चूक : अंतिम भाग

Submitted by यःकश्चित on 5 September, 2013 - 05:09

चूक : भाग अंतिम

==================================================

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

"सावळेसाहेब, मी नंदन खोले बोलतोय"

"बोला. बरेच धीट झालात की. काय काम काढलंत ?"

" आमच कसलं काम ? तुम्हाला माहिती द्यायलाच फोन केला. कोळीवाड्याच्या किनाऱ्यावर आणखी एक मृतदेह सापडलाय. "

" काय ? ", सावळे इतक्या जोरात ओरडले की मिसाळ आणि ढेरे दरवाज्यातून वाकून बघू लागले. त्यांना 'काही नाही झालं' असा इशारा केला आणि पुढे बोलू लागले,

" ठीक आहे मी आलोच पाच मिनिटात. "

" अच्छ ठीकाय. मी थांबतो इथे."

******

" खोले, मला तुमच्यावरच संशय येतोय आता. तुम्हीच काहीतरी करता आहात. "

" काहीतरीच काय साहेब ! एकतर तुम्हाला खबर द्या आणि वर - "

" असंच म्हणालो हो. बोला कसा सापडला मृतदेह ? "

" मी नेहमीसारखा मजुरांवर लक्ष ठेवण्यासाठी आलो तर इथेच आधीच गर्दी जमली होती. गर्दी कशासाठी झालीये हे पाहण्यासाठी म्हणून गेलो तर तिथे हा मृतदेह होता. मासेमारी करताना जाळ्यात सापडला असे कोळी सांगतात. "

" अच्छा. चला मग जाऊया तिकडेच. "

खोले आणि सावळे त्यांच्या फोरेन्सिक टीमसोबत घटनास्थळी निघाले.

शरीर पाण्याने फुगलेलं होतं. शरीरावर ठिकठिकाणी माश्यांनी चावल्याच्या खुणा होत्या. एखाद्या गुंडासारखा दिसत होता तो माणूस. त्याच्या कपाळावर मध्यभागी बुलेट घूसलेली होती. फोरेन्सिक टीमला त्यांचे काम करायला सांगून सावळे खोलेंकडे वळले.

" आणखी काही मिळालं का ?"

" नाही साहेब."

"धन्यवाद. येतो मी. गरज लागली तर बोलावेन."

*****

' आधीच त्या संतोषच्या खुनातला धागा सापडत नाहीये आणि वर नवीन केस. हा मृतदेह कोळीवाड्यावर सापडला, याचा संतोषच्या खुनाशी काही संबंध नसेल ना ? आता या माणसाचा तपास करायला हवा. या इरफानशी पुन्हा एकदा बोलावं. त्या पैंजणाचा प्रश्न आहेच. एका वेळी दोन-दोन केसेस ! देवा, मदत कर रे आता. '

विचार करकरून सावळेंच डोकं चक्राऊन गेलं होतं. त्यांनी एक इक्लेयर खाल्ली आणि डोळे मिटून भिंतीला टेकले.

*****

" बोल, संतोषला कसं मारलं ? "

सावळे लॉकअपमध्ये खुर्चीवर बसून इरफानला विचारात होते.

" मतलब शेठका बेटा ? "

" हो."

" क्या ? उसका खून हो गया ? कब ? कैसे ?"

" अरे वा ! जसं की तुला माहीतच नाही. काल काय सांगितलस की टपका दिया म्हणून. "

" या अल्ला.. ", पुढच तो मनात म्हणाला, " ये मै क्या कर बैठा ? "

" बोल लवकर. मी काय इथे तुझ्याशी गप्पा मारायला नाही आलोय."

"स..साब मैने संतोष का खून नही किया. "

सरळ सरळ पलटी !

" बऱ्या बोलाने सांग. पुन्हा मला जर का राग आला ना - "

" साब मै सच बोल रहा हु. मैने नही मारा संतोश को. "

" मग काल काय सांगत होतास. गद्दारी वगैरे..."

" स..स्साब..वो..क्क..क्कुच नही."

