असेच काही प्रश्न ...

Submitted by _आनंदी_ on 26 August, 2013 - 05:02

मायबोली वरिल गुलमोहर - कला, हस्तकला, इतर कला मधले धागे वाचुन बरेच प्रश्न पडतात ..
हे कुठे मिळेल ?, ते कुठे मिळेल ?, हे कस करु ? ई. अनेक अनेक ...
म्हणुन हा धागा काढत आहे .. माझे सध्याचे काही प्रश्न..
१) क्रॉस स्टीच साठी लागणारा कॅन्व्हास सहसा कुठे मिळतो ? काय म्हणुन मागायचा?
नवी मुंबईत कुठे मिळेल?
२) भरत कामासाठी लागणार्‍या दोर्‍याच्या गुंड्या (त्या जरा वेगळ्या असतात ना?) त्या कुठे मिळतिल ?
तसेच त्या साठी लागणार्‍या लकडी रिंग्ज सहसा कुठे मिळ्तात (नवी मुंबई मध्ये कुठे?)
अशा सगळ्या गोष्टी मिळणारे एखादे खास या वस्तुंसाठी असलेले दुकान कोणते?

ह्या धाग्यावर या सबंधित प्रश्न विचारयचे असतिल तर सर्वांनी विचरा .. तसेच जाणकारांनी मदत करावी ..
माहिती मिळाल्यानंतर अनवश्यक वाटल्यास अ‍ॅडमिन ने डिलिट केला तरी चालेल..
धन्यवाद..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?????

वाशीच्या इन ऑर्बिट मॉलमध्ये हॉबी आयडीयाजचं दुकान आहे. तिथे असू शकेल हे साहित्य.

आमच्याकडे मुलुंड वेस्टला वंदना नॉव्हेल्टी म्हणून एक दुकान आहे. तिथे असल्या सर्व वस्तू/साहित्य मिळतं.

आत्ताच वाचले <<< Cross-stitch is typically executed on easily countable even-weave fabric known as aida cloth. << हे क्लोथ कुठे मिळेल ? नवी मुंबई मध्ये? काय म्हणुन मागतात ऐदा क्लॉथ म्हणुन्च का?

आनंदी, नव्या मुंबईत मिळणे कठिण आहे, मी ब-याच ठिकाणी शोधलेय.

वर लिहिल्याप्रमाणे से. ९ मध्ये असेल. मी गेले नाही तिथे कधी. आता जाऊन बघेन. क्रोसस्टिचसाठी कपडा म्हणुन मागायचे दुकानात. ऐदा म्हणुन मागितले तर कदचित कळणार नाही.

भरतकामाचे दोरे नव्या मुंबईत नेरुळमध्ये एक दुकानदार ठेवायचा, ते दुकान आता बंद झाले. अँकर कंपनीचे दोरे असतात ते, काही स्टेशनरीवालेही ठेवतात.

दादरला छबिलदास गल्लीत मात्र सगळे मिळेल. समोरासमोर दुकाने आहेत. दुकान बाहेरुन पाहिले की तुझ्या लक्षात येईल हेच ते. Happy

इमिटेशन ज्वेलेरी साठी लागणार्या मटेरियल चे दुकाने नाही सापडले बोहोरी आळीत...रामसुख मार्केट मध्ये भरत कुमार चे दुकान आहे असे कळले पण तिथे सगळे मटेरियल रिटेल रेट ने मिळते...कदाचित पुण्यात नाही मिळत..मुंबइत भुलेश्वर /महालक्ष्मी इथे मिळते पण नक्की नाही माहित..कुणाला कल्पना असेल सांगा...