धर्म आणि नियम

Submitted by Mandar Katre on 24 July, 2013 - 01:48

धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकसित जगात तर्कशुद्ध विचारसरणीचा उदय /प्रसार आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय

भारतातच नव्हे तर जगात इतरत्र देखील धर्म ही संकल्पना न मानणार्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते याचे प्रमुख कारण नीतिसूत्रे आणि पाप-पुण्य यात ताळमेळ नसणे

मांसाहार जर एका माणसासाठी पाप ठरत असेल तर दुसर्यान माणसासाठी ते पाप नाही. दारू पिणे पाश्चात्य जगात अतिशय कॉमन असताना आपल्याकडे अपेयपान/अभक्ष्यभक्षण इत्यादि धर्मनियम लावण्यात येतात.

सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह ठरवणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा गुरुचरित्रा सारख्या ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे हेही पाप असे सांगितले जात असेल, तर अशा भाकड आणि भ्रामक धर्मनियमांचे पालन करणे हे खुळेपणाचे आणि हास्यास्पद ठरते . तीच गत परान्न-भोजन आणि तत्सम कालबाह्य नियमांची...

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.

सती जाणारी स्त्री आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते , विधवा स्त्रीने आपले केस कापले नाहीत तर त्या केसांचा फाशीचा दोर होवून मृत नवर्यासच्या गळ्याला अडकून पडतो अशा अनेक भ्रामक कपोलकल्पित रूढी/शास्त्र / समजुती गेल्या 70-80 वर्षापूर्वी प्रचलित होत्या .अशा गोष्टींना आज आपण अंधश्रद्धा म्हणतो, मग सध्या अस्तीत्वात असलेले भ्रामक धर्मनियम भविष्यकाळात अंधश्रद्धा ठरू शकतात .

अर्थात सर्वच श्रद्धा या अंधश्रद्धा नसतात हे मान्य. पण म्हणून धर्म आणि शास्त्राचा /नियमांचा बडेजाव न करता कालानुरूप धर्माने प्रवाही व्हायला हवे,आणि समाजधुरीणानी याबाबतीत पावले उचलावीत ,अशी अपेक्षा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत. >>>+१०००

पण खरी वाटचाल उलट दिशेने सुरु झालेली दिसतेय की काय Sad

अर्थात सर्वच श्रद्धा या अंधश्रद्धा नसतात हे मान्य. पण म्हणून धर्म आणि शास्त्राचा /नियमांचा बडेजाव न करता कालानुरूप धर्माने प्रवाही व्हायला हवे,आणि समाजधुरीणानी याबाबतीत पावले उचलावीत ,अशी अपेक्षा!

सहमत!
पण समाजधुरिणांची वाट पहायची गरज नाही.
आपल्यापासूनच सुरूवात करता येते.

धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय>>>>>> सह्मत

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.>>>>>+१००

धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय>>>>>> सह्मत

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.>>>>>+१००

लेख लहान पण उत्तम आहे.
<<पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय>> याबाबतीत आधुनिक विचार म्हणजे - परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्!

साती यांचे मत/आदेश/आव्हान/सल्ला पटला.

कॅथॉलिक लोकांचे बरे आहे. एकदा पोपने सांगितले की झाले.
हिंदू धर्माचे तसे नाही ना! कुणि काय करावे हे कोण ठरवणार नि कोण ऐकणार?

@झक्की :- कधीकधी तेच बरं वाटते. उगाच एकाच्या इशार्‍यावर नाचणे नको. म्हणुनही असेल कदाचित, की हिंदू धर्मातील बदल हळू पण निश्चितपणे होत असावे.

