Submitted by रसप on 8 August, 2013 - 01:58
ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे
भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे
दाढ्यांना कुरवाळुन जो तो 'हांजी-हांजी' करतो
मलाच केवळ खरे बोलण्याचा हा विकार आहे
हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे
हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे
------------------------------------------------------
कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे
....रसप....
७ ऑगस्ट २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/blog-post_8.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती नसल्याच्या दु:खाला आनंदी
ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे>>> मस्त मतला.
भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे>>> छान.
--------------------------
कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे
हे काही पटले नाही बुवा!
कणखरजी, धन्यवाद !! पोस्ट
कणखरजी,
धन्यवाद !!
पोस्ट संपादित करून त्याच्यासमोर 'मिचक्या' टाकला आहे.
धन्यवाद रणजित माझा प्रतिसाद
धन्यवाद रणजित माझा प्रतिसाद गांभीर्याने घेतल्याबद्दल... आजकाल तुमच्यासारखे अपवाद वगळता हे दिसत नाही.
असो, शुभेच्छा आपल्याला.
१,४,५ आवडले.
१,४,५ आवडले.
आवडली पोळ्या करणं बरचं सोप्प
आवडली
पोळ्या करणं बरचं सोप्प असतं
एकापेक्षा एक उंच चालले आहेत
एकापेक्षा एक उंच चालले आहेत षट्कार
आवडले शेर
पोळ्या भारी जमल्या की !!!
घड्याळवाला शेर सर्वाधिक आवडला !!!
____________________________
अवांतर : पोळ्या करणं बरचं सोप्प असतं <<<< मी असे वाचले >>>चारोळ्या करणं बरचं सोप्प असतं <
मुक्तछंदाचा माझ्यावरचा वाढत चाललेला परिणाम असावा
छानच... --आवडली
छानच...
--आवडली
आवडली गझल.
आवडली गझल.
गझलेपेक्षा पोळ्या केव्हाही
गझलेपेक्षा पोळ्या केव्हाही सोप्या
मस्त
मतला आणि मक्ता सर्वात विशेष
मतला आणि मक्ता सर्वात विशेष वाटले.
मतला मस्तच! घड्याळ शेरही -
मतला मस्तच!
घड्याळ शेरही - मला अर्थ नीट लागला नाहिये अजून...तरीही छान वाटतो आहे शेर!
गझल खूप दिवसांनी आली रसप,अन
गझल खूप दिवसांनी आली रसप,अन छान लिहिलीत. पगार मस्तच आहे
एक से बढकर एक शेर ! मस्त
एक से बढकर एक शेर ! मस्त मस्त गझल !
पोळ्या मात्र पचल्या नाहीत बुवा
----------------------------------------------------
अवांतर
तुझ्या मतल्यावरुन एक शेर आठवला
यायचे सर्रास तर स्वप्नामधे ये
चांदण्या रात्रीस बोलावू नको तू
-सुप्रिया.
___/\___ --------------------
___/\___
--------------------------------
'पोळ्या' विनोदाने लिहिले आहे. गांभिर्याने घेऊ नये. कुणी दुखावल्यास क्षमस्व........!
हरेक जन्मी तूच भक्त मी
हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे<<< सुंदर शेर
मतल्यावरून माझ्या कवितेतील दोन ओळी आठवल्या.
सत्यात प्राप्त व्हावी कशि हा सवाल आहे
स्वप्नात यायला तर तीही तयार आहे
(आलास तू उशिरा - या कवितासंग्रहातून)
हो, मी करतो तिची चाकरी
हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे <<< व्वाह....
कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे <<<:हाहा:
रसप, सगळेच उत्कृष्ट !
रसप,
सगळेच उत्कृष्ट ! पोळ्यांमुळे थोडा रसभंग होतो ... पण Best
रसप , छान आहे. ती नसल्याच्या
रसप , छान आहे.
ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे >> हे जास्त आवडले.
मस्त!!!
मस्त!!!
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे<<<
गझलेत अश्लीलता नसावी.
एक आपले मत! दिवा वगैरे.
__/\__ ----------------------
__/\__
------------------------
>>गझलेत अश्लीलता नसावी.<<
अश्लीलता कशातच नसावी ना बेफीजी ?
मनात नसावी असा ऐकला होता मी
मनात नसावी असा ऐकला होता मी मला बाकी त्यातला काय कलत नाय !!