पाचोळा

Submitted by कौतुक शिरोडकर on 8 June, 2009 - 13:54

'मुळ' स्वभावानुसार 'मुळं' वाढत गेली
जमिनीच्या उदरात... खोलवर.
'खोडा'चीही 'खोड' जाईना,
अस्तव्यस्त पसरायची ....एक ढोल उरावर घेऊन.
'शाखां'नी आपल्या 'शाखा' पसरवल्या चोहीकडे.
'पान'भर अक्षरे सांडावी
तशी 'पानं' बहरली फांद्यांच्या अंगाखांद्यावर.
'फुलं' 'फुल'त गेली आणि
'फळां'च्या अपेक्षेत असणार्‍याना 'फळं' मिळाली देखील.
मग 'झाड'च वळलं आणि म्हणाल,
'जरा 'झाड' रे ही अंगावरची, नको असलेली जीर्ण वस्त्रे'.
कानात 'वारा' शिरावा तसा 'वारा' आला सुसाटत आणि
हळु हळु ओघळलं एकेक पिवळं पान,
विसावलं खालच्या 'पाचोळ्या'त.
डोळे मिटता मिटता त्यांनी पाहीला
वर लगडलेला हिरवा 'पाचोळा'.

गुलमोहर: 

कौतुक, ही काहीच्या काही नाही तर छान कविता आहे. पण झाड असं म्हणालं? पटलं नाही....
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

पण झाड असं म्हणालं? पटलं नाही.... >> अनुमोदन.. कौतुक वारा म्हणाला जास्त साजेसा वाटल असत. आणि काहीच्या काही मध्ये का? जागा बदला... इथे फक्त काहीच्या काहीच खपवुन घेतल जाईल.. काहीही नाही Happy

झाड म्हणतं रे असंच!

कधी कधी फार जरूरी होउन जाते झडणे.... त्या पाचोळ्याचे!

कौतुक, आवडली रे मित्रा! अगदी मनापासुन!

प्रकाश, झाड खरेच स्वतःहून असे म्हणेल का? कवितेतील कल्पना अगदी भगवदगीतेतल्या श्लोकाप्रमाणे आहे. पण शरीर जसे आत्म्याला स्वतःहून सोडून जा म्हणत नाही; कितीही जीर्ण झाले तरी तसेच झाड स्वतःहून तरी असे म्हणणार नाही. बाकी कौतुकच सांगेल.

..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

उमेशराव, जुनं कितीही हवंहवंसं असलं तरी नव्या पिढीला देखील संधी नको का मिळायला?
कौतुका... मस्त रे ! पण हे कैच्या कै नाय हे मात्र नक्की ! Happy

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

कौतुका कस करु तुझ कौतुक ? कै च्या कै मधून खर्रच हलव हिला.

*************************************************
जे जे आपणासी ठावे.

मस्त!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

कौतुक भाऊ .... बढीया है ... मस्तच

छानच!!

हिरवा पाचोळा.... मस्तं कौतुक!