यूंही कोई मिलगया था - यासीन भटकळ

Submitted by बेफ़िकीर on 30 August, 2013 - 03:52

चलते चलते!

यूंही कोई मिलगया था!

यूंही कोई मिलगया था!

===========================

यासीन भटकळ सापडला. निवांतपणे एका देशातून दुसर्‍या देशात जाताना तिसर्‍याच देशाच्या पोलिसांच्या सहाय्याने एक असा माणूस सापडला जो गेली कैक वर्षे दहशत माजवत फिरत होता.

काँग्रेस सरकारचे भाग्य फळफळले. अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीच्या निर्णयांमुळे बाळ ठाकरेंसाठी केवढा जमाव जमला होता, निर्भया प्रकरणात सरकारची किती लाज गेली होती या घटनांवर सार्वत्रिक विस्मृतींचे पडदे पडले होते. पण विरोधक गप्प बसतील तर ना? निवडणुका जवळ येऊ लागल्या तसा देश मोदीमय होऊ लागल्याचे एक चित्र उगाचच तयार होऊ लागले. वास्तविक मते ज्याला मिळणार त्यालाच मिळणार! आज भाजपकडे मोदी आहेत म्हणून काही काँग्रेसचे करोडो मतदार अचानक भाजपकडे वळतील असे नाही. पण मोदीप्रभाव नष्ट होईल आणि स्वतःलाच जोरदार शाबासकी घेता येईल अशी एक घटना घडली. टुंडा सापडला. टुंडाने रहस्यभेद करायला सुरुवात केली. ते रहस्यभेद आपल्या इंटेलिजन्सचा आत्मविश्वास द्विगुणित करत आहेत तोवरच आणखी एक मोठी घटना घडली.

यासीन भटकळ नावाचा मासा जाळ्यात अडकला. आता त्याला कोठडी मिळेल. तो मोठाल्ले गौप्यस्फोट करेल. कित्येक येऊ घातलेली संकटे आधीच कळतील. त्याचे साथीदार, तळ यांचे ठावठिकाणे कळतील. पाकिस्तानने कोणाकोणाला आश्रय दिला आहे ते पुन्हा एकदा सर्वांसमोर येईल. पुन्हा नातेसंबंध ताणले जातील. तरीही क्रिकेट मॅचेस होऊ शकतील. असाच अनेक वर्षांनी हा यासीन भटकळ फाशी दिला जाईल.

यासीन भटकळला पकडल्याबद्दल चहुबाजूंनी स्तुतीचा वर्षाव होताना दिसत आहे.

एक सामान्य माणूस म्हणून मनात दोन प्रश्न आले:

१. यासीन भटकळला इतकी वर्षे पकडणे खरंच इतके अवघड असेल का?

२. अमेरिका अनेकदा घेते तशी 'टाका उलथून विरोधकांना' ही भूमिका आपल्याला कधीच परवडणार नाही का?

जर तशी भूमिका परवडणार नसेल, जागतिक दबाव, ढासळती अर्थव्यवस्था यांच्या चिंतेने ग्रासलेलो असताना 'प्ले सेफ' हीच पॉलिसी वर्षानुवर्षे घ्यावी लागणार असेल, तर आपण एक स्वतंत्र देश म्हणून टिकण्यात तरी काय मोठी गंमत आहे यार?

या निमित्ताने, भटकळ या दहशतवादाच्या हजारो चेहर्‍यांपैकी एकाने केलेल्या कारवायांमध्ये मरण पावलेल्यांचे पुन्हा एकदा स्मरण व त्यांना श्रद्धांजली!

============

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिका अनेकदा घेते तशी 'टाका उलथून विरोधकांना' ही भूमिका आपल्याला कधीच परवडणार नाही का?
>>
आता म्यानमारदेखील भारतात घुसखोरी करायला लागलाय, तरीही आम्ही गप्पच.

असही नाही बरं का बेफिकीर. हे सगळे आत्ताच कसे सापडत आहेत, हेही प्रश्न आहेतच. मुळातच काँगीवर अविश्वास असणारे अजुनच संशय घेतील. कदाचीत विझणार्‍या दिव्याची परिस्थिती आलेली आहे... Happy

मला तर भटकळ चे सर्व फोटो वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचेच वाटते. एकाच व्यक्ती चे फोटो वाटत नाहीत.

पुष्कळ वेळेस आंतरगत असुरक्षततेपायी हे गुन्हेगार पकडून घेणे जास्त सेफ समजतात, तसे तर नसेल काही?

