दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
1. ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.
2. रविवार स्पेशल - मटण वडे
3. बागेतील कल्पवृक्ष
4. फळांनी भरलेले हापूस आंब्याचे झाड
सुटलं ना तोंडाला पाणी?
झाडाच्या इथे असताना समोरच एक कैरी पडली, मग काय लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी मीठ तिखट मिळालं तर मिळालं नाहीतर हाण तशीच.. आता मात्र मस्तपैकी कापून, तिखट मीठ लावून आस्वाद घेतला.
नारळ.
मार्च अखेर असल्यानी आंब्याची आवक कमी होती खरी पण जे काही मिळालं त्यात तृप्त झालो.
अननस
वर म्हटलेली "काजूची उसळ"
फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..
शिंपल्या आणि भाकरी.. काही लिहायला शब्द नाहीत.
रत्नागिरीला गेलो आणि सुरमई नाही, कसं शक्य आहे? ताज्या सुरमईची कापं
सुरमई थाळी तयार 

ऑल टाईम फेव्हरीट - बांगडा
फ्रीजमध्ये एक कणस मिळालं. गच्चीच्या कोप-यात कोळश्याचं पोतं होतंच. मग काय.. लागलो कामाला. कोळशे पेटवून त्यावर कणस भाजायला चांगला अर्धा तास श्रम घेतले. एक/दोनदा बोटाला चटकाही बसला पण तिखट मीठ आणि लिंबू लावलेल्या कोळश्यावर भाजलेल्या कणसाचे ४ दाणे तोंडात जाताच श्रमपरिहार झाला
थोडफार फिरणं पण झालं.
रत्नागिरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या गावखडी बीच वर जाणं झालं.
ऐन भरतीची वेळ मिळाली.
तिथेच हे महाशय.. एकटा जीव सदाशिव
तसाच पुढे २० किमी वर आडीवरे ला चक्कर मारली. तेथील प्रचि
इतक्या वर्षांत पहिल्यांदा गुरांना बीच वर फिरवताना पाहिलं
रत्नागिरी-गणपतीपुळे कोस्टल हायवे वर लागणारा आरे-वारे बीचची प्रचि


मार्च महिन्यातही सकाळी थोडी थंडी होती. एका पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर धुकं होतं..
रत्नागिरीतील भगवती किल्ला
रत्नागिरीहून अक्कलकोट ला जाणं झालं..
सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या रसाच्या ब-याच टपरी दिसतात. ४२ टेंप्रेचर मध्ये गाडीतून उतरायची हिम्मत होत नव्हती, तरी एके ठिकाणी थांबलो. रस विक्रेत्याकडून कळालं की तिथं मागील ३ वर्षं पाऊस नाही पडला. तरी येणा-या जाणा-यांसाठी विक्रेत्याने पाण्याचे माठ ठेवले होते. त्याला दिलसे सलाम!! त्या गरम्यात नुसत्या माठाकडे पाहिले तरी थोडा थंडावा मिळाला.
घाटमाथ्यावरून कोकणातला सूर्यास्त..
मस्तच प्रकाशचिञे ते कैरी
मस्तच प्रकाशचिञे
ते कैरी कापुन मसाला मीठ लावुन बनवतात त्याला काय म्हणतात?
देव, हे फोटॉ तुम्हीच काढलेले
देव,
हे फोटॉ तुम्हीच काढलेले आहेत ना? मला हे ईमेल मधून आले.
देवा, हेवा वाटावा इतके सुरेख
देवा, हेवा वाटावा इतके सुरेख प्रचि. आहेत.
Once again... konkan rocks!!
Once again... konkan rocks!!
.
.
एकदम चकचकीत फोटो आहेत. आवडले.
एकदम चकचकीत फोटो आहेत. आवडले.
धन्यवाद मंडळी.. झंपी >> हो हे
धन्यवाद मंडळी..
झंपी >> हो हे फोटोज मीच काढलेत.
आतां तर काय कोंकणाला देवांचं
आतां तर काय कोंकणाला देवांचं अधिकृत अधिष्ठानच लाभलं !!
अप्रतिम !!!
भाऊ नमसकर >>
भाऊ नमसकर >>
सगळे फोटोज खूपच मस्त आहेत.
सगळे फोटोज खूपच मस्त आहेत.
अरे डीडी तुला काय म्हनु अता !
अरे डीडी तुला काय म्हनु अता ! हे अस सुन्दर गव सोडून तु भरताबहेर कशी काय चाकरी करू शकतोस ! असो सर्व प्राचि अत्युत्तम आहेत ..अगदि मन प्रसन्न करणार्या
धन्यवाद येळेकर अमित M. >>
धन्यवाद येळेकर
अरे मित्रा पापी पेट का सवाल है.. हाहा.. लवकरच गाशा गुंडाळून गावी रहायचेय.. कायमचे!!
अमित M. >> धन्यवाद
सगळीच प्रचि सही
सगळीच प्रचि सही आहेत.
शिंपल्या, मटण्-वडे, सुरमई इ. म्हणजे तर जीव की प्राण !!!!
पाणी सुटले तोंडाला!!!
पाणी सुटले तोंडाला!!!
मस्तच ... कोकणात फेरफ़टका
मस्तच ... कोकणात फेरफ़टका मारल्यासारख़े वाटले.
Pages