Submitted by भानुप्रिया on 19 August, 2013 - 01:09
मला फ्लॉवर प्रचंड आवडतो, पण एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळाही तितकाच येतो! डब्ब्यात कोरडी भाजीच बरी पडते, आणि कोरड्या भाजीची माझी मजल फक्त किंचित कांदा घालून परतून केलेल्या भाजीपर्यंतच मर्यादित आहे!
रस्सा भाजीसाठी तसे २-३ ऑप्शन्स आहेत, पण ते ही नेहमीचे झाल्याने कधीकधी एकसुरी वाटतात.
इथे पाककलेतली दिग्गज लोकं आहेत आणि पा.कृ शेअर करण्यातही दिलदार आहेत सगळे!
या नव गृहिणीला थोडं ट्रेनिंग हवं आहे, तेवढं द्यायचं बघा!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही फ्लॉवर, बटाटा कान्दा
आम्ही फ्लॉवर, बटाटा कान्दा बारीक चिरतो. शिवाय बारिक चिरलेला आलं आणि हिरवी मिरचिं, कोथिंबिर
घ्यायचि. तेल तापल्यावर जिरं, मोहोरी, हिन्ग, हळद , थोडी मिरचि, आलं घालयच मग कान्दा घालुन परतायच.
मग त्यात बटाटा, फ्लॉवर घालायचा. वाफेवर शिजवायच. एकदम गिच्चा नाहि शिजवायच. मग चवि पुरत मीठ, उरलेली मिरचि आलं कोथिंबिर घालय्चि. झाली भाजी...
योगेश कुळकर्णी IE मध्ये पान
योगेश कुळकर्णी IE मध्ये पान उघडा म्हणजे दिसेल.
इंद्रधनू : मॅकवर ईंटरनेट
इंद्रधनू : मॅकवर ईंटरनेट एक्सलोरर नाही चालत
नॉनव्हेज खाणार्यांसाठी -
नॉनव्हेज खाणार्यांसाठी - छोट्या किंवा मध्यम आकाराच्या प्रॉन्ससहित फ्लॉवरची ग्रेव्ही टाईप भाजी छान लागते. जोडीला मटार/ फ्रोझन पीजही घालता येतात. मसाल्यासाठी : नारळ+ धने+जीरे+आले+लसूण्+काळी मिरी+कोथिंबीर्(ऑप्शनल)+थोडा कांदा + हिरव्या किंवा लाल मिरच्या हे सगळे एकत्र वाटून घालणे. उकळी आल्यावर २-३ आमसुले किंवा थोडा चिंचेचा कोळ घालणे. दोन्ही नसल्यास लिंबाचा रस १ चमचाही चालेल. दाटसर ग्रेव्ही करावी. छान लागते.
प्रिया
काही जणांना फ्लॉवर आवडत नाही
काही जणांना फ्लॉवर आवडत नाही अशा वेळेला
१. पुर्ण फ्लॉवर आधी स्वच्छ धुवुन घेउन किसणी वर किसुन घ्यायचा.
२. मग तेलात नेहेमीप्रमाणे तेल, कांदा, राई, जिरं , लसुण्, थोडं आलं याची फोडणी करुन घ्यायची.
३. मग त्यात किसलेला फ्लॉवर , हळद , हिंग ( हवे असल्यास मटार + बटाटा ) टाकुन परतुन घ्यायचं.
४. आता त्यात मसाला , गरम मसाला आणि टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो बारिक चिरुन टाकुन मस्त तेल सुटे
पर्यंत परतुन घ्ययचं..
५. तेल सुटलं म्हणजे टोमॅटो शिजला की थोडा पाण्याचा शिपका मारुन वर झाकण ठेउन भाजी शिजवायची.
६. भाजी शिजली की मीठ आणि थोडा गुळ टाकुन व्यवस्थित मिक्स करुन गॅस बंद करायचा...
