नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) मी खुन करुन पळालोय आणि पोलिस मागे आहेत म्हणुन धावतोय. Uhoh
२) दचकुन पडतो एकदाच (खराखुरा पडत नाही). एकदा पडण्याच्या दचक्याने जाग येते. मग परत लवकर झोप येत नाही.
३) कधी नुसतेच साप दिसतात.
कधी मी त्याना मारतो.
कधी पकडतो. कधी ते माझ्या मागे चावायला आणि मी पळतोय असे.

नेहमीचं स्वप्न : - पायरी उतरताना एक पायरी सोडुन मी खाली पडतोय आणि प्रत्यक्षात झोपेत माझा पाय झटकतो आणि जाग येते. तसंही उंचावर गेल्यास खुप भीती वाटते.

मी प्रचंड आणि अखंड प्रवास केल्यामुळे मला नेहमी पडणारे एक स्वप्नः

बॅग वगैरे सगळे ट्रेनमध्ये राहिले आणि मी पाणी वगैरे घ्यायला खाली उतरल्यानंतर ट्रेन गेली निघून!

मला नेहमी पडणार स्वप्न म्हणजे मराठीचा पेपर चालू आहे आणि मला वेळ पुरत नाहीये Proud
(शालेय जीवनातील १२ही वर्ष हे झालय)
कधी कधी मी रडत उटह्ते मग माझी बहिण म्हणते की "दिदी, तुला एमएसला पण मराठी आहे का?" Proud

शाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.

मला स्वप्न फार क्वचितच पडतं. जेव्हा पडतं ते फक्त पालींबद्दलच असतं. याचा काय आणि कशाशी संबंध असेल? माझ्या अंगावर कधीही पाल पडली नाही, कधीही पालीबरोबर भयानक एन्काउंटर झालं नाही, लहानपणापासुन कधी घरातही नव्हती. एखादवेळेला कुठे बागेत किंवा टेरेसमधे दिसली तेव्हा टाळणं शक्य होतं. मग मला पालीचीच स्वप्न का बरं पडावीत? कोणतंही छान स्वप्न तर कधीच पडत नाही.

१) मागे खुप गुंड लागलेत मी जीवाच्या आकांताने पळत आहे.

२) शरिर एकदम हलकं होऊन वर वर उडत जात आहे.

३) झोपेत एकदम झटका लागल्यासारखे होऊन जाग येते.

४) कुत्रे मागे लागले आहेत.

१) बीई फायनल इयरला नापास झालोय तरी नोकरी करतोय अन तो पेपर द्यायला जायचय अन काहीही आभ्यास झाला नाहीये.
२) कुत्रे मागे लागलेत Sad अन मी जीव तोडुन पळतोय. बर्‍याचदा दचकूनही उठतो.

१. मला सतत वाहनांची स्वप्ने पडतात. जास्तीतजास्त रेल्वे आणि बसेसची. क्वचित विमानांची. मी नेहमी प्रवासी असतो किंवा वाहन पकडायला धावत असतो, किंवा एका वाहनातून पुढील वाहन पकडायला जात असतो. कधी इच्छित वाहन मिळते तर कधी सुटून जाते. कधी काहीच न होता मी केवळ बघ्या असतो आणि वाहने इकडून तिकडे जात असतात. खूपदा माझ्यासोबत कोणीतरी नातेवाईक वा मित्र वा अनोळखी माणूस (एखाद दोघे जास्ती नाही) असतो आणि आम्ही दोघेतिघे मिळून वाहन पकडायला धावत असतो.

२. लहानपणी खूपदा स्वप्न पडायचे की मी रेल्वेने प्रवास करत आहे. गडी मोठी खाडी वा नदी पार करीत आहे. मी दारात लोंबकळत उभा आहे आणि चक्क खाडीची मजा लुटतो आहे. मला उंचीची वा पाण्याची अजिबात भीती वाटत नाहीये. हल्ली हे स्वप्न पडले नाहीये.

३. स्वप्न पडून जातं पण जाग येत नाही. येते तेव्हा मी ते स्वप्न विसरलेलो असतो. हेही खूपदा होतं.

-गा.पै.

रिया आणि गापै,
तुम्हाला दोघांना पडणारी स्वप्नेच मलाही वारंवार पडतात.

अजून एक वारंवार पडणारे स्वप्नं म्हणजे मी अगदी मेटकुटीला येऊन टॉयलेट शोधतेय!
Happy

गापै, रेल्वे प्रवास, लांबच लांब खाडी,पूल, लांबच लांब पसरलेले रूळ हे अगदी नेहमीचे स्वप्न आहे.

सापांची स्वप्ने पूर्वी पडायची पण त्यातले साप सुस्वभावी असत. Wink आत्ता पडत नाहीत.

