घरातील डास मारण्यासाठी/हुसकण्यासाठी सगळ्यात चांगला, सोपा व प्रभावी उपाय काय?

Submitted by सुयोग on 10 August, 2013 - 12:44

सध्या डास खुप वाढले आहेत, त्यासाठी खालील उपाय केले पण डास काही जात नाहीत.

१. mosquito racket - काही दिवसातच खराब होते, सारखी चार्ज करावी लागते
२. ओडोमोस, लिक्वीड, कासव छाप, स्प्रे - शरिराला अपायकरक
३. मछरदाणी - मर्यादीत वापर, लावायची कटकट
४. धुर, धुप - प्रभावी नाही
५. पाणी साचु न देणे - ह्यावर पुर्ण ताबा नाही, घराबाहेरुन डास येतात
६. गप्पी मासे पाळणे - शक्य नाही

ह्यावर तुम्ही काय उपाय करीत आहात?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात चांगला, सोपा व प्रभावी उपाय काय? >>> डांसाना अजिबात प्रतिबंध न करता हवं तेव्हा , हवं तेवढं रक्त पिऊ देणे , पिऊन किती पिणार आहेत बिचारे , ते काय पुढारी आहेत का ? आणि प्राणीमात्रांवर दया केल्याचं पुण्यही लाभेल तुम्हाला.
आणि शरिराला वेगवेगळे फ्लेवर्स चोपडायचे , स्ट्रॉबेरी , वॅनिला , पायनापल , तेवढीच डासांना व्हरायटी मिळेल.

सुयोग,

डास येण्याच्या वेळेला(तिन्हीसांजेला) घराची सर्व दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. झोपायच्या खोलित कासवछाप किंवा काळं हिट मारून खोली घट्ट बंद करावी. झोपताना कासवछाप विझवून टाका किम्वा खोलीपासून दूर ठेवा.

दक्षिणा +१,

बाहेरच्या खिड्क्यांना mosquito net लावता येईल, कोणत्याही hardware च्या दुकानात मिळ्ते.

"....ओडोमोस, लिक्वीड, कासव छाप, स्प्रे - शरिराला अपायकरक....!"

ह्या संदर्भात कुणाचे काय अनुभव?

मला 'सगळे बाहेर जा' व ' शुभरात्री' (क्रुपया इंग्रजीत भाषांतरीत करुन घ्या) ह्या द्रवरुप (डासांच्या)औषधाच्या वासाने (माझ्या) घशात खवखव झाल्यारखे वाट्ते.

विषेशतः लहान मुलांच्या द्रुष्टीकोणातून ह्यांचा अपाय काही आहे का?

फेसबुक वर एक उपाय बघितला होता. एका मोठ्या पेट बॉटलचे दोन तूकडे करायचे. खालच्या मग सारख्या भागात पाणी आणि डीमेरारा साखर ( ब्राऊन शुगर ) आणि यीस्ट टाकायची. त्यावर त्या बॉटलचा वरचा भाग उलटा ठेवायचा.
साखर आणि यीस्ट यांच्या संयोगाने कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो ( आणि अल्कोहोलही Happy ) त्याच्याकडे डास आकर्षित होतात. हा प्रयोग यशस्वी होतो अशी अनेक जणांनी ग्वाही दिली आहे. मी प्रयोग केलेला नाही.
पण फारसा खर्चिक आणि विषारी नसल्याने, सहज करता येईल.

त्यापेक्षा डास मारण्यासाठी फवारतात ते औषध प्यायचं आणि झोपायचं, येऊ दे डासांना आणि पिऊ दे रक्त, आपोआप मरतील ते Proud
टीपः वरील उपाय करताना पालकांसोबत करा, घरात एकटे असताना करु नये Proud

ओडोमॉस एवढे अपायकारक खरच आहे का? म्हणजे या गुडनाईट्पेक्षा वगैरे?

