मनात वसलेला गुलमोहर

Submitted by क्रांति on 7 June, 2009 - 21:44

उन्हात लखलखणारे झुंबर
मनात वसलेला गुलमोहर

नजर खिळवुनी जिकडेतिकडे
नजरबंदिचा खेळ खेळतो
लाल तांबडे शेले उडवित
हिरव्या छायेतुन सळसळतो
गारुड याचे चराचरावर

कधि पानांच्या पडद्याआडुन
हळूच हसतो लाल तजेला
कधि तेजाचे पलिते घेउन
फुलांनीच हा रसरसलेला
वैशाखाचा घुमवित जागर

घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर

गुलमोहर: 

छान रचना.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

क्या बात है.... लगे रहो Happy

***********************************
आज घर कसं निटनेटकं वाटतय,
माझा संगणक बिघडलाय ना ! Happy

विशाल, गुलमोहराच्या फोटोसाठी आयती कविता सापडली बघ. तंतोतंत.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

छान कविता!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

छान.

डॉ.मुजफ्फर सलीम शेख
"घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर"
बिउटिफुल!!!

क्रांति तुझ्या सुंदर कवितेसाठी

IMGP0801.jpg

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

तुमचा हा गुलमोहर फार आवडला. शुभेच्छा!

डवरलाय हाँ गुलमोहोर तुमच्या शब्दांनी.

क्रांती कविता आणि फोटो दोन्ही सुंदर आहे.
विशाल तू टाकलेला फोटोपण मस्त आहे.
_______________________________
"शापादपि शरादपि"

लयबद्ध, सुरेख!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मनात वसलेला गुलमोहर - अप्रतिम, खुप सुंदर, खुप आवडली....

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

सगळ्या मित्रमंडळींना खूप खूप धन्यवाद!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

गुलमोहर असाच बहरु द्या!