मला स्वप्नात अनोळखी माणसे का कोण जाणे पण कायम दिसतात्.:अओ: साप पूर्वी भारपूर दिसायचे, पण आता नाही दिसत. नाहीतर आधी स्वप्नात भरपूर पाणी म्हणजे तुडुंब भरलेली विहीर, नदी वगैरे दिसत असे. एकदाच मला स्वप्नात देवीचे एक मंदिर गावाबाहेर दिसले. आणी गुहा असावी आणी वरती दगडी मंडप ( निसर्गनिर्मीत) आणी आत शंकराचे देऊळ वगैरे दिसले.

आता स्वप्ने पडतात पण फारशी आठवत नाहीत.

Lol मनोरंजक धागा आहे.
मला जनरली जे काय आयुष्यात सुरु आहे, त्याच्याशी संबंधितच स्वप्न पडत असतात. त्या त्या वेळचे लोक, जागा, प्रॉब्लेम्स, त्याचे गमतीदार सोल्युशन्स वगैरे दिसतात. कधीकधी अगदी असंबद्ध कैच्याकै स्वप्नंही पडतात अन ती मला नंतर व्यवस्थित आठवतात.
उदा. काल मला स्वप्नात दिसलं की मी एका टीपापाकरणीबरोबर चर्चगेट स्टेशन ते मरीन ड्राइव्ह चालायला गेलेय. रस्त्यावर अजिबात गर्दी नाही अन दाट झाडी आहे. Lol

प्रोग्रॅमर म्हणून काम करताना नेहमी माझा कोड दिसायचा. रिलीज डेट जवळ आली की त्यात ५७००० कंपायलिंग एरर्स आहेत किंवा टेस्टिंगमध्ये त्यात १३०० बग्स सापडले असे अगदी एक्स्ट्रीम वाईट काहीतरी दिसायचे.

काही स्वप्नं अनेक वर्षापासून अधनंमधनं नेहमी पडणारी :
१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते
२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते
३. एका खोलीतून दुसरी खोली, तिथून तिसरी, चौथी अशा अनेक दरवाजे अन खोल्या उघडताहेत
४. कुठलातरी दात अतिशय हलतोय, दुखतोय. हे दुखल्यासारखं पण इतकं खरं वाटतं की जाग येते. हे माझ्या मैत्रिणीलाही होतं.
५. शाळेत असताना टिपिकल स्वप्नं- पेपर सोडवताना पेनमधली शाई संपली, पेपरवर पाणी सांडलं, सप्लिमेंट्स संपल्या अन काही प्रश्न राहून गेले वगैरे.

माझ्या एका मित्राला लहानपणापासूनच, बरेचदा एक आजारी, दाढीवाला, गचाळ म्हातारा दिसतो म्हणे स्वप्नात. त्याला घाबरुन, ओरडत, घामाघुम होऊन तो बरेचदा उठून बसतो. हे त्याच्या हनिमुनलाही झालं तेव्हा त्याच्या बायकोनी त्याला डॉक्टरकडे नेलं Lol

२) शरिर एकदम हलकं होऊन वर वर उडत जात आहे. >>> हे स्वप्नं मला नेहमी पडायचं. पण खूप ताप येउन आजारी पडल्यावरच. ( लग्न झाल्यापासून नाही पडत Wink )

आता बरीचशी स्वप्नं आठवत नाहीत. काही स्वप्नं अशी असायची कि घामाघूम होऊन जाग यायची. त्यातलं एक तुटलेल्या पंजाचं स्वप्नं बरेच दिवस नियमित पडायचं. या स्वप्नात एका माळावरच्या घरात एकटाच अस्ताना एक भला मोठा पंजा बोटांवर रांगत यायचा. तो मला शोधत असायचा आणि त्याला चाहूल लागू नये म्हणून मी श्वास रोखून बसायचो. पुढे तो घराभोवती फिरायचा आणि दारावर बोट आपटायचा तेव्हां जाग यायची...

अजून एक वारंवार पडणारे स्वप्नं म्हणजे मी अगदी मेटकुटीला येऊन टॉयलेट शोधतेय!
स्मित >>
मलाही . आणी सिरियसली त्यावेळी तुम्हाला खरोखर जोरात बाथरूमला जायची गरज असते .
माझा मेंदू फिक्शन मध्ये रिअ‍ॅलिटी अ‍ॅड करतो .

कुत्रा चावण्याची मला प्रचंड भीती वाटत असल्याने तो चावला हे स्वप्नही बर्याचदा पडते

मला स्वप्ने पडतात.ती बहुतेक जे सध्या जे माझ्या आयुष्यात घडत आहे.त्याच्या आधारीत असते.पण बहुतेक स्वप्न विसरायला होतात.

बाराव्वीला असतांना एकदाच स्वप्नात मी बेडकाचं पुर्ण डिसेक्शन केलं होतं. Proud

१)बाबा वारलेत आणि मी हमसुन हमसुन रडतेय अशी स्वप्न फार पडायची पुर्वी!
२) काहीतरी तोंडात टाकलं आणि सगळेच्या सगळे दात पडुन हातात आले, असं काहीसं भयानक स्वप्न पडतं किंवा केसातुन कंगवा फिरवला आणि सगळे केस डोक्याला न दुखता हातात आले, असंही स्वप्न पडुन मला दचकायला झालय. Uhoh
२) कधीतरी एखादी वास्तु, गाव ओळखीची खुण दिसते. आपण पुर्वी कधीतरी तिथे गेलोय असं वाटत रहातं. जागं झाल्यावरही ते घर, गाव आठवतं पण्....कधी पाहिलय ते आठवत नाही.

