धरसोड वृत्ती कशी कमी करावी?

Submitted by पियू on 1 September, 2013 - 10:29

प्रिय माबोकरांनो..

मला माझी स्वतःची धरसोड वृत्ती कमी करायची आहे.मी अशी आहे हि काही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही.. पण आजकाल माझ्या धरसोडपणाचे प्रमाण वाढत चालले आहे.

कुठलीही हातात घेतलेली गोष्ट तडीस न्यायच्या आत माझा उत्साह मावळतो.. Sad

विशेष म्हणजे ज्या कामातुन पैसा मिळतो अश्या कामांच्या बाबतीत असे मुळीच होत नाही..
प्रॅक्टिस.. ट्रेडमार्क.. कॉपीराईट.. ओरिफ्लेम ह्यातल्या एकाही बाबतीत अशी चालढकल किंवा धरसोड होत नाही..

पण हेच सोसायटीतला नाच.. एखाद्या नाटकात काम.. प्राणी पाळणे, त्याला वेळेवर खाऊ घालणे इ. कामांमध्ये खुप होउ लागले आहे..
मला नाटकात काम करायला.. नाचायला तर आवडते.. पण कामातुन वेळ काढुन त्याच्या रीहर्सल्स ना जाणे जमत नाही.

नवर्‍याला दिलेला शब्द मोडलेला अजिब्बात आवडत नाही त्यामुळे रोज त्याचा ओरडा खाते पण..

तर हे मी कसे कमी करु? काही टिप्स द्याल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईब्लीस मोड ऑनः
आपल्याल्या झेपतील एवढ्याच गोश्टी कराव्यात ना मग! माबोवर टीपी कमी करावा... :p
ईब्लीस मोड ऑफ...

ईब्लीसभाय आपको Light 1

एकावेळेस एकच काम जर घेतलं, ठरवलं अन केलं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम दूर होऊ शकेल.
एक काम पूर्ण झालं की मगच दुसर्याला हात लावायचा. पण यात कामं प्रायोरिटाईज करावे लागतील... Happy

शुभेच्छा!

आयडिया
धरुच नका म्हणजे सोडायचा प्रश्न उद्भवणार नाही. कोणी स्तुती केली तरी ते काम हातात घेउ नका.

एकावेळेस एकच काम जर घेतलं, ठरवलं अन केलं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम दूर होऊ शकेल.

>> कदाचित.. पण कोणतेही काम (पैसे न देणारे) हातात घेतले तरी पैसे देणारे काम हातात असतेच कायम.

कुत्रे पाळू नका. अश्या वृत्तीने त्यांच्यावर अन्याय होतो. महत्त्वाच्या प्रॉजेक्टचे ओनर शिप/ जबाबदारी घ्यायला शिका. ओव्हर कमिट करू नका स्टेप बाय स्टेप अ‍ॅप्रोच ने काम करा. फार काळजी करू नका.
थोडे वय झाले की आपो आप हे कमी होते . खरी जबाबदारी अंगावर प डली की गिरपड के काम करतोच आपण. अभी तो आपके खेलने के दिन है. मजा करा हो.

तुम्हाला यात वाईट वाटते याचे कारण तुमच्या धरसोडपणामुळे लोकांच्या कामावर परिणाम होतो, जसे नाटक करणारे लोक - तुम्ही मधेच सोडून दिले तर त्यांची किती गैरसोय? तसे नसते तर त्यात काही वाटले नसते नि त्यात काही वाईट नाहीहि.

तुम्ही एका वेळी अनेक कामे करू पहाल, तर तुम्हाला ते जमेलहि, पण त्यामुळे जर कुणाची काही गैरसोय झाली तर त्याचे तुम्हाला वाईट वाटणे साहाजिक आहे.

धरुच नका म्हणजे सोडायचा प्रश्न उद्भवणार नाही. कोणी स्तुती केली तरी ते काम हातात घेउ नका.
हे जमणे नाही!! तुमची वृत्ति परोपकारी - तुम्ही काही म्हणण्याआधीच लोक तुम्हाला काम हाती घ्यायची विनंति करणार नि तुम्ही नाही म्हणू शकत नाही.

कठीण, कठीण आहे समाजात रहाणे!

मलाहि हाच दुर्गुण होता/आहे. अगदी पैसे देणार्‍या कामाच्याबाबतीतहि. पण अमेरिका झिंदाबाद! काही केले तरी नि कधी कधी काही नाही केले तरी पैकाच पैका इकडे!