७. कोथिंबीर भुरभुरवुन वाढावे
(पाणी थोडं कमी वापरायचं..शक्यतो वाफेवर भाजी शिजली की मस्त होते)
( हळद भाजी बरोबर टाकली की करपत नाही.....हिंग फोडणीत न टाकता भाजीसोबत टाकला की त्याचा वास मस्त लागतो )
फ्लॉवर बटाटा एकदम साधी सोपी
फ्लॉवर बटाटा एकदम साधी सोपी भाजी....रोजच्या साठी परफेक्ट वाटलेली रेसीपी खाली मन्जुळाज किचनच्या लिन्कवर आहे......
मुगाची डाळ वेगळी शिजवून
मुगाची डाळ वेगळी शिजवून घ्यावी. थोड्या तुपात तमालपत्र तळून घ्यावे आणि बाजूला काढावे. त्यानंतर त्यात कांदा परतून घ्यावा. थोडासा शिजलेला फ्लोवर, गाजर टाकावे शिजलेली मुगाची डाळ टाकावी. वरून टोमॅटो, गरम मसाला, मीठ, तमालपत्र, तिखट घालावे. मस्त लागते.
फ्लॉवर चे बर्यापेकी तुरे
फ्लॉवर चे बर्यापेकी तुरे काढुन ते तेलात क्रीस्पी तळुन घ्यावेत...
आता कांदा + टोमॅटो + लसुण + आलं पेस्ट करुन घ्यावी.
कढईत तेल तापवुन त्यात तेजपत्ता , लवंग , दालचीनी , जीरे , हिंग फोडणी द्यावी.
त्यात वरील कांदा टोमॅटो पेस्ट टाकुन तेल सुटे पर्यन्त फ्राय करावे.
तेल कडेनी सुटु लागले म्हणजेच ती पेस्ट मस्त फ्राय झाली.
आता त्यात हळद , मसाला ( गरम मसाला नकोच ) , मिठ , थोडी चवीला साखर टाकुन मिक्स करावे.
त्यात तळलेले फ्लॉवर तुरे मिक्स करावेत
झाकण ठेवुन एक वाफ येउ द्यावी
लिंबु रस पिळुन कोथिंबीर भुरभुरावी...
चपाती , पुरी , फुलके या बरोबर मस्त....
अजुन एक पद्धतः साजुक तुपात
अजुन एक पद्धतः
साजुक तुपात लाल मिर्ची व लसुण पाकल्यान्ची फोडणी करावी. फ्लॉवरचे तुरे त्यावर घालुन परतावेत. निम्मे कच्चे शिजत आल्यावर त्यावर थोडिशि कसुरी मेथी घालुन पुर्ण शिजु द्यावे. ही भाजी थोडी खरपुस शिजवली तर छान् लागते.
चपाती किम्वा फुल्क्याबरोबर खावि. भाजी सुकीच होते.
हा माझा मराठी लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा काहि चुका असल्यास क्षमस्व.
जळ्गाव येथे लहान् असताना
जळ्गाव येथे लहान् असताना आजारी पडल्यावर पपान कुथुन तरी भाजी आण्लेली तशी चव मला अजुन तरी साप्ड्लेली नाही पातळ होती लव्न्ग आल् काय होत कुणास माहीत
तीन पोळ्या खालेल्या.
इब्लिस 'ताकातला रस्सा' कसा
इब्लिस 'ताकातला रस्सा' कसा करायचा?
कांद्यावर फ्लॉवर , टोमॅटो
कांद्यावर फ्लॉवर , टोमॅटो परतून घ्याय्चा, आलं -लसूण घालून हळद मिठ, ही.मि. धणे पावडर आणि गरम मसाला घालावा मग फ्लॉवर शिजला की वरून भाजलेले खोबरे आणि कोथिंबीरचे वाटण घालावे.
मस्त लागतो असा फ्लॉवर.. यात मिक्स भाज्याही घालू शकतो.
Pages