क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स..तिखट.. सुलेखा.

Submitted by सुलेखा on 16 September, 2013 - 13:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मुख्य पदार्थ :--
Crispy Cheese Corn Balls 005_0.JPG
चीज- ३ लहान क्युब्ज .
पनीर--साधारण चीज इतके
स्वीट कॉर्न -१ १/२कप.
[२ नग स्वीट कॉर्न चे दाणे घेतले आहेंत.]

उप पदार्थ :-
Crispy Cheese Corn Balls 002.JPG
गाजर--१ नग.
सिमला मिरची--१ नग,
आले--१ इंचाचा तुकडा,
हिरवी मिरची--३ नग.बारीक चिरलेली
मटार दाणे--३ टेबलस्पून,
पुदिना पाने --१० ते १२ पाने,
कोथिंबीर चिरलेली-१ टेबलस्पून,
अर्धे लिंबू,
मिरेपुड -१ टी स्पून,
चाट मसाला -१ टी स्पून ,
मीठ.
फोडणी साठी -१ टेबलस्पून तेल,
तिखट किंवा खारी बुंदी-२ टेबलस्पून.

बॉल्स च्या बाहेरचे आवरण करण्यासाठी--
888888888888888888888.JPG
ब्रेड स्लाईस.
[या ब्रेड स्लाईसच्या बाहेरच्या चारी बाजुंच्या कडा सुरीने कापुन काढाव्या.]
बॉल्स घोळविण्यासाठी :--
कॉर्न फ्लोअर-१ टेबलस्पून ,
ब्रेड क्रम्स--साधारण एक वाटी.

बॉल्स तळण्यासाठी तेल --१ १/२ वाटी.

सजावटी साठी :--
क्रिस्पी बॉल्स बनविण्या साठी वापरलेल्या गाजर ,सिमला मिरची ,स्वीट कॉर्न चे दाणे वापरले आहेंत.
त्यासाठी गाजराच्या पातळ चकत्यांची फुले, सिमला मिरचीची पाने केली आहेंत .तसेच टुथपिक ला स्वीट कॉर्न चे दाणे, गाजराचे फूल,सिमला मिरचीचा चौकोनी तुकडा अडकवुन तळलेल्या बॉल्स वर खोचले आहे.

क्रमवार पाककृती: 

१] स्वीट कॉर्न मायक्रोवेव्ह मधे १ मिनिट फुल पॉवर वर ,बाऊलवर झाकण ठेवुन वाफवुन घ्यावे.
त्यानंतर मिक्सरमधे फक्त एकदाच फिरवुन खडबडीत /जाडसर वाटुन घ्यावे.तसेच मटार दाणे ३० सेकंद वाफवुन घ्यावे.
२] चीज व पनीर किसुन घ्यावे.
३] गाजर , सिमलामिरची --त्यातील पांढर्‍या बिया ,आतील पांढरा भाग काढुन --बारीक चिराव्या.
४] गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये १ टेबलस्पून तेल गरम करायला ठेवावे.तेल तापले कि त्यात चिरलेले गाजर,सिमला मिरची,मटार दाणे व स्वीट कॉर्न ,चिरलेली हिरवी मिरची घालुन ढवळावे.
आता गॅस मंद करुन पॅन मध्ये किसलेले चीज व पनीर ,मिरेपुड,चाट मसाला,लिंबाचा रस एक टी स्पून, कोथिंबीर व पुदिना पाने हाताने तोडुन घालावी.चवीनुसार मीठ घालावे.सर्व मिश्रण हलक्या हाताने ढवळावे आता गॅस बंद करावा.मिश्रणात २ टेबलस्पून ब्रेड क्रम्स व बुंदी मिसळावी. ब्रेड क्रम्स मुळे मिश्रणाला घट्ट पणा येतो व बाईंडिंग मिळते.मिश्रण दुसर्‍या बाऊल मध्ये काढुन घ्यावे.
थंड झालेल्या मिश्रणाचे गोल बॉल्स बनवावे.
हे आहे मिश्रण व त्यापासुन केलेले गोल बॉल्स:--
Crispy Cheese Corn Balls 011.JPG
५]एका लहान खोलगट प्लेट मध्ये थोडेसे पाणी घ्यावे.त्यात ब्रेड स्लाईस अगदी हलक्या हाताने भिजवुन लगेच बाहेर काढावे व दोन्ही हाताच्या तळहातात हळुवार दाबुन त्याचा मूळ आकार तसाच ठेवुन त्यातले पाणी काढुन टाकावे.
या भिजलेल्या ब्रेड मध्ये मिश्रणाचा गोळा भरुन गोल गोळा करावा.[पुरणपोळीच्या गोळ्यासारखा.]
एका लहान प्लेट मधे कॉर्न फ्लोअर व उरलेले ब्रेड क्रम्स एकत्र करुन घ्या.त्यात हा गोळा घोळवुन घ्या.
असे सर्व बॉल्स घोळवुन तयार करावे.
६]गॅसवर मध्यम आचेवर एका कढईत तेल तापायला ठेवा.तेल तापले कि गॅस मंद करुन तेलात हे बॉल्स सोनेरी रंगावर तळुन घ्या व पेपर नॅपकिन वर काढुन घ्या.
७]सर्विंग प्लेट मध्ये ठेवुन त्यावर तयार टुथपिक खोचा.गाजर चकतीची फुले व सिमला मिरचीची पाने यांनी सजवलेल्या ट्रे मध्ये सर्विंग प्लेट ठेवुन सर्व करा.
Crispy Cheese Corn Balls 018.JPG
८]सर्व बच्चेकंपनी ,तरुण व मोठ्यांनाही ही आवडतील असे चटकमटक "क्रिस्पी चीज कॉर्न बॉल्स "आस्वाद घेण्यासाठी तयार आहेंत.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात एकुण १२ बॉल्स तयार होतात.
अधिक टिपा: 