आता काम करण्यावर पैसे मिळणे अवलंबून नाही. त्यामुळे मला त्रास नाही.

मुळात वृत्ती अशी की आपण काही ना काही केलेच पाहिजे. स्वस्थ बसून टीव्ही बघावा तर त्याचाहि कंटाळा. मायबोलीवर सतत लिहीत असे. लोकांनी शिव्या दिल्या, लिहू नका म्हंटले तरी. आता मलाच कंटाळा आला.

घराभोवती नि घरात करायला भरपूर काम आहे, पण ते करण्याचाहि लवकरच कंटाळा येतो.

मध्यंतरी एकामागून एक पुस्तके वाचायचा सपाटा लावला. त्याचाहि कंटाळा आला

. आता नुकताच ब्रिज क्लब मधे जाऊ लागलो आहे.

पण मा़झे बरे आहे. माझ्यावर कुणीहि कशासाठीहि अवलंबून नाही. कंटाळा आला म्हणून काही करणे सोडले तरी कुणाला त्याचे काही नाही. उलट मायबोलीवरले म्हणतील पीडा टळली.
आता अजूनहि वरचीच कामे, पण अधून मधून.

लोकांशी संपर्क आता इ-मेल ने.

एकूण स्वतःचे मनोरंजन स्वतःच करायचे उद्योग. मग मनःशांति!

असेल. पण म्हणून काय? कुणितरी आरंभ तरी केलाच पाहिजे ना! नुसतेच बाजूला बसून गंमत बघणार्‍यांना किंवा कुजकट टीका करणार्‍यांना कोण विचारतो?

काही वेळा आपण आपले काम इतके मोठे असते/दिसते की त्यामुळेच ते करावेसे वाटत नाही. काही वेळा हा मोठा प्रकल्प छोट्या उद्दिष्टांमधे विभागला तर ते काम इतके अगदी अंगावर येत नाही आणि छोट्या छोट्या पायर्‍यांमधे का होईना पण प्रगती होते आहे ह्या विचारांमुळे कामाला बळ मिळते.

समजा घराला रंग लावणे असा प्रकल्प असेल तर रंग निवडणे, खोल्या निवडणे, रंग, ब्रश वगैरे सामग्री आणणे, अमुक एक खोली रंगवणे, मग तमुक खोली असे त्याचे छोटे टप्पे केले तर ते साध्य करणे सोपे जाते.

काही वेळा आशावादी दृष्टीकोन बाळगणे उपयोगाचे ठरते. एखादे मोठे काम १० टक्के झाले आहे समजा तर त्या झालेल्या कामाकडे बघणे, उरलेल्या ९० टक्क्यांकडे बघून निराश न होणे कामाला गती देते नाहीतर माणूस हातपाय गाळून बसू शकेल.

खरे तर मनापासून जी गोष्ट आवडते त्याचा कंटाळा आला नाही पाहिजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाचणे तुम्हाला आवडते पण प्रक्टिस ला जायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ऑफिस च्या कामामुळे किंवा इतर गोष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक जास्त थकत आहात का ते बघा. मला पण हाच प्रोल्बेम आहे मी सध्या कंटाळा आला तरी तशीच क्लासला जाते तिथे गेल्यावर कंटाळा पळून जातो.

मला नाटकात काम करायला.. नाचायला तर आवडते.. पण कामातुन वेळ काढुन त्याच्या रीहर्सल्स ना जाणे जमत नाही.>>>>>>>>> जी गोष्ट मनापासून जी गोष्ट आवडते त्याचा कंटाळा येत नाही .पण तुम्ही लिहिल्या प्रमाणे ज्या कामातुन पैसा मिळतो अश्या कामांच्या बाबतीत असे मुळीच होत नाही.. कदाचित त्याला पहिले प्राधान्य दिले जात असल्याने इतर आपसूक बाजूला रहातात.पण मग प्राणी विशेषतः कुत्रे अजिबात पाळू नका!

ज्यासाठी सवड काढु शकत नाही ते काम आता आपल्या आवडीचे राहिले नाही, किंवा इतर अनेक कामं गळ्यात आली आहेत आता. प्रायॉरिटीज बदलल्या. दोनेक वर्षांनी (काही काळानंतर) अशी वेळ आपोआप येईल की गळ्यापर्यंत नोकरी/व्यावसायिक काम आले आहे आणि त्यातला रस फारसा राहिलेला नाही तेव्हा पुन्हा नृत्य/नाट्य या गोष्टींना आपोआप महत्त्व दिले जाईल. ज्या व्यक्तीला कलेची आवड आतून असते तिला आपोआप वेळ मिळत जातो, काढला जातो. त्यासाठी इतर गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या जातात.
ती आंतरिक उर्मी असते. या सगळ्यातून एक पैसा मिळत नाही, उलट आपण पदरमोड करुन घालवतो या गोष्टींची अजिबात तमा नसते.