>>>>> धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख का <<<<<
या पहिल्या वाक्यालाच, तोन्डातील घासात खडा आल्याप्रमाणे झाले Proud
प्रभाव ओसरला हे गृहितक कुठुन आणलेत?
अन हे जर गृहितक प्रत्यक्षात अस्तित्वात आहे तर ते दृष्य मिडियावाले मात्र अमक्या तमक्या देवस्थानापुढे भक्तान्नी वाहिलेल्या कोटीन्ची उड्डाणे घेणार्‍या रक्कम्मान्चे आकडे जगजाहिर करित असतात, ते कसे काय बरे?
सबब, मला तरी हा लेख/धागा "बाबारे म्हणत बिब्ब्याचे पट्टे ओढणारा" असा वाटतोय Wink
बाकी तुमचे चालूद्या, कधीच कुणालाच नाकारता न येणारे एखाददुसरे अति उदात्त तत्व मान्डून त्या मागोमाग त्या आडून लग्गेच सतीप्रथा (जी उच्चवर्णियात शम्भर वर्षान्पूर्वी होती) अन विधवेचे केस कापणे (ही देखिल उच्चवर्णियात शम्भर वर्षान्पूर्वी होती) वगैरे कालबाह्य अन केव्हाच नाकारलेल्या प्रथान्चा उल्लेख करीत शेवटी धर्माबाबत वाचकाचे मनात बुद्धिभेद करण्याचा तकलादू प्रयत्न जुनाच आहे.

पुण्य म्हणजे काय ते जरा पाहूया

''परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्'' हेच सत्य आहे.

शारीरिक क्रिया आणि कर्म यात फरक आहे. म्हणजेच मनुष्य जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक शारीरिक क्रिया रोज करतो, त्यात पाप-पुण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उदा. शौच-मुख मार्जन , आंघोळ , कपडे धुणे /पिळणे /वाळत घालणे ,जेवण ,झोप यासारख्या नित्य क्रिया मध्ये पापचा कोणताच संबंध असू शकत नाही

कर्म हे चांगले किंवा वाईट नसते म्हणजेच पुण्य किंवा पाप बनते ते त्या कर्माच्या मागच्या हेतुमुळे . जेव्हा एखादे काम करताना परोपकारचा आनंद मनास होतो, असे काम पुण्यकर्म होय . तर ज्या गोष्टीने इतरांस त्रास होईल,असे कर्म म्हणजे पाप होय...

आता धर्मनियमातील पुण्य ही संकल्पना पाहू. देवपूजा इत्यादि कर्मे किमा उपवास, यज्ञ ,जप इत्यादि कर्मे करताना त्याचा उद्देश चांगला आहे का? उद्देश चांगला असेल तर ते सात्त्विक पुण्य होय. जर ते पुण्याकरमा स्वता:च्या स्वार्थासाठी असेल तर राजस पुण्य ,आणि दुसर्‍यांस त्रास देणे/ पीडा करणे/ बाधा उत्पन्न करणे या उद्देशाने केलेले कथित पुण्याकरम हे तामस मानले जाते.

आजकाल काही ढोंगी साधू व तांत्रिक शास्त्राच्या नियमांच्या नावाने धर्माचा बडेजाव करतात . आणि शिष्याचा मानसिक विकास खुंटवून त्याला नियमांच्या जाळ्यात अडकवून बुद्धिभ्रम करून ठेवतात ,अशा तांत्रिक ढोंगी लबाड साधू नी केलेले कोणतेही पुण्यकर्म ,हो अगदी कोटीचंडी देखील तामस असते .... आणि खरे सांगायचे तर अशा कितीही मोठ्या कोटीचंडी/तामसी पुण्याकरमापेक्षा सात्विक भावाने देवाला केलेला नमस्कार देखील अधिक श्रेष्ठ असतो ,असे भगवान श्रीकृष्ण सांगतात

श्रीमद्भगवद्गीता -श्रद्धात्रय विभाग योग आणि दैवासुर संपद-विभाग योग

धन्यवाद

स्वामिजी,

प्रणाम,

फार सुंदर निरुपण, खूपच छानपणे विशद केलेत.

अत्यंत उपयुक्त माहिती, कितीतरी दिवसांनी असे काही वाचायला मिळाले.

आभारी आहे. . . .

स्वामी विश्वरूपानंद,
सादर प्रणाम, चांगले सांगितलेत. इतकी वर्षे मायबोलीवर येऊन सुद्धा आज जे समाधान झाले तसे कधी झाले नाही.

