नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…

Submitted by अनंत छंदी on 12 September, 2013 - 04:49

नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…
माझी आई वय वर्षे ७९, तिला २००४ साली एक हार्ट अटेक आला होता त्या नंतर यावर्षीच्या संक्रांतीपर्यंत तिला फ़ारसा त्रास झाला नाही अर्थात त्यासंबंधी गोळ्या नियमीत चालू होत्या.
अशी स्थिती असताना किंक्रांतीच्या दिवशी तिला अस्वस्थ वाटू लागले श्वास घेताना त्रास होऊ लागला म्हणून हॊस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे एक दिवस ठेवण्यात आल्यानंतर डॊक्टरांनी घरी सोडले.
या वेळी तिला नायट्रोग्लिसरीन सलाईनद्वारे देण्यात आले.
त्याच्या दुसयाच दिवशी तोच त्रास पुन्हा सुरू झाल्याने तिला पुन्हा हॊस्पिटलमध्ये दाखल केले असता हार्टऎटॆकचे निदान डॊक्टरांनी केले, यावेळी तिला ३ दिवस हॊस्पिटलमध्ये ठेवण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने स्ट्रेप्टोकायनेज, नायट्रोग्लिसरीन व लो मॊलिक्युलर वेट हिपारीनचा समावेश होता.
त्यानंतर तिला किमान पाच ते सहा वेळा तोच त्रास पुन्हा उदभवल्याने हॊस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या प्रत्येक वेळी तिला देण्यात आलेल्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने नायट्रोग्लिसरीन व लो मॊलिक्युलर वेट हिपारीनचा समावेश होता. शेवटच्या वेळी तिला घरी आणल्यानंतर दुसर्या दिवसापासून जोरात दम लागू लागला अक्षरश: कफ़ दाटल्याप्रमाणे घुर्रघुर्र आवाज येत होता. यावेळी तिला पुन्हा हॊस्पिटलमध्ये नेले असता हे काय होते आहे ते मला कळत नाही तुम्ही पेशंटला अन्यत्र हलवा असा सल्ला डॊक्टरांनी दिल्यांने आम्ही तिला पिंपरी येथील डी.वाय.पाटील हॊस्पिटल व रीसर्च संटरमध्ये दाखल केले २८ मार्च ते ३० मार्च या कालावधीत ती आयसीयुमध्ये दाखल होती त्या वेळेच्या डीस्चर्ज कार्डवरून तेथील डॊकटरांनी हायपरटेशंन व अन्युट्रोसेप्टल एम आय असे निदान केल्याचे दिसते. यावेळी तिला
लॆसिक्स २०, सकाळी---दुपारी
एकोस्प्रिन ७५, दुपारी
इस्मो १०, सकाळी
क्लोपिटॆब ७५, दुपारी
रॆमिप्रिल २.५, सकाळी
स्टेटॊर ४० रात्री
पॆन ४० सकाळी अशी ट्रीटमेंट लिहून देण्यात आली होती. त्यानंतर बाकी सर्व ठीक होते परंतु रात्री झोप न येणे, निरर्थक हवेत एखादी गोश्ट पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे हातवारे करणे हा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला १२ एप्रिल रोजी चेकअपसाठी पुन्हा तेथे नेले असता त्यांनी तिला हॊस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. व दुसया दिवशी तातडीने आयसीयुमध्ये दाखल केले. यावेळी तेथील डॊकटरांनी तिच्या शरीरातील पोटॆशियमची लेव्हल वाढल्याचे सांगितले. आयसीयुमध्ये दोन दिवस ठेवल्यानंतर तिला पुन्हा जनरल वॊर्डमध्ये आणण्यात आले व १८ एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले. त्यावेळचे निदान इस्चिमिक कार्डियोमायोपथी व हायपरटेंशन होते असे डिस्चार्ज कार्डवरून दिसते. सध्या त्यावेळी सुचविल्याप्रमाणे
डायगॊगसिन ०.७५ एमजी. आठवड्यातून ५ दिवस सकाळी
रॆमिप्रिल २.५ एमजी सकाळी
एकोस्प्रिन गोल्ड २० एमजी दुपारी
कार्वेडिलॊल ३.१२५ एमजी दुपारी
डायटॊर १० एमजी सकाळी
शेलकॆल ५०० एमजी सकाळी
ऒट्रीन सकाळी---रात्री
पॆन ४० एमजी सकाळी अशी ट्रीटमेंट चालू आहे.
गेल्या महिन्याभरापासून तिला सतत ढेकर येणे व सांधे दुखणे या तक्रारी सुरू झाल्या आहेत. शिवाय थंडी वाजणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे या करीता तिला परत रुग्णालयात घेऊन गेलो असता त्यांनी परत पॆन ४० व म्युकेन जेल दिवसातून दोनदा घेण्यास सांगितले त्याप्रमाणे घेऊनही फ़रक नाही. त्यामुळे असे वाटते की, सध्या सुरू असलेल्या औषधांमध्ये फ़ेरबदल करण्याची गरज आहे की काय? या शिवाय अन्य पॆथीमध्ये काही उपाययोजना या समस्येकरीता आहे का? कृपया मला या विषयी मदत करा, कोणी अनुभवी तद्न्य सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे रीपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन एका निष्णात डॉक्टरचा सल्ला घ्या. पण ट्रीटमेंट चालू ठेवा.
त्यांना लवकरच आराम पडो.