वर कोणीतरी म्हणले आहे तसे आधी कमिट करुन मग बॅकाऊट करुन इतरांची गैरसोय करु नका एवढेच.

मी खुपच सिरियसली सांगतोय.

ट्रेकला जा.
प्रत्येक वीकेन्डला जा.
दमछाक करणार्‍या ट्रेकलाच जा.. (कमीत कमी दिड-दोन तासाचा चाली चाली असणार्‍या)
एखाद्या ग्रुपसोबतच जा.

समोर किल्ला दिसतोय.
आणि तुम्ही चालताय.
दमुन कन्टाळुन बास म्हणता तेव्हा ग्रुप मधले लीडर्स तुम्हाला हाल्या हाल्या करत पुढे नेतीलच.

तसही अर्ध्यावाटेत, कारवीच्या जन्गलात तुम्हाला सोडुन बाकीचे पुढे गेले तर तुमचं काय होइल ह्या भितीने तुम्ही पुढे जातच रहाल..

अस सलग काही आठवडे केलं तर हातातलं काम पुर्ण झाल्याशिवाय तुम्ही गप्प बसणार नाही.. Happy
तुमच्या मनाला, मेन्दुला तसं कन्डिशनीन्ग होइल..

व्यायाम आणि फ्रेश हवा हे त्याचे चांगले साइड इफेक्ट्स होतील.

सुचवु का किल्ले???

माझा पण असाच स्वभाव आहे. स्टिक टु इटिव्ह नेस आजिबात नाही. पण मी काय करते ट्रेनिन्ग म्हणून बारके बारके प्रॉजेक्ट कंप्लिट करायचे असे करते. सकाळी पूर्ण प्लॅनिन्ग करते व सर्वात बोरिन्ग आणि आवघड काम पहिलेच करून टाकते.

मुख्य म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ नक्की ठेवा. फार कामात उलझून जाऊ नका. असे ही करता येइल काही एक गोष्टी अजून चार वर्शांनी करायच्या. काही आज करून टाकायच्या. अशी टाइम लाइन
ठरवून टाकता येइल.

नवरा आणि त्याची कामे प्रायोरिटी वर पूर्ण करून एक दिवस त्याला डन रिपोर्ट द्या. खूष होईल तो.
अर्धांग जबाबदारीने कामे करणारे असले की तो आनंद निराळाच असतो.

लेखमाला सुरू करून अर्धवट सोडणार्‍या अनेक जालीय क्रमश: लेखकांना देण्यासाठी ह्या लेखाची लिंक जपून ठेवतो आहे.

पियुपरी, साधी गोष्ट आहे की तुझ्या दॄष्टीनं पैसे हे इन्सेन्टिव्ह आहे. त्यामुळे पैसे मिळवणारे काम करताना तुला कंटाळा येत नाही हे तुझ्याही लक्षात आलं आहे. हे चांगलं आहे की! प्रत्येकाचं मोटिव्हेशन वेगळं असू शकतं आणि आपलं मोटिव्हेशन नेमकं काय आहे हे जितकं जास्त लक्षात येईल ते उत्तम.

सध्या जी कामं तडीला नेऊ शकत आहेस अशी (म्हणजे ज्यातून पैसे मिळत आहेत अशाच कामांवर फोकस कर). कदाचित काही दिवसांनी / महिन्यांनी / वर्षांनी तुझ्या प्रायोरिटीज बदलतील. त्यावेळी लष्कराच्या भाकर्‍या भाजायला तुझी मानसिक तयारी आपसूकच होईल.

पैसे मिळवण्यात काही चूक नाही, नक्की मिळव! मी पुण्याला आले की मला मस्तानी प्यायला ने मात्र.

रच्याकने, यावरून तुला यादी द्यायची आहे हे आठवलं. देते आताच थोड्या वेळात....

सुचवु का किल्ले???>>> नक्की द्या Happy

नवरा आणि त्याची कामे प्रायोरिटी वर पूर्ण करून एक दिवस त्याला डन रिपोर्ट >>> म्हणजे त्याची कामे आपण करायची ??
मग त्याने काय करावे?

