पंढरीचा राया : अभंग

Submitted by अभय आर्वीकर on 20 July, 2010 - 11:48

Vithal.jpg
.
पंढरीचा राया : अभंग-१

पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥

- गंगाधर मुटे
................................................
.
शुभहस्ते पुजा : अभंग-२

प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

- गंगाधर मुटे
.........................................................
(आषाढी एकादशीच्या निमित्ताने
पांडुरंगाला थोडेसे साकडे)
…………………………………………
.
बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!

गुलमोहर: 

व्वा! मुटेजी....... मस्त अभंग.

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥

खरच विठ्ठलाने आता बाहेर येउन त्याच्या या बदललेल्या जगाची आणि गरीब भक्तांची अवस्ता बघण्याची गरज आहे.

आलो तुझ्या दारी । किती दुरुन ॥
दर्शन मनभरुन । दे आता ॥

बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .....!!

पंढरिच्या राया म्हणले की मला फक्त आठवते

पंढरिच्या राया तुला दृष्ट लागली
ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी
||

मुटेजी लै भारी. मला परत एकदा त्या सावळ्या विठ्ठलासमोर नेउन पोचवलत Happy

जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल!

put this comment in the infinite loop of lifes programme. Happy

बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!
मुटेजी !
देवाला खणखणीत साकडे (की झणझनीत अंजन ?)
आणि त्याबरोबरच या सरकारी आंधळ्या व्यवस्थेला सनसनीत चपराक !
हे सगळ देव निवांत बघत कसा काय बसतो ....याचच विशेष वाटत !

छान .

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

<<हे सगळ देव निवांत बघत कसा काय बसतो ....याचच विशेष वाटत !>

अनिलजी अजिबात नवल वाटत नाही. त्यांच्यासोबत देवाची मिलीभगत असावी.
वाममार्गाने कमावलेल्या मिळकतीतले काही परसेंट ते देवाला अर्पण करतात.
म्हणुन देवही त्यांचेवर प्रसन्न होत असावा. Happy

<< शेवटी जरा अभंग कर्त्याच नाव जोडा >>

नितीनजी. "अभय" हे उपनाव वापरतोच आहे. Happy