डासांची ती रॅकेट मिळते ना? आमच्या शेजार्‍यांनी आणली होती. डास खरच मरायचे. पण त्यांचा गोविंदा/ मिथुन डान्स पाहुन तो विचार सोडला.:खोखो:

टाळ्या वाजवुन आरत्या म्हणा. डासही मरतील, घरातल्या ज्येष्ठांना पण आनंद होईल्.:फिदी:

ओडोमॉस एवढे अपायकारक खरच आहे का? म्हणजे या गुडनाईट्पेक्षा वगैरे? >>>
बहूतेक तरी नाही. बहूतांशी लहान मुलांचे डॉक्टर गुड नाईट /कछुआ छाप पेक्षा ओडोमास वपरा म्हणून सांगतात असा अनुभव आहे.

धन्यवाद अल्पना. सध्या घरात गुडनाईट वापरले जातेय पण ओडोमॉस आता लोशनमध्ये पण मिळतेय, त्यामुळे ते पण वापरतो.

घराजवळ तुळशीची रोपे लावा असेही वाचलेय.

ऑल आऊट, कासवछाप, गुडनाईट वगैरे... ही आमच्याकडे कुणालाच चालत नाहीत. लगेच घशांची दुखणी सुरू होतात आणि ती दीर्घकाळ चालतात. Sad त्यामुळे संध्याकाळी कमीत कमी डास घरात येतील, असे बघणे आणि मच्छरदाणीचा वापर करणे हेच हाती असते.
(काही लोक कितीही डास चावले तरी अजिबात झोपमोड न होता बिनधास्त झोपतात, त्यांचा खरंच हेवा वाटतो.)

कोळी पाळा. तो खोलीच्या कोपर्‍यामधे जाळे तयार करतो. त्यात डास अडकतात व नंतर तो त्यांना गट्टम करतो.

अरे.......................सगळ्या जनावरांसाठी एकच धागा काढा................नाहीतर अ‍ॅनिमल राईट्स वाले ......प्राण्यांवर अत्याचार करण्यासाठी रोज एक एक धागा काढत आहेत म्हणुन मायबोलीवर केस करतील Biggrin

ओडोमॉस्/कासवछाप वगैरे सुवासिक उपचार नकोसे वाटतात?
मग ऐका तर, पॅपिलॉन या कादम्बरीच्या मराठी अनुवादात वाचल्याप्रमाणे, अन ट्रेकिन्गच्या वेळेस प्रत्यक्ष अनुभवल्याप्रमाणे, जर, तम्बाखू थोड्या पाण्यात्/थुन्कीत हातावर मळून ते हात अंगाच्या उघड्या भागावरुन चोळून लावल्यास, किन्वा तम्बाखु ओली करुन अन्गाला चोळून लावल्यास डास/मच्छर/कीटक/माशा वगैरे उपद्रवी प्राणी अन्गाजवळ फिरकतही नाहीत, स्पर्शकरुन चावणे फार लाम्बचे. असेही ऐकिवात आहे, (अनुभव नाही) की साप वगैरे जीवही जवळपास फिरकत नाही.
हा उपाय जरुर करुन बघा, आजच!
तम्बाखुचा असा कोणता ब्रॅण्ड नाही, पण गायछाप किन्वा कोणतीही काळी/पिवळी तम्बाखू चालू शकेल, मात्र उगाच एकसोबीस, तिनसो, बत्तीस वगैरे नम्बरच्या सुवासिक तम्बाखु वापरू नयेत.

मछ्छर्दाणी पलंगावर लावा आणि तुम्ही खाली झोपा चटई वर. म्हणजे डासांना वाटेल की तुम्ही मछ्छर्दाणी मध्ये आहात आणि ते तिकडे जातील. (मूळ स्त्रोत : हिंदी चित्रपट "अंगूर")

बेडूक पाळा.
ते काय चावणार नाहीत, पण तुमच्या अंगावर बसलेले/भिरभिरणारे डास खायला जर आले, तर थोडासा गिळगिळीत स्पर्श सहन करावा लागेल. Happy

तेच ते. त्यांच्या गुणगुण करण्याने जाम पिसाळल्यासारखे होते.:राग: हातात तर सापडत नाहीत, वरती आपल्याच कानाखाली सणकन बसते.:फिदी:

च्यामारि पण एक खरय बर का...डास चावला तरी बेहत्तर पण ती कानाशी गूणगूण असह्य होते बुवा. डास कायमचे मुके होतील अस काही औशध असेल तर सान्गा जरा कोणीतरी