१]बुंदी सगळ्यात शेवट मिसळावी.त्याची चव आणि कुरकुरीत पणा बॉल्स तळल्यावर खाताना जाणवतो.
२]स्वीट कॉर्न ऐवजी साध्या कणसाचे दाणे वापरले तर चवीसाठी थोडी साखर घालावी.
इतर सर्व तयारी आधी करुन ठेवल्यास १५ ते २० मिनिटात बॉल्स तयार होतील.
३]ब्रेडच्या कापलेल्या कडा मायक्रोवेव्ह / ओव्हन किंवा कढई मधे कुरकुरीत करुन त्याचे ब्रेडक्रम्स बनविता येतील.
४]मिरेपूड,हिरवी मिरची व किसलेले आले यांचे प्रमाण ,तसेच चीज व पनीर यांचे प्रमाण चवीनुसार कमी /जास्त हवे असेल तसे बदलावे.पुदिना पाने हाताने तोडुन घातल्याने त्याची चव वेगळी जाणवते.
त्यामुळे वेगळ्या चटणीची गरज भासत नाही.

माहितीचा स्रोत: 
आंतरजालावर "मॅक अ‍ॅन्ड चीज "ची पाककृति पाहिली. त्यात मॅकरोनी व चीज वापरले आहे.त्यावरुन ही कल्पना सुचली.वरची पारी मैद्याची करण्या ऐवजी ब्रेड वापरली तर पारी कुरकुरीत होईल असे वाटले
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पदार्थ मस्तच लागत असणार.
साहित्याचीही नीट मांडणी करून त्याचे, मग मधल्या पायर्‍यांचे, आणि फायनल प्रॉडक्टला आणखी फिनिशिंग टचेस देण्यासाठी आणि क्रमवार पाककृती लिहिण्यासाठी किती पेशन्स लागला असेल!

पदार्थ मस्तच लागत असणार.
साहित्याचीही नीट मांडणी करून त्याचे, मग मधल्या पायर्‍यांचे, आणि फायनल प्रॉडक्टला आणखी फिनिशिंग टचेस देण्यासाठी आणि क्रमवार पाककृती लिहिण्यासाठी किती पेशन्स लागला असेल! >>>>>>>>>>+++११११११

क्रिस्पी चीज कॉर्न बॉल्स च्या पाककृती बद्दल मनापासुन प्रतिसाद दिल्याबद्दल, सर्व रसिक माबोकर मंडळींना मनःपूर्वक धन्यवाद !!!! .या पदार्थाची आखणी ,प्रचि,प्रत्यक्ष कृती करुन इथे प्रचि .सकट लेखन यात खरेच बराच वेळ लागला आहे.पण प्रत्यक्ष चव पाहिल्यावर खूप मस्त वाटले.
एकदा पाकृ लिहुन ती सेण्ड करेपर्यंत बराच वेळ लागला.ती सेण्ड केल्यावर "डिलीट " झाली.कारण मध्यंतरीच्या काळात कधीतरी नेट गेले होते,ते मला कळलेच नाही.ऑफ-लाइन लिखाण -त्यासाठीच्या सूचना वाचून न समजल्याने--अजुन मला येत नाही.त्यामुळे एक मोठ्ठा ब्रेक घेवुन निवांतपणे नव्या जोमाने पुन्हा लिहीले .

सुलेखा
अग पुर्वतयारी आणि एकूणच सगळं किती नेटकं दिसतंय Happy
अतिशय सुरेख. पदार्थही मस्तच झाला असणार.

सुलेखा , अवांतर - फायर फॉक्स वापर
नेट कनेक्ट केल्यावरही तू बॅक केलस तर ते लिहिलेलं लिखाण तसच दाखवतं Happy

मस्त यम्मी दिसताहेत.

साहित्याचीही नीट मांडणी करून त्याचे, मग मधल्या पायर्‍यांचे, आणि फायनल प्रॉडक्टला आणखी फिनिशिंग टचेस देण्यासाठी आणि क्रमवार पाककृती लिहिण्यासाठी किती पेशन्स लागला असेल!>>++

Pages