जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या?

Submitted by मी मुक्ता.. on 5 August, 2013 - 01:22

जाई, जुई आणि चमेली यातील नक्की फरक काय?
५ पाकळ्या आणि एकाच्या मागे गुलाबीसर पट्टा असणारी ती जाई ना?
कोणी फरक स्पष्ट करुन सांगू शकेल का? जमल्यास फोटोसह.. फोटोची लिंक दिली तरी चालेल..
प्लीज...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो का? मग मला नेवाळी म्हणजे कोणती ते अगदीच लक्षात येत नाहीये.
(फोटो दाखवा म्हटलं तर एकजण दाखवेल तर शपथ! :P)

>>मी ज्या वेलीला जाई म्हणते तिला इकडे विदर्भात चमेली म्हणतात, तर जुईला जाई म्हणतात.
अहो नाही हो! चमेलीला चमेली, जाईला जाई आणि जुईला जुईच म्हणतात. तिन्ही वेगळी फुलं आहेत (बहुतेक). Happy

मुक्तेश्वर यांनी टाकलेले दोन्ही फोटो बरोबर वाटले.

मुक्तेश्वरांनी फक्त चमेली बरोबर टाकलीय.

दुसरा फोटो जो टाकलाय त्यांनी तो नेवाळीचा आहे.

आणि हो, जाई, चमेली व जुइ पुर्ण वेगळे फुलं आहेत.

मी_आर्याने जो दुसरा फोटो टाकला आहे त्यालाच आम्ही सायली म्हणतो बहुतेक Uhoh
आणि एक बरसाती जाई म्हणूनही एक प्रकार आहे ना..

चम्पा कोण असते?

जाई सहसा घराच्या बागेत लावली जात नाही कारण घरातील सगळ 'जाई जाई' होत अशी (अंध)श्रद्धा असायची - माळ्यापासून मालकापर्यंत सर्वांची (काहीही न..!) त्यामुळे कुंपणाबाहेर, गेटवर सापडते ती जाई Wink

आमच्या बाल्कनीला पूर्ण जाईचा वेल होता. मागच्या पानावर मी आर्याने टाकलेला फोटो आहे तशीच फुलं व पानं असायची..
लगेहाथ विचारून घेते. वेलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जाम आठवत नाहीये.. :|

जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या? >>> न ओळखता यायला काय झालं ? .............. तिळ्या आहेत का त्या ? Lol Wink

तिळ्या आहेत का त्या ? >> झाल का सुरु धागा भरकटवने!! Happy एकमेकीना प्रोक्सी हजेरी लावतात न त्या मग ... नाही गोंधळ होणार?

जाई सहसा घराच्या बागेत लावली जात नाही कारण घरातील सगळ 'जाई जाई' होत अशी (अंध)श्रद्धा असायची - माळ्यापासून मालकापर्यंत सर्वांची (काहीही न..!) त्यामुळे कुंपणाबाहेर, गेटवर सापडते ती जाई >>> सिमन्तिनी, म्हणजे पाहुणे आल्यापावली परत जात असतील! Proud

वर्रच्या फूलगर्दीत मोगरा येऊन गेला नाही का? Happy

आज संध्याकाळी आमची गजरा जर आली तर हमखास जाई आणि मोगर्‍याचे फोटो टाकेन.

अगगं.. किती ते प्रश्न.. एक उत्तर धड मिळालेल नाहीये..
कोणीतरी सगळ्या फुलांचे फोटो टाका ना.. टोट्ल कन्फुजन

सायली आणि कुंद दोन्ही एकच ना का वेगळे?>>> अगदी वेगळे. सायलीच्या पाकळ्या नाजूक असतात आणि वेलीवर येतात. कुंदाच्या पाकळ्या जाडसर असतात आणि त्याचे झाड असते. आणि अर्थात वासही वेगळा वेगळा असतो.

जाई ,जुई चमेलि, यांचा एक औषधि ऊपयोग सांगते जो मि माज्या मुलिसाथि ति लहान आसतांनाकेला होता...तिला केस फार कमि होते.माझि मैत्रिन म्हनालि कि, तिचे सर्व केस काढुन टाक आणि वरिल वनस्प्तिच्या फांद्या जाळुन त्यांचि राख खोबरेल तेलात कालऊन डोक्याला लाऊन फड्के गुनडाळुन ठेव.हा प्रयोग रात्रि झोपण्याअगोदर दोन तास अगोदर कारणे अंथरुणाला तेल न लागावे म्हणुन......मझ्या मुलिला भरपुर केस आले.....हा माझा अनुभव...पहा कुणाला याचा ऊपयोग होतो का......

जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या?

सोप्पय!

आधी "जाई" अशी हाक मारायची. जी मागे वळून पाहील तीचे नाव जाई!

हेच मग जुई आणि चमेलीबाबत करायचे Wink

मुक्ता काल माझ्याकडे याहु उघडत नव्हत त्यामुळे मेल मिळाला नव्हता. पण मी तुझी लिंक पाहीली तेंव्हा फोटो शोधायला लागले आणि थोड्यावेळात ऑफिसमध्ये कामात पूर्ण बिझले. रात्री मोबाईल मधून तुझा धागा उघडला तेंव्हा मुक्तेश्वर यांनी माझे काम सोपे केले.

मुक्तेश्वर यांनी टाकलेले फोटो बरोबर आहेत.
ही नेवाळी.

कागडयाच्या पाकळ्या थोड्या रुंद असतात आणि वास जरा उग्र असतो किंवा नसतोच म्हणा. नेवाळीला पण तसा विशेष वास नसतो.

मदनबाण. ह्याला भरपूर सुगंध असतो.
व फुल मोगर्‍यापेक्षा मोठे असते.

कुंद .

ही चमेलीची कळी. ह्याची पानेही छोटी असतात.

ह्या जूईच्या कळ्या आकाराने लहान असतात.

फुललेली जुई

ही रातराणी

डबल मोगरा

मोगरा

रानजाई

तगर

आणि प्रांतानुसार वेगवेगळी नावे असू शकतात.

आली आली जागू आली. सध्या आमच्या कडे तीन प्रकारची फुले फुलतायत. १ जुई, २. नेवाळी, ३. बहुतेक जाई असेल. Happy

Pages