मला तर भटकळ चे सर्व फोटो वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचेच वाटते. एकाच व्यक्ती चे फोटो वाटत नाहीत.<<<

हे मायबोलीच्या नेमके उलटे आहे. येथे एकाच व्यक्तीचे अनेक फोटो, अनेक सदस्यनामे असतात. त्यामुळे प्रशासकांनी एकाला पकडले की बरेच त्रासदायक आय डी पकडले गेल्यासारखे वाटू लागते.

मला तर भटकळ चे सर्व फोटो वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचेच वाटते. एकाच व्यक्ती चे फोटो वाटत नाहीत>>
हे भटकळचे वेशांतरातले यशच समजावे का?

मल्तबै राज्काराणत्ल कै कळतच्नै..>> सुखी असण्यासाठी आणखी काय हवे?

भटकळ कधी इंजिनिअर आहे कधी नाही, पण वेशांतरात ही माहीर आहे हे कुठल्याच पेपर मध्ये आले नाही. नुसतेच फोटो आले.

"१. यासीन भटकळला इतकी वर्षे पकडणे खरंच इतके अवघड असेल का?"
हो. भारतात पोलिसांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सगळं किडलेलं, भ्रष्टाचाराने पोखरलेलं असताना, मिलिटरी, रॉ वगैरे स्वच्छ, इमानदार, कार्यक्षम, शूर वगैरे आहेत अशी बरीच लोक समजूत करून घेतात. वास्तविक युद्ध होत नाहिये म्हणून झाकली मुठ सव्वा लाखाची आहे. पण कधिकधी सत्य हे बाहेर येतंच. कधी ते निवृत्त अधिकारी बोलून दाखवतात तर कधिकधी स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी फुटकळ शॉर्ट-सर्कीट ने आक्खी पाणबुडी अनेक सैनिकांना घेउन कायमचंच बुडते. वास्तविक बाकिची क्षेत्रे माहितीच्या अधिकाराखाली येत असल्यामुळे थोडीतरी स्वच्छ असतील. पण गोपनियतेच्या कायद्यामुळे दरवर्षी अब्जावधी रुपयांचे घोटाळे डिआरडीओ, इस्त्रो, बेल मध्ये होत असतात आणि ते बाहेर येत नाही.

"२. अमेरिका अनेकदा घेते तशी 'टाका उलथून विरोधकांना' ही भूमिका आपल्याला कधीच परवडणार नाही का?"
हो, कधीच नाही.

मुळात पकडला गेल्यावर त्याचेकडून सर्व माहिती काढून त्याचे सर्वच्या सर्व साथीदार जेरबंद केल्यावर त्याला पकडल्याचे जाहीर करायला हवे होते.
पाठ थोपटुन घेण्याची घाई करण्याने त्याचे सर्व साथीदार निसटण्यास मदतच केली गेली नाही काय?
बेफिकिरजी ,
आपल्या प्रश्नांशी सहमत.
कॉग्रेस पक्षाने लगेच श्रेय लाटायला सुरुवात केलीच आहे. इतकी वर्षे मोकातपणे निरपराध मरू दिले आणि आता एकदम निवडणुकीची पूर्वतयारी.म्हणून हा देखावा उभा केला जातो आहे असे वाटण्यास वाव आहे.

मला एक कळत नाही, ह्यात पक्षांचा काय संबंध असतो?

अशा कारवाया आपण एक राष्ट्र म्हणून करत असू ना? इथे कुठल्या पक्षाची सत्ता आहे त्यावर पोलिस, गुप्तहेर संघटना ह्यांची कार्यक्षमता कशी काय ठरू शकते?

मुंबईत ५५ उड्डाणपुले युतीच्या कारकीर्दीत मंजूर केली गेली आणि काँग्रेसच्या कार्यकालात एक्झिक्यूशन झाले. श्रेय दोन्ही पक्षांनी घ्यायचा प्रयत्न केला....

अरे पण जनता येडीये का?

'राजकारण गेलं चुलीत'

अरे पण जनता येडीये का?<<<

अक्षरशः वेडी आहे जनता, विदिपा! बिलिव्ह इट ऑर नॉट!

मुळात जवळपास ८० % जनता ही स्वतःला एखाद्या राजकीय पक्ष्याचा सदस्य / कार्यकर्ता / नेता वगैरे मानण्यात धन्यता समजते. त्यामुळे, अश्या घटनांचे श्रेय लाटणे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो.

