स्वप्न क्षितिजापार आहे

Submitted by आनंदयात्री on 28 August, 2013 - 00:51

जाणवे आता मला की, स्वप्न क्षितिजापार आहे
भोवती काळोख दिसतो, आतही अंधार आहे

मुखवटे चढवा कितीही, दाखवा शोभा स्वतःची
एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे

आपल्या असण्यात इथल्या फार मोठा फरक आहे -
तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे

यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाही
शोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/08/blog-post_27.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुखवटे चढवा कितीही, दाखवा शोभा स्वतःची
एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे <<< व्वा ! >>

ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे << सत्य >>

सुंदर

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे<<< मस्त मस्त!

सगळी गझल सहज उतरलेली आहे. Happy

छान Happy

भोवती काळोख दिसतो, आतही अंधार आहे

एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे

तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही

व्वा!

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे

व्वा….

आपल्या असण्यात इथल्या फार मोठा फरक आहे -
तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे
>>> हे पजो साठी आहे का? की तू इथे (माबोवर ) नसलीस तरी मी असणार आहे (तूला मी भेटलो आता तुला माबोची गरज नाही, काम झालं पण मी मात्रं तरी पण इथे येणार असं काही Rofl ) Proud

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे
>>>> ह्म्म्म्म माबोचं व्यसनच असं आहे Proud

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे
>>>> नाही टिकत माबो संन्यास Rofl

यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाही
शोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे
>>
रोमात असणारेस काय????

Lol
Light 1 हवा का?
आज पुन्हा वाचली आणि हे असं दिसलं मला या गझलेत Rofl

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे

क्या बात !
रिया , असे अ(न)र्थ कसे सुचतात ग Happy

रिया, तुझा लेडी वैवकु होऊ लागलाय
>>
जाणवलं ते मला Proud
पण कंट्रोलच नाही झालं Proud

नचिकेत परत परत सॉरी Proud

भारतीताई, हा माझ्या मैत्रिणीला घेऊन गेला.. आता येत नाही ती इथे Angry
म्हणून मीस करतेय मी तिला म्हणून..... Proud

भारतीताई, हा माझ्या मैत्रिणीला घेऊन गेला..<<<

भारती, रियाच्या या वाक्यावरून भलतेच गैरसमज होऊ शकतात. नचिकेत तिच्या मैत्रिणीला छोटा शकील वगैरेच्या थाटात घेऊन गेलेला नाही, देवाब्राह्मणांच्या साक्षीने वरमाला घालून घेऊन गेलेला आहे. हिला कोणीतरी घेऊन जाईल तेव्हा हिची ही घसरलेली भाषाशैली ट्रॅकवर येईल. Proud

लेडी वैवकु<<<<<< Rofl

चलो बदनाम हुवा लेकिन नाम तो हुवा !!!!!!!!

रियुडे डेण्जरच आहेस तू म्हणजे !!!! Happy
मस्त एन्जॉय केलीस गझल (आम्हालाही करवून दिलीस Wink ) धन्स

गझल सहजसुंदरच आहे..

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग
समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे>>>अप्रतिम !

प्रतिसादही दणकेबाज!! मज्जा आया!!

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे

शेर खूप आवडला.

Pages