कधीतरी एखादी वास्तु, गाव ओळखीची खुण दिसते. आपण पुर्वी कधीतरी तिथे गेलोय असं वाटत रहातं. जागं झाल्यावरही ते घर, गाव आठवतं पण्....कधी पाहिलय ते आठवत नाही.>>> हो हो मलाही कधी कधी असं स्वप्न पडतं.

रेल्वे प्रवास तो ही पुणे ते लोणावळा पण वाटेतल स्टेशन मात्र सोलापुर वै अशी कॉमेडी स्वप्नही पडली आहेत. Happy
ह्यात बर्‍याच वेळा माझी रेल्वे चुकली आहे.

नताशा सेम पिंच Happy

१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते
२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते
३. कुठलातरी दात अतिशय हलतोय, दुखतोय. हे दुखल्यासारखं पण इतकं खरं वाटतं की जाग येते.

१. स्वप्नात आपन एक स्वप्न पाहतोय असं एक स्वप्न पडायचं. स्वप्नातच अरे हे स्वप्न आहे असं कुणीतरी सांगायचं.
२. कॉलेजच्या दिवसात एका अतिशय सुंदर मुलीचं स्वप्न पडायचं. इथं सांगण्याचं कारण म्हणजे तो चेहरा कधीच पाहीलेला नाही हे स्वप्नात देखील कळायचं. हे पण स्व जाग आल्यावर अजिबात आठवायचा नाही.

विचित्र आहे पण मला असं दिसतं की काही कपडे न घालता बाहेर पडलेय आणि लपतेय मग लोकांपासून.

बाकीची स्वप्ने

तोचतोच रस्ता, तोच प्लॅटफॉर्म, लोकल चुकणे हे खूपदा दिसते.
घसरून पडणे जे वर बर्याच लोकांनी लिहिलंय.
कोणाला तरी मारायचंय पण हात जड झालाय अजिबात उचलला जात नाही असे काहीतरी.

आठवली कि लिहिते अजून.

शाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.

>>>>>>>>>>>>

मला हेच स्वप्न माझे शिक्षण पूर्ण झाल्यापासून अनेक वर्षे पडते आहे. हेच एक्झॅक्टली हेच. शाळा-कॉलेजच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही असे काही स्वप्नं पडले नाही Proud

1 . सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगावर कपडे नाहीत ,हे जाणवून ओशाळेपणा /लाज वाटणे व झोपमोड होणे

2. चालणे किंवा धावण्या ऐवजी मोठमोठ्या उड्या मारत (40-50 फुट) जाणे

3. पनवेल ते रत्नागिरी रेल्वे प्रवास , बॅग विसरणे

4. खाली पडल्यासारखे वाटून जाग येणे

5 . कॉलेजमध्ये शेवटी अभ्यास /सबमिशन अपूर्ण राहिल्याचे स्वप्न

अशी अनेक स्वप्ने पूर्वी पडत

मस्त आहे हा धागा. Happy

माझी स्वप्नं :

पूर्वी मला हमखास पडणारं स्वप्न म्हणजे मी उडतेय. मस्त उडत जायचे मी. खालचा भूभाग अगदी स्पष्ट दिसायचा. कधी बिल्डिंग्जच्या वर जाऊन बसायचे. कधी काहीतरी मिशनही अचिव्ह करायचं असे. कधी कोणी पाठलाग करत असे आणि मग मी जोरात उडायचे. उडताना अगदी वीजेच्या ताराही मध्ये यायच्या त्यांना चुकवून उडायचं कौशल्य मी बाळगलं होतं. हे उडणं मी बरेचदा खूप एंजॉय करायचे.

त्याहीआधी एक भलामोठा गरूड पक्षी पायांवर चालत माझा पाठलाग करायचा आणि मी जीवाच्या आकांतानं पळायचे. खूप भिती वाटायची त्या गरूडाची.

आणखी एक म्हणजे बीळातून धावतेय.... मागावर कोण आहे माहित नाही. पण बीळाला अनेक फाटे फुटलेत आणि मी दरवेळी एक एक चॉईस करून पुढे जातेय.

याव्यतिरीक्त कधी छानशी स्वप्नं पडल्याचं आठवत नाहीत. पडली असतील तर लक्षात नाहीत. ही अशी स्वप्नं पडतात नाहीतर ठार झोपते मी!

>>१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते
>>२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते

सेम अगदी सेम..

टीन एज मधे पडणारी स्वप्ने हा तेव्हा इंट्रेस्ट्चा आणि आता आठवला कि विनोदाचा विषय आहे

Pages