मनाचं मेनडोर ….

Submitted by मी मी on 21 August, 2013 - 09:30

अर्धच दार उघडं
मनाचं मेनडोर ….
आणि आपण बसतो त्या पुढेच पहारा देत
येणाऱ्या जाणार्यांसाठी … विचार करत
कुणीतरी मनाच्या या दारातून आत येइल
कायमचा इथला भाग होईल… कदाचित !!

नाहीच … तर निदान डोकावेल तरी
बघून हसेल अन निदान
आज पुरता तरी दिवस बहरेल !!

घरातल्या खिडक्यांकडे मात्र लक्षही नसतं आपलं
त्या खिडकीत कधी चिमण्या येतात कधी सावरी
कधी मंद फुलांचा गंध
कधी कधी पावसाची सर, वार्याचा झोत…

पण … येतात अन निघून जातात
आपल्या बघण्याची वाट बघून…

कधीतरी त्या कवडस्याकडे तरी पाहिलंय का ?
कुठल्याश्या फटीतून आत शिरतो न विचारता न सांगता
जमिनीवर वाकून पायापर्यंत पसरत
मुठीत येत नाही पण तळव्यावर थबकतो !
हवा तितकाच … स्पर्शून घेता येतो !!

कधीतरी त्या मेनडोर समोरून दूर व्हावं
खिडकीतून बाहेर झाकावं
पावसाच्या सरित भिजून कवडसा झेलावा
अन निर्माण करावं एक नवं इंद्रधनू
त्यातल्या रंगाने उजळून टाकावे कोपरे न कोपरे
गंध सारा, मंद वारा ओढून घ्यावेत तनात मनात
आणि बहरून टाकावा आतला गुलमोहर…
हवा तितका … हवा तसा !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thnx di Happy