बासरीवादन- चैतन्य दीक्षित

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 01:17



राग हंसध्वनी
बासरी- चैतन्य दीक्षित
तबला- प्रसाद वेल्हाणकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चैतन्य..... आज गणेशवंदनानंतर थेट तुमचे बासरीवादन ऐकायला मिळाले म्हणजे एक मोठा दुग्धशर्करा योगच माझ्या दृष्टीने. संयोजकांचेही खास आभार की त्यानी जाणीवपूर्वक या निमित्ताने चैतन्य दीक्षित यांची ही फित इथे दिली.

काहीसे विषयांतर जरूर होईल चैतन्य....तुम्ही निवडलेला हा हंसध्वनी राग आणि त्यातील एक द्रुत गती ऐकताना मला लता-आशा जोडगोळीचे "शारदा' चित्रपटातील "वो चांद जहाँ ओ जाये...' या गाण्याची लागलीच आठवण झाली. ते सुगोड गाणेही हंसध्वनीतच सी.रामचंद्र यानी गुंफले होते. असो....सहज आठवले म्हणून लिहिले.

अशोक पाटील

अहाहा, चैतन्या - किती मनापासून वाजवलीयेस - ऐकणाराही सहाजिकच रंगून जातोय अगदी ....

फार फार छान वाटले या सुमुहुर्तावर हे बासरीवादन ऐकून ...

तबला साथ पण अप्रतिम
रेकोर्डिंग मस्त Happy

वा!!

दोघांनीही झकास वाजविले आहे. तुमची दोघांचीही अशीच सांगीतीक प्रगती होवो.
सकाळपासून ऐकायचे होते. आत्ता ऐकता आले.

छान जमलय.. मुद्दामून संध्याकाळी परत ऐकले- हंसध्वनी ची पकड चांगली जमलीये.
[पहिल्या विस्तारात पहाडी धून च्या अंगाने जाते का असे वाटले... :)]

सुरेख Happy मान डोलतच राहिली नुसती! खुप खुप आवडलं तुझं वादन. रागही गोSSSड निवडलायस आणि तबल्याने अत्यंत मजा आणली. बापा प्रसन्न झाला असेल नक्कीच! पुन्हा पुन्हा ऐकत रहावंसं वाटलं आणि ऐकणारही आहे.

वा! कान तृप्त झाले. धन्यवाद.
पं. जसराजांचा 'पवनपूत हनुमान' ऐकल्यापासून हंसध्वनि माझा अत्यंत आवडता राग.

Pages