगतानाचा तिच्या अभिनयाला तोड नव्हती. काय सुरेख मांडल्यात तिने तिच्या भावना Happy अगदी माझ्यासारख्या दगड मुलीच्या डोळ्यातुन पाणी काढल काल तिने. Happy

शुभांगी आणि मुग्धा.....

तेजश्रीने साकारलेली कालची 'जान्हवी' पाहून खुद्द ती स्वत:च त्या भूमिकेच्या प्रेमात पडेल. प्रत्येक वाक्यात तिचा भोळसरपणा असा काही जिवंतपणे समोर आला की श्रीरंग गोखले मनातून खूष होऊन गेले.... कित्येकदा श्री मुद्दामच तिला लटका राग आणत होता. कालची केमिस्ट्री भलतीच रंगली.....तो रुमाल अन् टिश्यू पेपरचा संवाद तर धमालच.

तुम्ही लिहिले आहे की, "मुलीच्या डोळ्यातून तिने पाणी काढले...." पण वस्तुस्थिती अशी आहे की पुरुष दर्शकही तितकेच भावुक झाले होते.

आज बहुतेक श्री तिला आपल्या घरी नेणार आहे.....[आय मीन, तशी रनिंग जाहिरात झी स्क्रीनवर येत आहे].

मुद्दामच तिला लटका राग आणत होता. कालची केमिस्ट्री भलतीच रंगली.....तो रुमाल अन् टिश्यू पेपरचा संवाद तर धमालच.
>>>
अनुमोदन!!!

मामा, काल दोनदा बघितला मी तो एपिसोड मुद्दाम. मी पण प्रेमात पडले श्री आणि जान्हवीच्या Happy

आमच्या साबा तर घळाघळा रडत होत्या रडताना पाहुन. जोक्स अपार्ट, ती जेव्हा सांगते की श्री तिच्यासाठी किती महत्वाचा आहे, तिच त्याच्यावर किती प्रेम आहे, सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेतेपर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीत तो आहे. तिचा जन्मच त्याच्यासाठी झालाय आणि बरचं काही. सगळी वाक्य बर्‍याचदा ऐकलियेत आपण पण ज्या पद्धतीने जान्हवी बोलत होती तेंव्हा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी स्वतःची उजळणी नक्कीच झाली असेल Wink

हो हो...अन त्यावर तो माझ्याकडे सात रुमाल आहेत असं काहीसं बोलतो..तो संवाद पण भारीए Happy

कालचा एपिसोड वेड क्यूट होता. मला श्री आणि जान्हवीच्या प्रपोज करण्यातलं होकार देण्यातलं सर्वात काय आवडलं असेल तर त्यांनी (कदाचित मुद्दाम) दाखवलेलं साधंसुधं नैसर्गिक मराठमोळंपण! मराठीतही खूप सुंदर प्रेम करता येतं, त्यावर भरभरुन बोलता येतं हे हल्ली विसरायलाच झालंय. आय लव्ह यू म्हणूनही, त्यापुढे जे जान्हवी बोलत राहते ते कदाचित फक्त मराठीतच मराठी माणूस मनापासून बोलू शकेल. माझी अर्धांगिनी होशील का? हे श्री ने विचारलं तेव्हा त्यातलं वेगळेपण अधोरेखित झालं होतंच, पण विल यू मॅरी मी? किंवा थेट भाषांतर 'माझ्याशी लग्न करशील?' पेक्षा ते अधिक भावपूर्ण झालं होतं आणि त्यामुळेच लीना भागवत म्हणतेच ना, की अरे असं विचारलंस ती रडणारच की रे! जेव्हा खूप प्रेम असतं तेव्हाच असं रडू येतं.. गेल्या काही दिवसांपासून अशा भावभावना मराठीतून लिहीताना मला स्वतःला हे स्पष्टपणे उमगत गेलं आणि ते तसंच समोर अनुभवताना मला काय वाटतंय हे सांगता येत नाहीये. मला हे सारं प्रचंडच आवडलं आहे. आणि दिवसेंदिवस आणखीच आवडतंय. Happy

मामा, काल दोनदा बघितला मी तो एपिसोड मुद्दाम. मी पण प्रेमात पडले श्री आणि जान्हवीच्या >>> मी सुध्दा दोनदा बघितला एपिसोड आणि मीही प्रेमात पडले दोघांच्या Happy

श्रीने जान्हवीला मिठीत घेण्याच्या प्रसंगातले दोघांचेही expression.... श्रीच्या वागण्यातून व्यक्त होणारा विश्वास आणि त्याची जान्हवीला जाणिव होऊन तिने त्याच्या मिठीत विसावण... एकदम झकास. शब्दात सांगताच येत नाहीये.