सध्या सुरु असलेल्या औषधांत बदल करण्याची आवश्यकता मुळीच दिसत नाही. अधिक-उणे साती अम्मा सांगू शकतील.

तुमचा स्वतःचा असा फिक्स्ड फिजीशियन नाही का?(प्रेफरेबली एम. डी. - मेडीसीन). तुम्ही हे हॉस्पिटलला नेणे(एमर्जन्सीज सोडून) वगैरे त्यांच्या सुपरविजनखालीच करत आहात ना?

नसेल तर पहिल्यांदा एका फिजीशियनला शोधा.

सर्व ट्रीटमेंट्/डायग्नोसिस दरम्यान काय टेस्ट केल्यात तेही लिहा, कुठला पॅरामीटर अ‍ॅबनॉर्मल लेव्हलला आहे हे इथले वैदू सांगू शकतीलच.

वैदू????
अरारा ... इज्जतका इतना बडा फालुदा!
Wink

नेट कंसल्टेशन करणे योग्य नव्हे म्हणून या प्रश्नाला माझा पास.
मात्रं विदिपांचा एक फिक्सड फिजीशीयन ठेवायचा सल्ला योग्य आहे.
त्यांच्याकडे रेग्युलर फॉलिअप ठेवल्यास वरिलपैकी नेमक्या कोणत्या औषधाने गॅस्ट्राअटिस होतोय ते बदलून देतील किंवा अ‍ॅसिडिटी आणि ढेकरांसाठी पॅनहून पुढची सध्या एक दोन अत्यंत चांगली औषधे उपलब्ध आहेत ती देतील.

पुण्यात असाल तर डॉ.एन.एन बापट म्हणून एक चांगले एम.डी मेडी आहेत.पुण्यात दिनानाथमध्ये चौकशी करा.नविन कलमाडी हायस्कूलजवळ त्यांचे क्लिनिक आहे.

मात्रं विदिपांचा एक फिक्सड फिजीशीयन ठेवायचा सल्ला योग्य आहे.>>>>+१
तुम्ही पिंपरी जवळ रहात असल्यास जमले तर सगळे रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन चिचवडमधील निरामय हॉस्पिटललमधील डॉ.यादव ह्यांना दाखवा.

मघाशी मी टंकलेला मजकूर कुठे गायब झाला देव जाणे!
किरणू, दिनेश, डॉ.कैलास गायकवाड, विजय दिनकर पाटील, साती, पूर्वा, येळेकर या संस्थळावर वाचनमात्र असलेल्या माझ्यासारख्या अपरिचिताच्या मदतीच्या हाकेला आपण आपुलकीने प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणासर्वांचे मनापासून आभार!
रुग्णाला औषधोपचाराचा फ़ायदा होत नाही आणि औषधोपचारात बदलही केला जात नाही अशी स्थिती उद्भवल्यावर मनाची जी भांबावल्यासारखी स्थिती होते त्यातून ह्या धाग्याची निर्मिती झाली आहे. पुढील उपचारांची दिशा कळावी, तज्ज्ञांचे संदर्भ मिळावेत हा हेतू आहे.
@ सातीताई, आपल्या मताबद्दल मला आदर आहे, धन्यवाद!
@ विदिपा २००४ पासून आईची ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती ते डॉ. त्यांचे हॉस्पिटल असले तरी जनरल प्रॅक्टीसही करीत असल्याने फॅमिली फिजिशियन असल्यासारखेच होते. आता नवीन शोधणे भाग आहे.
@ डॉ. कैलास ट्रीटमेंटच्याबाबतीत आपला अभिप्राय मनाला धीर देऊन गेला.
@ पूर्वा, येळेकर आपण सुचविलेल्या नावांची दखल घेतली आहे.
@ किरणू, दिनेशदा आपल्या त्वरीत आणि नेमक्या आलेल्या प्रतिसादामुळे मनावरील भार हलका होण्यास खूपच मदत झाली.
आपणासर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.