>पोच्ड एग्ज साठी
६ अंडी
१ चमचा व्हिनेगर
>क्रॅब केक साठी
१/२ पाउन्ड ताजे क्रॅब मीट
१/२ लिंबू
१ चहाचा चमचा तिखट
२ कांदेपात बारिक चिरून
१/४ कप लाल सिमला मिरची बारिक चिरून
१-२ लसूण पाकळ्या
२ चमचे मेयोनीज
१ अंडे फेटून
व्हिट क्रॅकर्स
१ चमचा Worcestershire sauce ( ऐच्छिक)
> हॉलंडाइज सॉस साठी
२ अंड्यातील पिवळे
१ कप बटर
> इंग्लिश मफिन्स किंवा ब्रेड भाजून
नावे मोठी मोठी असली तरी पाककृती सोपी आहे.
अगोदर क्रॅब केक ची तयारी करा. थोडे व्हिट क्रॅकर्स मिक्सर मधून बारिक काढून घ्या. .साधारण १/२ कप क्रॅकर्स ची पूड घाला. क्रॅकर्स ची चव बघून मिश्रणात मीठ किती लागेल ते ठरवा. किंचितच लागेल. आता वरील क्रॅब केक चे सर्व जिन्नस एकत्र करा. फ्रि़ज मध्ये १/२ तास ठेवा. नंतर मिश्रणाचे साधारण ६ बर्गर थापा.फार नाजूक आकार नको. हे क्रॅकर्स पूड मध्ये घोळवा. साधारण १/२ वाटी तेल एका पॅन मध्ये घेउन मंद आचेवर ३-४ मिनीटे प्रत्येक बा़जू वर तळा. नंतर टिश्यू पेपर वर काढा
पोच्ड एग्जः
एका पसरट पॅन मध्ये पाणी उकळायला घ्या. १ उकळी आली की आच मंद करा. पाण्यात १ चमचा व्हिनेगर व किंचित मीठ घाला. आता एक अंडे वाटीत फोडा व हळूच पाण्यात सोडा. असे सर्व ६ अंड्यांसाठी करा. साधारण ३ मिनिटे पाण्यात ठेवा. नंतर टिश्यू पेपर वर काढा.
हॉलंडाइज सॉस:
१ बाउल व १ भांडे असे लागतील जे एकावर एक बसतात. भांड्यात थोडेसे पाणी उकळत ठेवा.
बाउल मध्ये २ अंड्यातील पिवळे फेसा. किंचित लिंबू पिळा. चिमूट भर मीठ व साखर ही घाला. आता हा बाउल पाण्याच्या भांड्यावर ठेवा. बाउल ला पाण्याचा स्पर्श होता कामा नये. आता सतत ढवळत रहा व हळू हळू बटर सोडा. ५ मिनिटात सॉस तयार !
एग्ज बेनेडिक्ट म्हणजे.... इंग्लिश मफिन वर क्रॅब केक वर पोच्ड एग वर हॉलंडाइज सॉस असे रचून खाणे. ( हो ... नाहितर लोकांना प्रश्न पडेल की लिहिले आहे एग्ज बेनेडिक्ट आणि आता हे पोच्ड एग काय ! )
बरोबर पोटॅटो वेजेस व सलाड द्या.
नुकताच हा पदार्थ एका रेस्टॉरंट मध्ये खाल्ला. मला अतिशय आवड्ला म्हणून करून बघितला. हे सगळे पदार्थ एकत्र खूप छान लागतात. पांरपारिक बेनेडिक्ट मध्ये क्रॅब केक एवजी बेकन वापरतात. हा अतिशय पोट भरीचा प्रकार आहे. हॉलंडाइज सॉस साठी भरपूर बटर लागते. याचे जरा लो कॅलरी स्वरूप शोधायला हवे. क्रॅब केक हे फार नाजूक असतात ते काळजीपूर्वक तळावेत. फारसे काहीच अवघड नाही. या विकांताला करून बघा.
फोटो कसा टाकू?
फोटो कसा टाकू?
इथं वाचा -
इथं वाचा - http://www.maayboli.com/node/27484
पाककृतीसाठी फोटो कसा टाकावा ?
पाककृतीसाठी फोटो कसा टाकावा ? ते इथे पहा
डॅफो, मी पैली.
डॅफो, मी पैली.
(No subject)
धन्स मंडळी ... जमलं एकदाचं !
धन्स मंडळी ... जमलं एकदाचं !
छान रेसिपी अंडे पाण्यात न
छान रेसिपी
अंडे पाण्यात न फुटता पोच होण्यासाठी फुडग्रेड प्लॅस्टिक रॅप मधे एक एक अंडे फोडायचे आणि रॅप ला गाठ मारायची व मग पाण्यात सोडायचे. किंवा मग एग पोचर वापरायचा .
छान टिप आहे लाजो. पुढच्या
छान टिप आहे लाजो. पुढच्या वेळी करून बघेन.
मस्त आहे रेसिपी. टेसला एग्ज
मस्त आहे रेसिपी. टेसला एग्ज बेनेडिक्ट आवडतं.
मस्त!
मस्त!
सिंपली वॉव
सिंपली वॉव
वाँव
वाँव
मस्त पाककृती. बाकी तो उच्चार
मस्त पाककृती.
बाकी तो उच्चार ओलोन्देज असा आहे.
Chinooks, Tu parles
Chinooks,
Tu parles française?
oui.
oui.