लिंबूटिंबू,
माझ्या मते प्रभाव ओसरला याचा अर्थ लोकांची वैयक्तिक श्रद्धा कमी झाली. स्वार्थापुढे धर्माचरण, श्रद्धा यांचा मनावरील पगडा कमी झाला.

ते मिडीया नि बाकीचे सगळे खोटे आहे हो! श्रद्धा शून्य. राजकारण, स्वार्थ. देवाचा, धर्माचा तिथे काही संबंध नाही.

धन्यवाद स्वामी विश्वरूपानंद जी

मला वाटते आपण अनेक मंडळींच्या मनात असलेल्या संशयाचे निराकरण अतिशय प्रभावी पद्धतीने केले आहेत

आपल्या उपदेशाबाबत पुनश्च आभार

महाराज आपण फारच सुंदर विवेचन केलेले आहे

पण मूल प्रश्न असा आहे की पुण्य आणि पापाचा मानवी जीवनात कितपत संबंध आहे?

पाप आणि पुण्य अशा कपोलकल्पित संकल्पनांचे मायाजाल वापरुन अनेक कर्मठ माथेफिरुनी समाजाचे आणि हिंदू धर्माचे वाटोळे केलेले आहे , मुळात ज्ञान आणि विज्ञान सर्व विषयात श्रेष्ठ आहे . वैज्ञानिक /प्रोफेशनल जीवनपद्धती आणि दृष्टीकोण समाजात रुजवायचा आसेल तर अशा भ्रामक समजूतींचा संपूर्ण निरास करणे अत्यावश्यक आहे असे माला वाटते

स्वामी विश्वरूपानंदांना प्रणाम.

''परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्'' : हे बहुधा ''परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्'' असे असावे.

"कर्म हे चांगले किंवा वाईट नसते म्हणजेच पुण्य किंवा पाप बनते ते त्या कर्माच्या मागच्या हेतुमुळे": असे आपण लिहिले आहे. हे जर खरे असेल, तर:
१. दशरथाने मुद्दाम ऋषींना बाण मारला नव्हता. त्याचा हेतू वाईट अजिबातच नव्हता . पण ते पाप होते.
२. व्याधाने शिवलिंगावर चांगल्या हेतूने बिल्वपत्र वाहिले नव्हते. पण ते महापुण्य होते. (वाईट हेतू पण नव्हता)
३. अजामिळाने भक्तीने नारायणाला हाक मारली नव्हती - पण ते पुण्य होते.

अशा अनेक गोष्टी पुराणांत आणि संतचरित्रात आहेत. "गहना कर्मणो गती:".

"कोटीचंडी देखील तामस असते" असे आपण लिहिले आहे. : बहुधा कोटीचंडी तामस नसावी. करणारा तामस असावा. साक्षात श्रीकृष्णावर आणि पाण्डवसैन्यावर नारायणास्त्र टाकण्यात आले होते!

स्वामींना पुन्हा प्रणाम - हि फक्त तात्विक चर्चा आहे. आपले लिखाण नेहेमीच तर्कशुद्ध असते हा अनुभव. योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती.

कर्म हे चांगले किंवा वाईट नसते म्हणजेच पुण्य किंवा पाप बनते ते त्या कर्माच्या मागच्या हेतुमुळे <<<

घरी आलेल्या पाहुण्यांना द्यायला काहीच नसल्याने एका मुसलमानाने आपला आवडता कोंबडा कापला आणि तो चांगला भाजून त्या पाहुण्यांना खायला घातला. हे पुण्य की पाप स्वामी विश्वरुपानंदजी?

हेतू - अतिथी भुकेले न राहोत

कृत्य - एका मूक सजीवाची हत्या व त्या सजीवाला त्रास

ध्रर्माचे हे पाप-पुण्याचे नियम जरी सोपे असले तरी समजायला खूप कठीण आहेत.

स्वामी विवेकानंद म्हणाले होते की एखादे काम केल्यावर जर तुमच्या मनाला काहीतरी रुखरुख वाटत असेल की असे नको करायला हवे होते तर ते पाप.