मला नाटकात काम करायला.. नाचायला तर आवडते.. पण कामातुन वेळ काढुन त्याच्या रीहर्सल्स ना जाणे जमत नाही. >>>>>>

ह्याचा स्पष्ट अर्थ असा कि तुम्हाला फार काही आवड नाहीये ह्या गोष्टींची. हे आधी मान्य करा म्हणजे स्वताच्या मनाला होणारा त्रास कमी होईल.

खरी आवड असली तर सवड काढतोच माणुस.

त्याची कामे नाही ओ त्याने ह्यांना सांगितलेली कामे. ती काहीही असतील जसे लाँड्रीतून कपडे आणणे, नंदेचा वाढदिवस आहे तर तिला फोन कर बँक बॅलन्स बघून मला सांग अशी किंवा काय असतील ती. तर एक लिस्ट बनवून ती आधी करून त्याला सरप्राइज केले तर त्यांना नवर्‍याचा ओरडा खावा लागणार नाही. रिलेशनशिप जास्त स्ट्रॉन्ग होईल एव्ढेच. आपण आपली सर्व कामे करतो बुवा.

ओह

सलमान खानला विचारा. वो एक बार कमिटमेंट कर लेता है तो फिर अपनी भी नही सुनता.

जी कामे करावीशी वाटतात, पण केली जात नाहीत, अशा कामांत एक पार्टनर बरोबर घ्या. (जो तुमच्यासारखा त्या बाबतीत आरंभशूर नसेल. ज्याला नाही म्हणताना तुम्हाला थोडेफार दडपण येईल.
डाएट करणार्‍या , रोज फिरायला जाण्याचा निश्चय करणार्‍या लोकांना मोटिव्हेटेड राहण्यासाठीची ही एक टिप वाचली होती..

मीही आजमावली आहे. मी ब्रह्मविद्येच्या प्राथमिक अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले होते. सव्वीस आठवडे - दर रविवारी सकाळी वर्ग असायचे. माझ्याबरोबर मी माझ्या वडिलांना आणि शेजारच्या काकांना नाव नोंदवायला उद्युक्त केले. कंटाळा आला म्हणून इतरांना नाही कसे म्हणायचे, या दडपणामुळे आमच्या दांड्या अपरिहार्य होत्या तेवढ्याच झाल्या.वर्गातही जोडीने /ग्रुपने येणारे लोक शेवटपर्यंत टिकले. एकटे येणारे गळले किंवा त्यांनी जास्त दांड्या मारल्या. अर्थात दोन्हीला अपवाद असतातच.

सकाळी पूर्ण प्लॅनिन्ग करते व सर्वात बोरिन्ग आणि आवघड काम पहिलेच करून टाकते. >> Eat the BIG & UGLY Frog First... Eat that frog by Brian Tracy.. मला आवडला तो कन्सेप्ट!! Happy

थोडक्यात http://play.simpletruths.com/movie/eat-that-frog-v/

नवरा आणि त्याची कामे प्रायोरिटी वर पूर्ण करून एक दिवस त्याला डन रिपोर्ट द्या. खूष होईल तो.
अर्धांग जबाबदारीने कामे करणारे असले की तो आनंद निराळाच असतो.

>> अश्विनीमामी.. नवर्‍याची सगळी कामे मी प्रायोरिटीवर करते.. माझा कामाचा स्पीड बघता बरेचदा मी माझ्या वाटची कामे संपवुन त्याच्या वाटची कामे पण संपवुन टाकते.. आणि नवरा नेहमीच खुश असतो.. पण हे सगळे पैसे देणार्‍या कामाच्या बाबतीत..

त्याला माझे पैसे न देणार्‍या कामाच्या बाबतीतली चालढकल आवडत नाही. त्याची स्वतःची तशी वृत्ती नसल्याने त्याला माझे तसे करणे पटत नाही.. कारणे वर दिलेलीच.. आपल्यामुळे इतरांची गैरसोय होणे बरोबर नाही.. इतर लोकांनी तुला इर्रेग्युलर म्हटलेले मला आवडणार नाही इत्यादी..

तरी या वेळेला मी ढोल वाजवत नाहीये.. प्रॅक्टिसला जायची टाळाटाळ नको.. आणि त्यामुळे पुन्हा ओरडा नको म्हणुन ढोल हातात घेतलाच नाही.. Sad

लाँड्रीतून कपडे आणणे, नंदेचा वाढदिवस आहे तर तिला फोन कर बँक बॅलन्स बघून मला सांग..

>> ही कामे पटकन होतात हो माझ्याकडुन.. कारण ती वन टाईम असतात.. पटकन करुन मो़कळी होते मी..