कित्येक दिवसांनी/वर्षांनी छान(च) मालिका बघायला मिळतेय.
>>>
इतक्यात असं म्हणू नकोस ग Wink
आठवा - एलदुगो ;):फिदी:

tejashree1.jpg

तुम्ही लिहिले आहे की, "मुलीच्या डोळ्यातून तिने पाणी काढले...." पण वस्तुस्थिती अशी आहे की पुरुष दर्शकही तितकेच भावुक झाले होते.>>>>> काय आहे ना अशोक मामा आमच्या घरी पुरुष दर्शक एकच आहे माझा नवरा (विशेष म्हणजे त्यालाही ही मालिका आणि हे दोघे आवडत आहेत.)आणि भावुक होण हा प्रकार त्याच्याबाबतीत जरा दुर्मिळच आहे. त्यात टिव्हिवरच्या द्रुश्यांनी भावुक वगैरे होणार्‍यातला तो नाहिच. मी थोडी तरी होते पण मालिका किंवा सिनेमा बघताना अगदी तटस्थ असते, म्हणुन मी स्वतःला दगड मुलगी म्हणाले.

वेल मुग्धा.... जर का नवर्‍याला मालिका आणि श्री+जान्हवी आवडत असेल तर तो दिवस दूर नाही फार, ज्यावेळी त्यांच्याही डोळ्यात पाण्याचे एकदोन थेंब तरळतील. कारण का कोण जाणे मला सातत्याने वाटत आहे की मधुगंधा कुलकर्णी जान्हवीपुढे सासुरघरी काहीतरी कठीण असे आव्हान ठाकले आहे असे लिखाण करणारच.

तुम्ही स्वतःही तटस्थनेने ही मालिका बघू शकत नसाल असे वाटते; त्याला कारण म्हणजे जान्हवी चक्क तुमच्याआमच्यातीलच मुलगी वाटते....सबब तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आणि दु:खाचा उमाळा जणू काही आपल्या भोवताली असलेल्या एका मुलीचा वाटतो.

मालिकेचे यश नेमके त्यातच आहे.

(तुम्ही स्वतःही तटस्थनेने ही मालिका बघू शकत नसाल असे वाटते; त्याला कारण म्हणजे जान्हवी चक्क तुमच्याआमच्यातीलच मुलगी वाटते....सबब तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आणि दु:खाचा उमाळा जणू काही आपल्या भोवताली असलेल्या एका मुलीचा वाटतो.) अगदी अगदी खर आहे अशोक मामा हि पहा काही दिवसांपूर्वी जानुबद्दल मी लिहिलेल माझं मत >>>> ती नायिका खरच खूप गोड आहे. गोरी पान वगैरे नसली तरी सोज्वळ आणि सात्विक चेहरा आहे तिचा. मला अशी माणस खूप आवडतात. त्यांच्याकडे नुसत पाहिल तरी मन प्रसन्न होतं आणि अशा माणसांशी मैत्री झाली तर मग जॅकपॉट लागला असच म्हणायच Happy

मामा, काल दोनदा बघितला मी तो एपिसोड मुद्दाम. मी पण प्रेमात पडले श्री आणि जान्हवीच्या >>> मी सुध्दा दोनदा बघितला एपिसोड आणि मीही प्रेमात पडले दोघांच्या >>>+१