तम्बाखू थोड्या पाण्यात्/थुन्कीत हातावर मळून ते हात अंगाच्या उघड्या भागावरुन चोळून लावल्यास, किन्वा तम्बाखु ओली करुन अन्गाला चोळून लावल्यास डास/मच्छर/कीटक/माशा वगैरे उपद्रवी प्राणी अन्गाजवळ फिरकतही नाहीत,
>> हे अस काहीतरी लावलतर डास/मच्छर/कीटक/माशा वगैरे प्राण्यांच माहीत नाही पण जे पाहीजेत ते पण जवळपास फिरकणार नाहीत हे नक्की

" पाणी साचु न देणे - ह्यावर पुर्ण ताबा नाही, घराबाहेरुन डास येतात"
आधी याच्यावर ताबा मिळ्वा, आपोआप डासांवर ताबा मिळेल.

बहूतांशी लहान मुलांचे डॉक्टर गुड नाईट /कछुआ छाप पेक्षा ओडोमास वपरा म्हणून सांगतात असा अनुभव आहे. >> अनुमोदन!

आमच्या ओळखीतल्या एकांना मच्छरदाणी व धूर निर्माण करणार्‍या कांड्या दोन्ही आवडत नाही. ते डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपतात. हवा मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या चादरीला विशिष्ट ठिकाणी मोठं भोक पाडलं आहे. ते भोक बरोबर नाकावर येईल असं अ‍ॅड्जस्ट करुन झोपतात.
अजूनपर्यंत एकदाही नाकात मच्छर गेला नसल्याचं अपडेटही मिळालं आहे.

कासवछाप उद्बत्तीची पूड करावी अन सर्वांगाला चोळावी...
<<
+११११११११११

कासवछाप उद्बत्तीची पूड करावी अन मच्छरांच्या सर्वांगाला चोळावी...

फेसबुक वर एक उपाय बघितला होता. एका मोठ्या पेट बॉटलचे दोन तूकडे करायचे. खालच्या मग सारख्या भागात पाणी आणि डीमेरारा साखर ( ब्राऊन शुगर ) आणि यीस्ट टाकायची. त्यावर त्या बॉटलचा वरचा भाग उलटा ठेवायचा.
साखर आणि यीस्ट यांच्या संयोगाने कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो ( आणि अल्कोहोलही स्मित ) त्याच्याकडे डास आकर्षित होतात. हा प्रयोग यशस्वी होतो अशी अनेक जणांनी ग्वाही दिली आहे. मी प्रयोग केलेला नाही.
पण फारसा खर्चिक आणि विषारी नसल्याने, सहज करता येईल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बॉटलचा वरचा भाग उलटा ठेवण्याचे काही कारण आहे का?

अजूनपर्यंत एकदाही नाकात मच्छर गेला नसल्याचं अपडेटही मिळालं आहे. >>> नाकात भरपुर केस असतील तर कसा जाणार बिचारा आत ? Lol Light 1

साखर आणि यीस्ट यांच्या संयोगाने कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो ( आणि अल्कोहोलही स्मित ) त्याच्याकडे डास आकर्षित होतात. हा प्रयोग यशस्वी होतो अशी अनेक जणांनी ग्वाही दिली आहे. मी प्रयोग केलेला नाही.
पण फारसा खर्चिक आणि विषारी नसल्याने, सहज करता येईल.>>>> काय ??? घरात कार्बन डाय ऑक्साईड तयार करणार ? , हे वाचुन मला राजाची आणि माकडाची गोष्ट आठवली. असले प्रकार करु नका जीवघेणं ठरु शकतं हे.

लवकरच घरात त्रास देणार्‍या प्राण्यांमध्ये डायनोसॉर आणि बायको एव्हढेच उरणारेत चर्चा करायचे ... >>>>>>
.
.
.या पोस्टीचे स्क्रिन शॉट घ्या रे.......... भविष्यात ...विनय ला "काळे पत्र" कराय्ला उपयोगी होईल Biggrin

वेगळा बाफ काढायला नको म्हणून इथेच विचारते चिल्टापेक्षाही लहान किडे झाले आहेत लॅपटॉपच्या स्क्रीन चालतात तेव्हा दिसतात इतके लहान आहेत चावून अंगाची आग आग होतेय प्लीज उपाय सूचवा!

Pages