गणेशवंदना: मातंग वदन आनंद सदन

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 14:03
राग परमेश्वरीतील गणेशवंदना- मातंग वदन आनंद सदन




या गणेशवंदनेच्या संगीतकार श्रीमती वेदवती गोपालस्वामी यांचे वास्तव्य बंगळूरात आहे. त्यांना शास्त्रीय संगीताचे बाळकडु आपल्या वडिलांकडुन, ज्येष्ठ तबलावादक पंडित डी.एस. गरुड यांच्याकडून मिळाले. बाळपणापासून संगीताचे संस्कार झालेल्या श्रीमती वेदवती पुढे उत्तम प्रावीण्याने संगीत विशारद उत्तीर्ण झाल्या. हिंदुस्थानी संगीत कलाकार मंडळी, संगीत कला कुटीर, ऑरोबिंदो स्कुल, अक्षय, श्रुती, चिरंतन या संस्थांच्या माध्यमातून आणि खाजगी बैठकींमधुन त्यांच्या मैफिली पूर्ण कर्नाटकात झाल्या आहेत. गेली तीसेक वर्षे श्रीमती वेदवती संगीताचा प्रसार करत अनेक शिष्य घडवत आहेत. अनवट रागांमधील खयाल गायकी हे त्यांचे वैशिष्ट्य. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगमसंगीतासाठी चाली बांधणे हे त्यांचे आनंदनिधान आहे. अनेक भजने, वचन, सुफी पदें, काफी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
घरातील हा वारसा श्रीमती पूर्णा मैसुर (कन्या) यांनी आज आपल्यासाठी सादर केला आहे.

- रैना
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पूर्णाला द्या लोकहो.
तिने मागील वर्षी हाँगकाँग गणेशोत्सवात हे गायले होते. अतिशय सुरेख रचना आहे ही. त्या राग 'परमेश्वरी'ने वातावरणच भारल्यासारखे झाले होते.
बाकी पूर्णाचा आवाज आणि वर्तनही स्वच्छ, पारदर्शक, शिस्तबद्ध आहे. आणि तिच्याकडे बंदिशींचा अक्षरश: खजिना असतो.

Many Thanks Poorna for sharing your family heirloom at such a short notice. We are touched.
Happy

संयोजकांचे आभार.

शब्द,चाल आणि गायन तिन्ही छान आहेत.
( अवांतरः ध्वनीमुद्रण प्रसंगी गायिकेने माईक किंचित दूर पकडला असता आणि तबला अजून खणखणीत ऐकू आला असता तर हे गायन अजूनही जास्त आनंदायक झालं असतं इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो.)

Many Thanks Poorna for sharing your family heirloom at such a short notice. We are touched.>>> +१

फारच छान वाटलं.
सकाळीच ऐकलं हे. 'परमेश्वरी' कृपाच आहे ही.
धन्यवाद पूर्णा.
रैना, तुझेही खूप खूप आभार !

छान आहे गणेशवंदना. गयिकेचा आवाज आणि तयारीही छान आहे. मला स्वतःला चाल थोडीशी संथ वाटली, किंचीत जलदगतीने रचना उठावदार झाली असती असे वाटले. माझा एक सहकारी हीच रचना डफावर अत्यंत द्रुतलयीत, थोडीशी लोकसंगीताच्या बाजात आणि वरच्या पट्टीत गातो, तो राग कोणता आहे काही कल्पना नाही. 'मातंग वदन आनंद सदन' वाचल्यावर चटकन मनात त्याचे गाणे आल्यामुळेही कदाचीत मला असे वाटले असावे. पण नवे आणि वेगळे काहीतरी ऐकवल्याबद्दल तुला धन्यवाद रैना.

मातंग वदन आनंद सदन
महादेव शिव शम्भो नंदन
माया विनाशक मूषिक वाहन
मातामहेश्वरी भवानी नंदन
महागणपते मंगल चरण
महागणपते मंगल चरण

जालावर मिळाले. Happy

नाही देवकाका, पूर्णाने म्हणलेल्या बंदिशीचे शब्द वेगळे आहेत.

चैतन्य- मला ऐकु आले तसे लिहीते आहे.

मातंग वदन आनंद सदन
महागणपते हे शिवनंदन

विघ्नविनायक बुद्धीप्रदायक
सिद्धहस्त सुरमुनीगण सेवित
भद्रमुर्ती सिद्धीविनायक

मोदकप्रिय हे मूषकवाहन
नादातीतः कलीमलभंजन
श्री जगन्नाथा भवानी नंदन