" आता बोलतोस का हिसका दाखवू. "

" सांब...मै...वो.."

सावळे त्याला हिसका दाखवायच्या तयारीतच होते. तेवढ्यात मिसाळची हाक आली.

" साहेब, ती कोळीवाड्यावरची बॉडी आली बघा. "

" आलोच रे. " पुन्हा इरफान कडे परत येउन, " तुला शेवटच विचारतोय-"

" एक मिनिट, साब. वो कोलीवाडा से एक लाश मिली क्या ? "

" हो. तुला त्याच काय ? मी जे विचारतोय ते सांग. "

" उसी लाश से तो तालुख है. "

" बर बोल."

" नही साब मुझे एक बार लाश को देखने दो. नही तो कल की तरह मै उसका बयान दुंगा जो खून मैने किया ही नही. "

" चल बाहेर "

दोघे बाहेर आले. इरफानने चादर उघडून पहिली.

" हा साब यही है वो. इसकोही मारा मैने. "

" हा कोण आहे ? "

" छोट्या. साब ये हमाराही आदमी है. मतलब अस्लमभाई का. कल मैने आपको जड नही बताया. लेकीन अब और कोई चारा नही है बताने के सिवा. उस दिन शेठ के वो दो लोग जाब निकाल गये. तो ये कहीसे टपक पडा और मुझे थोडा सोना मांगने लगा. मैने साफ इन्कार कर दिया. फिर वो मुझे मारने लगा. और मै भी उसको. "

" काल तरी म्हणालास की थोडा झगडा झाला म्हणून."

" नही साब. वो सिर्फ बताने के लिये था. फिर त्याने संतोशला धरला आणि त्याच्या गळयाभोवती हात कसके पकडला. संतोश लटपटा रहा था. छोट्या बोल रहा था की ' अगर तुमने सोना नाही दिया तो मै इसको मार डालुंगा.' मेरे पास घोडा होता. मी हुशारी लाऊन घोडा उसकी तरफ पकडा. फिर भी उसने नही छोडा . मग मी छोट्याच्या तराफ हवेत एक गोळी मारली. छोट्या जरा घाबरला और संतोषला सोडला. तो पुन्हा त्याला पकडेगा इतक्यात मीच त्याला पकडला. और संतोष को भागने के लिये बोला. संतोष जोरसे भागने लगा . फिर मेरी और छोट्या की हातापाई हुई. फिर मैने उसको सर मी गोळी मार दि. क्युंकी वो सून ही नही रहा था. फिर उसकी लाश किसीको मिल ना जाये इसलिये समुंदर मे फेंक दी. "

" मग संतोष कुठे गेला ? "

" वो घर गया होगा ऐसा समझके मै भी गाडी लेके गोडाऊन गया, माल पहुचाया और निकल पडा. ताकी इस खून के झंझट मे ना अटकु. वैसे तो अटकने की गुंजाईश भी नाही थी. लेकीन वो सब गलतफेहमी की वजहसे हुआ. "

" लेकीन यहा इन्स्पेक्टर सावळे है."

" मिसाळ ही बॉडी शवागारात हलवा. इरफानला आत टाका. आता इरफानच काय करायचं ते कायदाच करेल."

******

सारं कसं शांत झालं होतं. काही वेळापूर्वी रोंरावणारे वादळ शमले होते. साऱ्या प्रश्नाचा खुलासा झाला होता.

पोस्टमार्टेममध्ये म्हणल्याप्रमाणे खून दोनदा नसून एकदाच झाला होता. गळ्याला छोट्याने आवळल्याने गळा दाबला गेला होता. हा छोट्या बराच मोठ्या निघाला ! आणि छोट्या इरफानच्या गोळीने मेला. मग संतोषला पळताना गोळीचा आवाज ऐकून झटका आला असावा आणि त्यामुळे तो कोसळताना गुडघ्यावर पडून त्याच्या वाट्या फुटल्या असाव्यात. हे सारे अंदाज होते. पण त्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. त्या घटनेचे दोन्ही साक्षीदार मेले होते. त्यामुळे खरं काय घडल हे कळत नव्हतं. आणि तो पैंजणांचा आवाज मात्र अजूनही गूढच होता. त्याबद्दलही काही अंदाज मांडता येऊ शकत होते. छोट्या आधीपासून संतोषवर नजर ठेऊन असावा. त्याचाच भास संतोषच्या मित्राला आणि शेठच्या मजुरांना झाला असावा. त्यावेळी त्याच्याकडे घुंगरू असणार किचन वा तत्सम वस्तू असावी. पण नक्की नाही. सारे फक्त अंदाज.