बेफीजी,
तुम्ही दिलेल्या उदाहरणात हे सर्व कर्म त्या व्यक्तीने केले आहे आणि ती व्यक्तीदेखील स्वतःला कर्ता समजत असेल तर त्याला फळ (चांगले / वाईट किंवा दोन्ही) भोगावी लागतीलच. ती फळे काय असतील ते देवच जाणो.

कदाचित त्याला चांगले जेवण जेऊ घातल्याबद्दल पुढे कधीतरी चांगले जेवण(तंदूरी चिकन वै.) मिळेल, आणि प्राणी हत्येबद्द्ल कोंबडीचा जन्म मिळेल आणि अर्थात इतर अनेक कोंबड्यांप्रमाणे असा अनैसर्गिक मृत्यू मिळेल.

हा तर्क तुम्हाला विनोदी वाटेल, पण इलाज नाही. Happy

गमभन, अनेक धन्यवाद! स्वामीजींनी शंका निरसन करावे असा हेतू अजूनही मनात आहे. Happy

बेफिकीर,

तुम्ही इथे 'पाप की पुण्य' हा जो प्रश्न विचारला आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी स्पष्ट कराव्याश्या वाटतात. आपण या जगात जीव म्हणून वावरत आहोत. आपली ओळख एक प्राणी (म्हणजे प्राण धारण करणारा) अशी आहे. देह जगवण्यासाठी त्यात प्राण असावा लागतो. हा प्राण देहात राहावा यासाठी रोज आहार खावा लागतो.

तर, आहारनिर्मितीची प्रक्रियाच मुळातूनच पापयुक्त आहे. अगदी तृणधान्ये खाऊनही जगायचं ठरवलं तरी अनवधानाने कोवळ्या अंकुरांची हत्या होतेच. त्यामुळे जो आहार खातो तो पापी अशी परिस्थिती आहे. आहारातून उत्पन्न होणारे सप्तधातु पापाची विविध रूपे आहेत.

असं असलं तरीही स्वत:च्या या पापी देहाची हत्या करण्याचा अधिकार माणसाला नाही. आत्महत्या हे महापातक आहे. मात्र खाणंपिणं थांबवून केलेल्या आत्महत्येला हिंदु धर्मात मान्यता आहे. या प्रकारास प्रायोपवेशन म्हणतात. उदा. : सावरकरांनी अशाच प्रकारे देहत्याग केला होता. या मान्यतेचं प्रतिबिंब भारतीय दंडविधानातदेखील सापडतं. आमरण उपोषण करणे हा गुन्हा नाही. तसेच जैन मुनींनीही प्रायोपवेशन करून देहत्याग केल्याची उदाहरणे आहेत. बौद्धांबद्दल माहीती नाही.

आता या पापी देहाची जबाबदारी प्रत्येकावर आहे, तर मग हे पाप सोसायचं कोणी? प्रत्येक जीवाचं ज्याचं त्यानं सोसावं अशी अपेक्षा आहे. हे सोसणे सुसह्य व्हावे म्हणून माणसाला नित्यश: करायचे पंचयज्ञ सांगितले आहेत.

हे पंचयज्ञ येणेप्रमाणे : देवयज्ञ, पितृयज्ञ, ऋषीयज्ञ (वा ब्रह्मयज्ञ), मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाईम्स मधील हा लेख वाचनीय आहे.

आ.न.,
-गा.पै.

नमस्कार मंडळी !

आकाश नील,
१. दशरथाने मुद्दाम ऋषींना बाण मारला नव्हता. त्याचा हेतू वाईट अजिबातच नव्हता . पण ते पाप होते.
> > > >
न कळत, न जाणता, अज्ञानाने दुसर्‍यास काही ईजा झाली, तर ते पाप नसुन कर्मच असते परंतु त्याचे ही प्रायश्चित्त ग्यावे लागतेच, त्यातुनच पुन्हा तसे होऊ न देण्याचा धडा घेतला जातो.
---------
२. व्याधाने शिवलिंगावर चांगल्या हेतूने बिल्वपत्र वाहिले नव्हते. पण ते महापुण्य होते. (वाईट हेतू पण नव्हता) > > > > >
बिल्वपत्र कुठल्याच हेतुने आणी वाहिलेही नव्हतेच. ते फक्त खुडुन खाली टाकतांना शिवलिंगावर पडत होते येव्हढेच. म्हणुन हे निर्हेतुक पणे झालेले ( केलेले नव्हे ) निर्गुण कर्म, त्याचे ही फळ परमेश्वर देणारच ना ?
त्यात वाईट आणी चांगली असा कुठला हेतुच नव्हता.
-----------------
३. अजामिळाने भक्तीने नारायणाला हाक मारली नव्हती - पण ते पुण्य होते.
> > > >
नारायण नामाचा हा महिमा आहे, त्या भगवंताचे कुठल्याही उद्देशाने घेतलेले, उच्चारलेले नाम " नारायण ", हे ईतके प्रभावी आहे.

