घरातील डास मारण्यासाठी/हुसकण्यासाठी सगळ्यात चांगला, सोपा व प्रभावी उपाय काय?

Submitted by सुयोग on 10 August, 2013 - 12:44

सध्या डास खुप वाढले आहेत, त्यासाठी खालील उपाय केले पण डास काही जात नाहीत.

१. mosquito racket - काही दिवसातच खराब होते, सारखी चार्ज करावी लागते
२. ओडोमोस, लिक्वीड, कासव छाप, स्प्रे - शरिराला अपायकरक
३. मछरदाणी - मर्यादीत वापर, लावायची कटकट
४. धुर, धुप - प्रभावी नाही
५. पाणी साचु न देणे - ह्यावर पुर्ण ताबा नाही, घराबाहेरुन डास येतात
६. गप्पी मासे पाळणे - शक्य नाही

ह्यावर तुम्ही काय उपाय करीत आहात?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके... सध्या एक मस्त प्रयोग सुरु आहे. लेमनग्रास ऑइलचे काही थेंब पणतीमध्ये टाकले तर डास बर्‍याच प्रमाणात कमी होतात. आता मी एक जुन्या काळात मिळत असे असा 'मॅट' हिटर शोधत आहे. पण्तीमध्ये लेमनग्रास ऑइल थोड्या वेळाने पेट घेते आणि लगेच् सगळे जळुन जाते. लिक्विड रिपेलंट मध्ये भरल्यानंतर तो रॉड त्याम्ध्ये गळोन पडतो. २ -४ दिवसात रिस्ल्ट अपडेट करतो. पण डासांच्या प्रमाणात प्रचंड कमी होते. तसे पण आजुबाजुला झाडे खुप असल्यामुळे डास होते पण खुपसारे. मॅट हिटर मिळाला कि मग एखादी जुनी मॅट त्यामध्ये ठेवुन काही थेंब टाकले तर कंट्रोल्ड रीलिज होउन अजुन चांगले रिज्ल्ट्स मिळतील असे वाटते.
ज्यांना गवतीचहाचा वास आवडत नाही त्यांच्या साठी हा उपाय बाद.

ट्रेकर्स साठी हे तेल अंगाला लावले तरी सुधा चालते. Happy

आपण जर फ्लॅट मध्ये राहत असाल तर हॉलमध्ये झोपायचे सोंग करा डास हॉलमध्ये येतील मग बेडमध्ये गपचूप जाउन झोपून जा दार खिडक्या बंद करुन ..........................

डासांचा पोपट होईल मग त्यांना पिंज-यात बंद करा म्हणजे तुमचे मनोरंजन पण होईल , त्याआधी पोपटाला खायला डाळींब आणि पेरु घ्यायला विसरु नका

मग एक कॅसेट ,सीडी आणून गाण ऐका - जसा नविन पोपट हा हा हा हा Rofl

विजय,
वरचा भाग उलटा म्हणजे त्या मगसारख्या भागात बाटलीचे तोंड जाईल असा. सी ओ टू हवेपेक्षा जड असल्याने त्यात साठून राहतो. मला वाटत; त्याला बाहेरून काळी पट्टी पण लावायची आहे. डास त्या वरच्या भागात जमा होतात, असे निरिक्षण तिथे नोंदवलेय.

डासांच्या रॅकेट वरून आठवलं. पुण्याच्या एका हॉटेलमध्ये बहुतेक सदानंद नाव होतं तिथे प्रत्येक टेबलावर मीठ-मिरपूड, पाण्याचे ग्लास ठेवून त्याच्या बरोबरीने एक एक असले रॅकेट ठेवले होते. आम्ही ८-१० जण होतो म्हणून आम्हाला २ रॅकेट्स मिळाली. Happy जेवताना माशा आणि डास मारण्यासाठी दिली होती ती रॅकेट्स. Uhoh
आणि खरंच तिथे प्रचंड माशा, बारीक चिलटं, इ. प्रकार होते. Sad लेकीने जेवण न करता त्या रॅकेट्स नी माशांची आनंदाने पुरेपूर धुलाई केली.

एक अवघ्ड उपाय आहे. पुढिल निवडणुकात डास निर्माण होउ नयेत असा एकमेव अजेंडा असलेले स्थानिक स्वराज्य सरकार निवडुन आणा.