(तुम्ही स्वतःही तटस्थनेने ही मालिका बघू शकत नसाल असे वाटते; त्याला कारण म्हणजे जान्हवी चक्क तुमच्याआमच्यातीलच मुलगी वाटते....सबब तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आणि दु:खाचा उमाळा जणू काही आपल्या भोवताली असलेल्या एका मुलीचा वाटतो.) अगदी अगदी खर आहे अशोक मामा हि पहा काही दिवसांपूर्वी जानुबद्दल मी लिहिलेल माझं मत >>>> ती नायिका खरच खूप गोड आहे. गोरी पान वगैरे नसली तरी सोज्वळ आणि सात्विक चेहरा आहे तिचा. मला अशी माणस खूप आवडतात. त्यांच्याकडे नुसत पाहिल तरी मन प्रसन्न होतं आणि अशा माणसांशी मैत्री झाली तर मग जॅकपॉट लागला असच म्हणायच >>> =+१
अरेरे कालचा भाग मिसला रिपीट कधी असतो?

मंजू..... मलाही हा एक तासाचा भाग पुन्हा पाहावासा वाटतो. त्याचे पुनर्प्रक्षेपण सहसा दुसर्‍या दिवशी असतेच पण आज तसे झाले नाही. त्याऐवजी त्यानी शनिवारचाच भाग वारंवार दाखविला. पण मला वाटते याच आठवड्यात तो कुठल्या तरी विचित्र अशा वेळेला प्रक्षेपित करतील.

मंजू, डेलीमोशनवर पहा ना कालचा एपिसोड!!!!!!!!! सुपर क्यूट होता, खरंच.. मी पण सुरुवातीलाच जाह्नवी आणि श्री चं केललं भरभरुन कौतुक सगळं वाहून गेलं.. तेंव्हा हा धागा वाहता होता ना!! आता परत तेच लिहायचा कंटाळा आलाय.. पण खरंच फार गोड जोडी आहे. संवादलेखनही खासच आहे या मालिकेचं. अजूनतरी भरकटली नाहीये, हे नशीबच.. लिमिटेड भागांची मस्त गोड मालिका असूदेत ही, म्हणजे छान आठवणी राहतील तिच्या.. एल्दुगोत शेवटी शेवटी खुपच स्ट्रेच केलं होतं घनाचं युएस प्रकरण, तसं इथे होऊ नये, अशी इच्छा!

शशांक केतकरची संवादफेक किती सुरेख आहे. संयत, आर्जवी ! फार आवडला आहे मला त्याचा आवाज.
जान्हवीचा साधेपणा, निरागसता आणि एकूणच भावमुद्रा फार गोड. एकुणात, सो फार सो गुड Happy

रविवारचा भाग मस्तच झाला. पण त्यातही मी श्री च्या आवाजावर फिदा Happy

khup chaan ahe malika. mala janhavi haste te aawadte

मला यात आवडले म्हणजे श्री खरोखर काम करताना दाखवला आहे आणि त्याचे संवाद पण बिझनेसमनला शोभेसे आहेत.
नाहीतर आमचा घनामाऊली सॉफ्टवेअर इंजिनअर का तत्सम काहीतरी असून लॅपटॉप उघडणे आणि तावातावाने बंद करणे यापलिकडे बात नाही. आणि याबाब्याला अमेरिकेला जायचे होते त्या क्वालिफिकेशनवर...

श्री जान्हवीला मिठीत घ्यायला जातो त्यावेळी मी रडत नाहीये म्हणते तो सीन तर लाजवाब झाला आहे...पुन्हा पुन्हा पहावा असा एपिसोड

"....त्यावेळी मी रडत नाहीये म्हणते तो सीन तर लाजवाब झाला आहे....."

आशुचॅम्प....

~ परफेक्ट नोट. मला वाटते त्या शॉटच्यावेळी सेटवरील सार्‍यांच्याच हृदयी विलक्षण अशा संवेदना उमटल्या असतील. त्याला कारण म्हणजे जान्हवी ही खरोखरचीच जान्हवीच्या वयाची, निर्मळ आणि संवेदनशील मुलगी वाटत होती. त्यातही विशेष म्हणजे तसल्या रडक्या अवस्थेत तिने "टिश्यू पेपर मीही वापरत नाहीत कारण जंगलतोड मला आवडत नाही....' असे स्फूंदत श्री ला सांगणे अगदी टाळ्या घेणारा सीन.

Pages