Submitted by भाग्यश्री ७ on 7 July, 2013 - 10:39
निशेच्या उरी चांदण्यांचा उसासा,
क्षितीजावारी सूर्यरूपी खुलासा....
तुला विश्व हे आर्ततेने पुकारी,
मला एकटीला नसे तू हवासा....
कसे रोज आभाळ गाशी पिला तू,
मला छंद दे ना तुझा हा जरासा.....
असे काय करडेच दिसशी नभा तू,
जणू रंग माझा तुला लागलासा....
पऱ्यांच्या, फुलांच्या कथा वाचते मी,
जगाया हवा ना मलाही दिलासा....
~भाग्यश्री कुलकर्णी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला आणि शेवटचा शेर विशेष
मतला आणि शेवटचा शेर विशेष आवडला..:)
धन्यवाद.
धन्यवाद.
दिलासा छान
दिलासा छान
मस्तच की.... इतकं गोड्गोड मला
मस्तच की....
इतकं गोड्गोड मला कधी लिहिता येईल कोण जाणे
अवांतर : आपण आ़ज दि: ७-७-२०१३ रोजी सकाळी मला पुणे विद्यापीठात भेटलात् त्याच भाग्यश्री जी का ?सहज शंका म्हणून विचारले
इथे हार्दिक स्वागत !!!
साऱ्यांना धन्यवाद! वैभवजी,
साऱ्यांना धन्यवाद!
वैभवजी, हो. बरोबर ओळखलंत तुम्ही.
वा, सुरेख ....
वा, सुरेख ....
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!