उरलेली वीस एक टक्के जनता ही 'आपल्याला काय करायचंय? यासीन मिळो नाहीतर टुंडा मिळो' अश्या वृत्तीची असते.

मेजॉरिटी राजकारणाशी स्वतःचा सक्रीय संबंध लावू पाहात असल्याने श्रेय लाटण्याचे प्रकार हे होणारच! Happy

जनता येडीच असते.:अरेरे::राग:

मध्यमवर्गीय आणी उच्च मध्यमवर्गीय आणी काही इतर श्रीमंत नवश्रीमंत लोक अजीबात मतदानाला जात नाहीत, मग हे राजकीय टवाळ झोपडपट्टीतल्या लोकांना पैसे, कपडे देऊन, धाक दाखवुन निवडुन येतात. आणी मग आपण बसतो भजन/किर्तन्/कव्वाली गात्.:खोखो:

वास्तविक बाकिची क्षेत्रे माहितीच्या अधिकाराखाली येत असल्यामुळे थोडीतरी स्वच्छ असतील. पण गोपनियतेच्या कायद्यामुळे दरवर्षी अब्जावधी रुपयांचे घोटाळे डिआरडीओ, इस्त्रो, बेल मध्ये होत असतात आणि ते बाहेर येत नाही.

>>>>>>>> +१११११११११११११११११११११

हल्ली गुन्हेगारांत एक "फ्याशन" येते आहे आणि पोलिसांचीही ह्या फ्याशनला काही हरकत दिसत नाही. ती म्हणजे, जेव्हा हे पकडलेले गुन्हेगार /आरोपी लोकांसमोर येतात तेव्हा एखाद्या मर्यादाशील मुस्लिम स्त्रीप्रमाणे बुरख्यात वावरतात. मग ते नृशंस बलात्कारी असोत वा हृदयशून्य अतिरेकी. असे का? ह्यांच्या थोबाडावरून बुरखे हटवून त्यांची तोंडे जगाला दिसली तर काय आकाश कोसळेल? उलट असे लोक उद्या पळून गेले तर त्यांना शोधणे सोपे जाईल.
सरकार असे का करु देते? फार तर अल्पवयीन गुन्हेगारांची ओळख गुप्त ठेवावी पण बाकीच्यांची का? बाकी नावे, गावे, चरित्र, लफडी सगळे साग्रसंगीत लोकांसमोर मांडले जात असताना ह्यांचे चेहरे गुप्त ठेवण्याचे काय कारण?

shendenaxatra | 31 August, 2013 - 21:15नवीन
.... ह्यांच्या थोबाडावरून बुरखे हटवून त्यांची तोंडे जगाला दिसली तर काय आकाश कोसळेल? उलट असे लोक उद्या पळून गेले तर त्यांना शोधणे सोपे जाईल.
बाकी नावे, गावे, चरित्र, लफडी सगळे साग्रसंगीत लोकांसमोर मांडले जात असताना ह्यांचे चेहरे गुप्त ठेवण्याचे काय कारण?

>> १००% सहमत

तो प्रोसीजरल भाग असावा. जोपर्यंत कोर्टात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत चेहरा झाकत असतील. ज्याला पकडायचे आहे त्याच्यासारख्या दिसणार्‍या पण गुन्ह्यांशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्याला पकडले, दोन दिवस टीव्ही चॅनल्स नी क्लोज अप मिरवला आणि नंतर निष्पन्न झाले की मूळ आरोपी भलताच आहे वगैरे. मधल्या काळात जन्तेने टीव्हीवर पाहिलेला चेहरा लक्षात ठेवून बाहेर त्याला बदडले, त्याला कोणी नोकरी देत नाही वगैरे असे व्हायला नको म्हणून असेल.

आरोप सिद्ध झाल्यावर मात्र काय गरज आहे ते माहीत नाही.

तुर्रमखान | 30 August, 2013 - 13:20
तर कधिकधी स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी फुटकळ शॉर्ट-सर्कीट ने आक्खी पाणबुडी अनेक सैनिकांना घेउन कायमचंच बुडते.< <

एवढी भयानक घटना जनतेने मात्र क्षुल्लक म्हणून सोडून द्यायला सरकारला मदत केली. दहा वर्षांनी कधितरी ती घटना दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचे बाहेर आल्यास नवल वाटू नये