नमस्कार.

दशरथाने मुद्दाम ऋषींना बाण मारला नव्हता. त्याचा हेतू वाईट अजिबातच नव्हता . पण ते पाप होते.

मुद्दाम बाण मारला असता तर पिनल कोड ३०२ लागले असते. चुकून हातून मेला तर कलम ३०४ लागते.

धर्म हि संकल्पना माणसाने काही तरी XYZ कारणाने सुरु केली. त्यात आरोग्य वाढविणे, समाजाची नितीमत्ता संभाळणे, वाईट प्रवृत्तीना आळा घालणे यासाठी पाप पुण्य या सारख्या संकल्पना टाकण्यात आल्या असाव्या. सामान्य माणसाला (त्यावेळच्या आणि आत्ताच्याही) वैज्ञानिक दृष्टिकोण समजेलच असे नाही. त्या त्या वेळेस धर्मगुरु, समाजाचे नायक यांनी त्या वेळेसच्या परिस्थितीनूसार आचारसंहिता बनवल्या काही नियम घातले. ते आज कित्येक हजार वर्षांनी पण लागू होतीलच असे नाही.

धर्म या गोष्टि मधे कालबाह्य गोष्टी सोडून, नव्या सुधारणा करणे गरजेचे आहे, नाहीतर नविन पिढिच्या लेखी धर्म (किंवा धर्मातल्या काही ठराविक गोष्टी) हास्यास्पद होतील. आणि धर्म या संकल्पनेच्या बाकि फायद्यांपासून पण ते वंचित राहतील.

धर्म या गोष्टि मधे कालबाह्य गोष्टी सोडून, नव्या सुधारणा करणे गरजेचे आहे, नाहीतर नविन पिढिच्या लेखी धर्म (किंवा धर्मातल्या काही ठराविक गोष्टी) हास्यास्पद होतील. आणि धर्म या संकल्पनेच्या बाकि फायद्यांपासून पण ते वंचित राहतील.>>>>मीसुद्धा हेच म्हणतोय अतरंगी जी .धन्यवाद

कालबाह्य व तर्क-विसंगत धार्मिक रूढी फेकून द्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदू समाजाला आवाहन ...
#Hindu #RSS

http://www.huffingtonpost.in/2015/09/14/hindu-values-that-do-not-_n_8131...

धार्मीक रुढींच काय आहे. एका जमान्यातल्या रुढी कालबाह्य झाल्या की नविन तयार होतात. उदा.

माझ्या लहानपणी नवरात्रात चप्पल न घालता रहाणारे कोणीही नव्हते.

हे तप आहे असे मानता येईल. पण औद्योगीक उत्पादन करणारे कारखाने या ठिकाणी, लोकल मधे पाय गर्दीत चिरडले जातील अश्या ठिकाणी चप्पल न घालणे म्हणजे जरा अतीच.

या सारखी उदाहरणे आणखी काही देता येतील

>>कालबाह्य व तर्क-विसंगत धार्मिक रूढी फेकून द्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदू समाजाला आवाहन ...<<
हे वाचून आनंद झाला.हे अर्थातच एकदम होणार नाही. पण मोहन भागवतांनी अस म्हटल याचा आनंद आहे.सुरवात तर करु या. सण पर्यावरण पुरक साजरे करु एवढ साध जरी झाल तरी सध्या खूप होईल.