Pratinidhik swarupat ek daas pakada ani tyala kathor shabdat samaj dya va tyacha va tyachya itar sathidaranchyaa krutyacha nishedh nondava .jase sadhya macharasarkhe paki sainik apalya kade yeun upadrav kartat va apale hatbal sarkar nishedh nondavate tase

खरं तर डासांसाठी मच्छरदाणीइतका दीर्घ आणि स्वस्त उपाय दुसरा नसेल.
मॉस्क्युटो रिपलंट/ मॅटचा उपयोग होत नसेल तेव्हा, रात्री घरात छोटा रॉकेलचा दिवा/ चिमणी लावुन ठेवावी. रॉकेलच्या वासाने डास बरेचसे कमी होतात. स्वानुभव आहे. आणि अशा मंद दिव्यावर (अगदी वापरलेली सुद्धा) मॉस्क्युटो मॅट ठेवली की फायदा होतोच होतो.
वापरलेल्या मॅट्स घराच्या बाहेर, खिडक्यांच्या बाहेर, तसेच कुंड्यांमधे खोचुन ठेवा. डास तर होत नाहीतच पण इतर कृमी/ किटक, चिलटे सुद्धा होत नाहीत.
घरात चिलटे/ माशांचा त्रास होत असेल तर गरम तव्यावर कापुर टाकावा, किंवा लवंग टाकुन जरा धुर करावा. तेवढ्या एरियापुरते चिलटे कमी होतात.

खरं तर दिवेलागणीला धुपारती करण्याचा हाच उद्देश असतो. मी गौचंदन धुप लावुन त्यावर कापराची वडी ठेवते. मंदपणे कापराचा सुगंधही पसरतो आणि डास कमी होतात.

दोन महिन्यापुर्वी पवनेतील पाणवनस्पतींमुळे सांगवीमधे डासांचा आणि पर्यायाने डासांच्या रॅकेटचा इतका सुळसुळाट झाला होता की रस्त्यावर जागोजागी १५० रु. त(चायना मेड) रॅकेट्स घेउन विक्रीस बसलेले लोक दिसाय्चे. त्यांची चंगळ झाली. आणि इकडे या रॅकेट्स एकदा वापरल्या बंद पडायच्या त्यामुळे लोक त्रासलेले. Sad

eka vatit pani gheun tyat kaprachi vadi thevavi..das lagech jatat...n no side effects....

मच्छरदाणीत झोप येत नाही, हवाच लागत नाही, आम्ही ऑलाऊटच लावतो सध्याकाळी दारे खिडक्या थोडावेळ बंद करतो.
आयोडेक्स (कदाचित त्यात रॉकेल असेल) अंगाला लावलेतरी डास चावत नाही. मी उन्हाळ्यात बाहेर झोपताना लावुन झोपत होतो.

अरे मी छोटा टेबल फॅन म्हणालो...................तुम्ही तर डायरेक्ट सिलिंग फॅनच लावायला निघालात Biggrin

टेबलफॅन बसवला तरी छोटी फट रहाणारच ना.:फिदी: एक जरी आत आला तरी रात्रभर आरत्या म्हणाव्या लागतात्.:खोखो: बादवे मच्छरदाणीला सिलिंग फॅन बसवला तर तिचे हेलिकॉप्टर होईल की.:हहगलो:

टेबलफॅन बसवला तरी छोटी फट रहाणारच ना. >>>> कशी राहणार स्विच सुध्दा मच्छर दानीत घ्यायचे .. Wink आणि
भोक पाडुन वायर त्यातुन बाहेर घ्याय्ची नंतर टेप ने ते वायर आणि भोक बंद करायचे ....

आयडीया मस्तय. दोर्‍या नसलेल्या मच्छरदाण्या बघाव्या लागतील्.:स्मित: त्या टेंटसारख्या मिळतात त्या बघाव्या लागतील.

मच्छरदाणीचं हेलिकॉप्टर! Rofl

बरं चला लवकर लवकर उपाय कम पोष्टी वाढवा पहिलं शतक जवळ आलंय... त्या उंदराच्या बाफला मागे टाकायचंय ना!

पुण्यात मनोहर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका छोट्या कॅफेमध्ये डासांना आणि माश्यांना मारण्यासाठी अभिनव उपाय केला आहे. तिथे भिंतींवर पाण्याने भरलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या दोर्‍याच्या सहाय्याने टांगल्या आहेत. अश्या थोड्या थोड्या अंतरावर १० ते १२ पिशव्या दोन्ही बाजुच्या भिंतींवर टांगल्या आहेत. त्याचे लॉजीक माहीत नाही परंतु त्याचा उपयोग होतो असे तिथे लिहुन ठेवले आहे.
हाही उपाय करुन पहायला हरकत नाही.

Pages