ह्या तस्करी, गुंड आणि त्या रात्रीची झटापट यात बिचाऱ्या संतोषचा हकनाक बळी गेला होता.
यात चूक कुणाची ?

अस्लमभाईच्या गुंडांची ?

का शहरात शांतता व सुव्यवस्था नांदवण्याचे कर्तव्य न पाळणाऱ्या "कर्तव्यदक्ष" पोलिसांची ?

का शिकायच्या वयात दारू-पार्ट्या आणि तस्करीची कामे करणाऱ्या संतोषची ?

का तस्करी करणाऱ्या आणि तस्करीसारख्या धोक्याच्या कामाला पाठवणाऱ्या सिंगार शेठची ?

चूक कुणाची ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवट असेल कथेला तर नक्कीच लिहा क्रमशः..

जर असाच शेवट करायचा असेल तर ठीक आहे मग.. Happy

अर्धवट कथा कधी ना कधी पूर्ण करालच ना? Wink

चिमुरी : आता क्रमशः कसे लिहिणार ? धाग्याचे नाव अंतिम भाग असं दिलंय ना Sad

आता जर याच्या पुढे काही सुचलं तर याचा सिक्वेल लिहेन ज्याच नाव असेल "घोडचूक" Wink

काय हे..संपली कथा? म्हणजे फाइल अशीच क्लोज केली...सावळे न काही पराक्रम केलाच नाही..चॉकलेटं खाल्ली नुसती..
अजुन लिहिता आल असत ना? Sad
पण हे सुद्धा छान ...

चौथा आणि पाचवा भाग एकदम वाचुन काढला.
मला नावावरना वाटले की शेवटी एकदम कोणाला तरी त्याची चुक समजणार आणि रहस्य उलगडणार
पण हा डॉक्युमेन्टरी स्टाइल शेवट एकदम अनपेक्षित होता.

यःकश्चित | 5 September, 2013 - 02:38 नवीन
( आधीच माझ नाव "अर्धवट कथा लिहिणारा" असं झालाय )

>>>
नाही हो मला वाटते तुम्ही प्लॉट एकदम सुरेख बनवतात, आणि मनात शेवट पण छान असतो पण प्लॉट जेवढा सुरेख बनतो तेवढा शेवट परिणामकारक रीत्या उतरवताना कठीण जाते, पण खरोखर आता सुधारणा आहे.

सर्वांना धन्यवाद...

शोनू-कुकू : बरोबर आहे तुमच...पण मला पुढे काही सुचलं नाही...जर बळेच लिहिलं असतं तर CID सारखा तोचतोचपणा वाटला असता. असं मला वाटत...म्हणून प्रायोगिक चित्रपटान्सारखा शेवट केला...

नीलिमा : तुमच्या प्रतिसादाची शेवटची ओळ अगदी मान्य....मला भारी शेवट करायला निट जमत नाही...पण सुधारणा करेन....

एका दमात अख्खी कथा वाचून काढली.
पहिले ४ भाग उत्कंठावर्धक आहेत. पण शेवट नाही भावला इतका Sad

सर्वांना धन्यवाद...

@दक्षिणा@:
पहिले ४ भाग उत्कंठावर्धक आहेत. पण शेवट नाही भावला इतका अरेरे>>>

मलाही Happy

सावळे न काही पराक्रम केलाच नाही..चॉकलेटं खाल्ली नुसती.
पहिले ४ भाग उत्कंठावर्धक आहेत. पण शेवट नाही भावला इतका