जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या?

Submitted by मी मुक्ता.. on 5 August, 2013 - 01:22

जाई, जुई आणि चमेली यातील नक्की फरक काय?
५ पाकळ्या आणि एकाच्या मागे गुलाबीसर पट्टा असणारी ती जाई ना?
कोणी फरक स्पष्ट करुन सांगू शकेल का? जमल्यास फोटोसह.. फोटोची लिंक दिली तरी चालेल..
प्लीज...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या तीनही फुलांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इंटरचेंजेबल नावांनी ओळखतात. माझ्यासाठी जी जाई तिला एका ठिकाणी जुई तर एकीकडे चमेली म्हटलेलं मी ऐकलेलं आहे..

एकाच्या मागे गुलाबीसर पट्टा असणारी ती जाई ना?
>> ती चमेली. हीच्या पाकळ्या थोड्या लांबट असतात. जाईजुई अगदीच नाजूक दीसतात. चमेलीचा वास जाजु पेक्षा जास्त छान असतो असं मला वाटतं.

मी ज्या वेलीला जाई म्हणते तिला इकडे विदर्भात चमेली म्हणतात, तर जुईला जाई म्हणतात.
मग चमेली नक्की कशी दिसते ते काही समजत नाही.

अजुन एक सातारा भागात एक वेल येते जी मी फलटण चौकात अवधुत नावाच्या हॉटेलच्या कंपाऊंडला आणि चाफळच्या राम मंदिरात पाहीली आहे, तो गजर्‍याचा एकेरी मोगरा नक्कीच नाही.
पानांची ठेवण थोडी कुंदा आणि जुईच्या पानांच्या जवळ जाणारी.
फुल जुई आणि एकेरी मोगर्याचे कॉम्बीनेशन आहे.
हिच वेल मी पाटणजवळ निवकण्याची जानुबाईला तिथल्या जंगलात पण पाहीली आहे.

आर्या ने दिलेल्या प्रचि मधली पहिली ती चमेली, दूसरी ती जाई. जुई आजून जास्त नाजूक असते, आणि त्याहून ही अधिक नाजूक अशी सायली! अतिशय मोहक आणि आदक आणि वेडावणारा गंध असतो, सायलीचा पण!

ह्म्म.. सगळ्यांचे आभार.. Happy

गोंधळ तर उडालाच आहे.. यामुळेच की प्रत्येकानुसार नावं वेगवेगळीच आहेत.. जाई आणि चमेली तर फारच इंटरचेंजेबल.. Sad म्हणूनच नक्की माहिती हवीय.

जागूंना संदेश पाठवलाय.. बघू.. इथे टॅग करायची सोय नाही ना.. Wink

धन्यवाद आर्या..

अश्विनीमामी,
जाई जुई चमेलीचे वास कसे असतात, तुम्हीच सांगा आता.. Wink

चमेली
jaaee.jpg

जाई
jaaee.jpg

.

मुकुने जे चमेलीचे फुल दिलेय त्याला पश्चिम महाराष्ट्रात जाई म्हणतात.
चमेलीचे फुल कुंदासारखे पण थोडे लालसर असते.

जाई म्हणजेच चमेली. तीच ती गुलबट झाक असलेली. जुईची फुलं त्याहून लहान, पांढरी आणि पाकळ्या अगदी नाजुक असतात. आणखी एक सायली असते - ती जुईची मोठी बहीण असल्यासारखी दिसते. सुगंध या प्रत्येक फुलाचा निराळा असतो.

मी मुक्ता धन्यवाद. बरं झालं बॉयोलॉजी सोडलं... नाहीतर झेपलच नसतं ... >>>> नक्कीच. जर जाई=सदाफुली असं समीकरण डोक्यात असेल तर नक्कीच! Happy Light 1

Pages