मला सातत्य राखता येत नाहीये..

रोज लाँड्रीतून कपडे आणणे किंवा रोज बँक बॅलन्स चेक करणे हे जमणार/ जमत नाही मला..

कुत्रे पाळू नका.

>> कुत्री आहे एक घरात.. पण तिची जबाबदारी दिरावर आहे. त्यांनी आणलीये..

पण घरात माझ्या ६ खारी आहेत.. Sad

सर्वांचेच प्रतिसाद आवडले.. आभार..

सर्वोत्तम उत्तर म्हणुन ३-४ प्रतिसाद आवडले आहेत.. पण इथे एकच प्रतिसाद सर्वोत्तम म्हणुन तारांकित करता येत आहे.. Sad

मला रोज जमत नाही>> अहो कसे जमेल किती लहान आहात तुम्ही. त्यात इतकी व्यवधाने रोजची अस्तात. मला वाट्ते त्याम्नाही गंमत वाट्त असेल. मी पूर्वी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहीत असे.
त्यांचा फोन आला की माझी टाळाटाळ सुरू. मग नवरा असेच क्लास घ्यायचा. आणि कमिट कर आणि लिहून दे असे म्हणायचा. त्याच्या प्रोत्साहना मुळे मला एक चांगली गोष्ट हाताशी आली व नावावर जमा झाली. you must be taking it all positively. I used to hate routines but have now become a typical Mumbai kar with fixed minute to minute plan for everything. hota hai. Happy

एक सोप्पा उपाय

एखादी गोष्ट ठरविली कि साधारण १००० रुपये आपल्या घरच्याच पीगी बँकमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आणि ती गोष्ट पुर्ण होईपर्येंत ते पैसे खर्चायचे नाहीत (किमान त्या गोष्टीच समाधान होईपर्येंत तरी)

मग बघा जादू
धरल कि सोडायची इच्छा होणार नाही

त.टि: -पैसे खर्च होण्याची भिती असेल तर माझ्याकडे देऊन ठेवा पण बिनव्याजी Happy

पियु परी.. माझेही एकाचवेळी अनेक उद्योग चाललेले असतात. अगदी पुस्तकेही मी एकाचवेळी ३/४ वाचायला घेतो. आणि पेशा आणि छंद हे कटाक्षाने वेगळे ठेवलेय. यात अगदी स्विच ओफ असतोच असतो. मी रजेवर असताना कामाच्या बाबतीतली कुठलीच इमेल वा फोन मी घेत नाही. ( ती येणार नाही अशी चोख व्यवस्था केलेली असते.)

माझ्यापुरते सांगायचे तर माझ्यापुरती एक वेळेची मर्यादा घातलेली असते. उदा. कुणासाठी चित्र काढायला घेतले तर त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला त्याच्या हातात पडले पाहिजे. त्या व्यक्तीला सांगत नाही पण ही मर्यादा बरोबर उपयोगी पडते मला तरी.

दुसरे म्हणजे मी असेच काम हातात घेतो, कि ज्यातून मला आनंद मिळेल. मनाविरुद्ध कुठलेच काम हातात घेत नाही. एकाचवेळी अनेक काम हातात असली म्हणजे एकाचा कंटाळा आला कि दुसरे हातात घेता येते. पुस्तकांच्या बाबतीतही तसेच. मी बुकमार्क वापरत नाही पण कुठल्या पानावर थांबलो होतो ते बरोबर लक्षात असते.
अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असणार.

तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींसाठी वेळ द्यायला जमत नसेल तर माझ्या मते
तुम्ही रोजच्या कामाला प्रमाणापेक्षा जास्त वेळ देत आहात किंवा तुमचा उत्साह कमी झालेला असेल किंवा तु म्ही बोअर झालेला असाल, एखादी छानशी ट्रिप ट्रेकिंग या वर काम करेल अस वाटतं.

आधी कमिट करुन मग बॅकाऊट करुन इतरांची गैरसोय करु नका एवढेच. +१
आधी कबूल करून मग मागे सरून इतरांची गैरसोय करू नका हेच सर्वात जास्त महत्वाचे.

बाकीच्या बाबतीत धरसोड झाली तरी इतरांना त्रास नाही, तेंव्हा तुम्हीहि त्याबाबतीत स्वतःला त्रास करून घेऊ नका. जेंव्हा केंव्हा तुम्हाला असा उद्योग सापडेल, की तो करत रहावा, तेंव्हा तो आपसूक होईल.